रविवार, २७ डिसेंबर, २०२०

ऑनलाईन विवाह जुळवताना

 विषयाचे नाव वाचून आपल्या डोळ्यासमोर इंटरनेट चे चित्र समोर दिसते कारण विषयच इंटरनेट शी समनधित आहे. सध्याचे वर्तमान युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते, कारण सध्या सर्वत्र इंटरनेटचा वापर हा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या सहाय्यानेच होत आहे. उदाहरणार्थ: आपला मोबाईल, संगणक, ऑनलाईन फॉर्म भरणे, ऑनलाईन पैसे पाठवणे इत्यादी. म्हणजे इलेक्ट्रॉनिक शिवाय जगणे अवघड होईल जर काही दिवस हे इंटरनेट बंद झाले तर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


      सध्या ऑनलाईन प्रणाली च्या सहाय्या ने विवाह जुळत आहेत जसे की ऑनलाईन विवाह जुळवणी च्या वेबसाईट आहेत ज्यावर इच्छुक वर किंवा वधु नोंदणी करून पसंती चे स्थळ निवडतात, उदा. Www.shadi.com, matchmeker इत्यादी. तसेच सध्या वॉटसप च्या माध्यमातून बायोडाटा येतात त्यावर हि वधु वरांची थोडक्यात माहिती येते, आणि पसंतीचे विवाह जुळतात. 

       ऑनलाईन विवाह जुळवा जुळवी काळाची गरज आहे, कारण प्रत्येकाला वेळ देणे सध्याच्या व्यस्त जीवनात कठीण आहे, त्यातल्या त्यात नाते गोते पाहणे, शिक्षणाची अपेक्षा, नोकरीची जुळवा जुळव, वयाचा, उंचीचा, विचारांचा दिखील विचार केला जातो आणि तो केलाच पाहिजे. कारण पारंपरिक विवाह जुळत होते पण त्यावेळी वॉट्सप, ऑनलाईन विवाह जुळण्याची सुविधा नव्हती त्यामुळे शिक्षण आणि इतर पसंती एवढी कुणी पाहत नव्हते, कारण मुलगा कमावतो एवढे पुरेशे होते आणि मुलीला स्वयंपाक येतो एवढे पुरेशे होते. आता दीवसेंदिवस मुलाच्या आणि मुलीच्या हि अपेक्षा शिक्षणा नुसार आणि नोकरी नुसार वाढल्या आहेत.

     अपेक्षा वाढल्या ठीक आहे ज्याच्या त्याच्या गरजा असतात त्याबद्दल काही दुमत नाही, मूळ विषय म्हणजे ऑनलाईन विवाह जुळवताना प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खूप साऱ्या फसवणुकी होत आहेत, जसे चुकीची किंवा फसवी नोंदणी केली जाते, डमी फोटो , शिक्षण टाकून फसवी माहिती देऊन ऑनलाईन विवाह जुळतात आणि विवाह जुळल्या नन्तर , लग्न झाल्यावर डमी उमेदवाराची खरी माहिती मिळते, नन्तर फसवणूक झाल्याची जाणीव होते. त्यांमुळे ऑनलाईन किंवा वॉट्सउप द्वारे विवाह जुळवताना वधु किंवा वर दोन्ही बाजूने योग्य चौकशी करावी, उदा. मुलीचे किंवा मुलाचे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, घर आहे किंवा नाही, काही आजार आहे किंवा नाही, नाते समंध या सर्व चौकशी होणे अत्यन्त गरजेचे आणि आवश्यक आहे.


    या ब्लॉग लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की ऑनलाईन विवाह जुळवताना किंवा वॉट्सप द्वारे मिळालेल्या माहिती ची, म्हणजे उमेदवाराने जी माहिती बायोडाटा वर ऑनलाईन किंवा वॉट्सउप वर दिली आहे ती माहिती खरी आहे का? याची खात्री झाल्याशिवाय विवाह जुळवा जुळवीची घाई करू नये, कारण हा प्रत्येकाच्या म्हणजे ज्यांचे लग्न होणार असते त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो, मुला मुलींचे आई वडिलांचे स्वप्न असतात आणि खर्च हि खूप सारा होतो म्हणून हे सर्व खात्री लायक पाहणे अत्यन्त आवश्यक आहे.

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

पाणी वाचवा जीवन वाचवा

पाणी हे जीवन आहे त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे आपले आणि सर्व मनुष्य जातीचे आद्य कर्तव्य आहे. 
        आपण टी. व्ही. , आकाशवाणी, वर्तमानपत्र, सामाजिक कार्यक्रम अशा माध्यमातून पाण्याचे महत्व आणि पाणी कसे जपून वापरावे हे नेहमी ऐकतो व वाचतो. पण आपण नुसते ऐकतो आणि वाचतो त्यापलीकडे जाऊन अमलबजावणी आपण केलीय का .... जरा विचार करून बघा.... तर ही पाणी वाचवण्यासाठी लागणारी  सावधानता आपण वेळोवेळी केली नाही तर, याचे दुष्परिणाम आपणालाच भोगावे लागणार आहेत.
खूप मोठया प्रमाणात त्याचे परिणाम आपण दर वर्षी पडणाऱ्या दुष्काळाच्या माध्यमातून भोगत आहोत. तरीही आपण पाणी वाचवण्यासाठी साध्या, सोप्या, घरगुती उपाय करत नाहीत.
      आपण जर खाली दिल्या प्रमाणे योग्य सोयी सुविधा पाणी वाचवण्यासाठी केल्या तर नक्कीच पाणी वाचवून एक प्रकारे आपण पाण्याची बचतीमध्ये मोठा हातभार लावत आहोत. 

1) नळाला पाणी आल्यानन्तर आपण अगोदर असलेले पिण्याचे पाणी सांडून देतो आणि ताजे आलेले पाणी पिण्यासाठी भरतो. इथे आपण खालील उपाय केल्यास पाण्याची बचत होईल,
      जुने किंवा अगोदरचे पाणी सांडून न देता ते पाणी तसेच इतर ठिकाणी हौदात किंवा ड्रम मध्ये साठून ठेवावे आणि त्याचा वापर धुणी, भांडी धुण्यासाठी, झाडाला पाणी देण्यासाठी किंवा गाडी स्वच्छ करण्यासाठी करू शकतो आणि तो आपण नक्की करावा अशी माजी आपणास विनंती आहे. 
2) नळाद्वारे पाणी टपकत असेल तर नळाचे ते टपकनारे पाणी थांबवावे त्यावर उपाय करून पाणी वाया जाऊ देऊ नये.
3) पाईपलाईन फुटली तर आपण एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून फुटलेला पाईप लवकरात लवकर कसा जोडता येईल याचे नियोजन करावे. किंवा समनधित नगरसेवकास तुरनंत कळवणे. यांने आपण खूप मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी वाचवू शकतो.
4) पावसाळ्या मध्ये छतावरून नळाद्वारे पडणारे पाणी वाया जाते. त्या ऐवजी आपण ते पाणी आपल्याकडे असलेल्या साठवणीच्या हौदात किंवा ड्रम मध्ये ते पाणी साठवावे.
5) दन्त मंजन करताना किंवा दाढी करताना नळाची तोटी पूर्णपणे बंद करावी. वापर नसताना विनाकारण पाणी वाया घालवू नये.
     हे घरगुती साधे उपाय आपण केले तर पाणी मोठ्या प्रमाणात आपण वाचवू शकतो.  आणि लागणारी पाण्याची गरज हि पूर्ण हुली. 
      " पाणी वाचवा, जीवन वाचवा"

शुभेच्छा💐💐

लेखक,
ज्ञानेश्वर पांचाळ.

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

हॅकिंग(ऑनलाईन चोरी)

 हॅकिंग हे नाव आपण ऐकले असेल परंतु प्रश्न पडतो की हॅकिंग नेमकं आहे काय. हॅकिंग म्हणजे ही एक प्रकारची चोरी आहे आणि हा ऑनलाईन गुन्हा आहे, हॅकिंग करण्यासाठी संगणकाचा किंवा मोबाईल चा वापर केला जातो. संगणक हा इंटरनेट शी जोडलेला असणे आवश्यक आहे, जोडलेला असेल तरच हॅकिंग शक्य आहे.


         हॅकिंग चा मूळ उद्देश हा संगणका मधील कमतरता शोद्धणे, त्रुटी काढणे, इत्यादी होय.  परंतु याचा वापर नन्तर गुन्हे करण्यासाठी होऊ लागला. उदा. इमेलचा पासवर्ड हॅक करणे, एटीएम डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चे पिन पासवर्ड हॅक करणे, ऑनलाईन पेमेंट करताना, ओ टी पी ची मागणी करणे, कॉपीराईट चे उल्लंन्घन (इबुक चे कॉपी) बेकायदेशीर पणे डाउनलोड करणे, इतरांचे बुक आपल्या नावावर करणे इत्यादी.

       हॅकिंग चे काही प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे पाहुयात,

1) एथिकल हॅकिंग (परवानगी युक्त हॅकिंग): यामध्ये हॅकर ला नियमानुसार परवानगी घ्यावी लागते, खाजगी माहिती उघड न करण्याच्या शर्तीवर त्या हॅकर ला परवानगी दिली जाते. 

        एथिकल हॅकिंग सॉफ्टवेअर आणि संगणकातील कमतरता शोधण्यासाठी करतात. म्हणजे ही एक प्रकारची संगणकाला सुरक्षितता प्रदान करणे होय.

2) अनइथिकल हॅकिंग (परवानगी शिवाय, बेकायदेशीर): यामध्ये हॅकर हा माहित नसलेला असतो, परवानगी शिवाय नेटवर्क शी जोडलेल्या संगणकातील खाजगी माहिती काढून घेतो, आणि त्याचा वापर चोरी किंवा समाजामध्ये भांडणे आणि नुकसान दायक कार्य करण्यासाठी केला जातो. 

         हॅकिंग मुळे ऑनलाईन बिझनेस ला खूप मोठे नुकसान होते, प्रत्येक वर्षी जवळपास करोडो रुपये चे हॅकिंग मुळे नुकसान होते.


हॅकर: हॅकर हा संगणक तज्ञ असतो, थोडक्यात संगणकाला सूचना, म्हणजे संगणकीय भाषा सूची देेन्यात  तज्ञ असतो.

हॅकर चे प्रकार खालीलप्रमाणे

1) एथिकल हॅकर (व्हाईट हॅट) : जो नियमाने परवानगी दिलेला हॅकर आहे, जो संगणका मधील कमतरता शोधून त्यावर उपाय करत असतो, संगणकाच्या कमतरता नष्ट करून त्याला बळकटी देण्याचे काम एथिकल हॅकर चे असते.

2) क्राकर (ब्लॅक हॅट): जो नियमाने परवानगी नसलेला हॅकर असतो, जो बेकायदेशीर नेटवर्क शी जोडलेल्या संगणकाचे पासवर्ड चोरी करून त्या मधील गोपनीय माहिती चोरी करतो व त्याचा वापर समाजा मध्ये दुफळी किंवा भांडणे लावण्यासाठी करतो, किंवा एटीएम चे पासवर्ड चोरणे, ऑनलाईन ओटीपी मागवून बेकायदेशीर रक्कम काढणे इत्यादी.

3) ग्रे हॅट: हा हॅकर दोन्ही काम करतो म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, परंतु हा संगणकाला वारंवार सूचना देत राहतो जसे काही कमतरता किंवा दुरुस्ती विषयक सल्ला इत्यादी.

4) स्क्रिप्ट किड्डीझ : हे हॅकर असे असतात जे कि, संगणकीय सूचनांचे काही टूल किंवा सूचना द्वारे संगणकतील माहितीची चोरी करतात. याना संगणकाचे खूप जास्त ज्ञान नसते तरीही हे हॅकर रेडिमेड टूलचे वापर करतात.

5) हॅक टीविस्ट: हे हॅकर सामाजिक, राजकीय, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी त्या समनधित वेबसाईट हॅक करून त्यामध्ये चुकूचे माहिती पसरवतात.

6) फ्रिकर: हे संगणकीय हॅकर नसून, टेलिफोन मधील त्रुटी किंवा कमतरता शोधून काढतात.

        तर हॅकिंग पासून बचावासाठी आपला एटीएम पिन कुणाला हि सांगू नये, ऑनलाईन किंवा फोन वर कुणीही ओटीपी मागतील तर तो कदापिही देऊ नये इत्यादी.


गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

अभिप्राय (Feedback)

 अभिप्राय (Feedback) म्हणजे एखादया चौकशी ला मिळालेली माहिती म्हणजे अभिप्राय होय.

       शाळा, कॉलेज मध्ये आपण अभिप्राय घेतो, जसे गुरुजी विद्यार्थ्या कडून आपण शिकवले ते शिकवण विद्यार्थ्यांना कशी  वाटली योग्य अयोग्य प्रतिक्रिया नोंदवून घेतात. 

       एखादी कार्यशाळा झाल्यानन्तर, फीडबॅक (अभिप्राय) फॉर्म श्रोता वर्गाकडून भरून घेतात, ज्यामध्ये झालेल्या कार्यक्रमा मध्ये कोणकोणते भाग आपण आवडले, कोणकोणते नाही याची नोंद या अभिप्राय फॉर्म मध्ये घेतली जाते. 


          या फीडबॅक (अभिप्राय) फॉर्म मध्ये विशिष्ट प्रकारची प्रश्नावली असते ज्यामध्ये तुम्हास उत्तरे लिहायची असतात किंवा योग्य, अयोग्य पर्याय निवडावे लागतात. काही फीडबॅक फॉर्म मध्ये 1 ते 5 क्रमांक असतात ज्यामध्ये 1 क्रमांकावर टिक केले तर गुण अत्यन्त कमी असलेला आणि 5 म्हणजे उत्कृष्ट गुण असलेला. 

        अभिप्राय (फीडबॅक) चे मुख्य तीन प्रकार आहेत, ते आपण खालीलप्रमाणे दिले आहेत.

१) सकारात्मक अभिप्राय (positive feedback)- या प्रकारामध्ये अभिप्राय हा सकारात्मक असतो, म्हणजे एखादी सेवा किंवा वस्तू चा दर्जा हा उत्कृष्ट आहे म्हणून त्याबद्दल सकारात्मक अभिप्राय नोंदवणे.

    उदा. खूप छान सेवा मिळाली, आपल्या हॉटेलचे जेवण खूप चवदार आहे, 5 स्टार इत्यादी.

2) नकारात्मक अभिप्राय ( Negative Feedback)- या प्रकारामध्ये अभिप्राय हा नकारात्मक दिला जातो, म्हणजे सेवा किंवा वस्तू चा दर्जा अयोग्य असेल किंवा त्यामधील गुण अतिशय निरुकृष्ट असतील तर नकरात्मक अभिप्राय दिला जातो.

      उदा. खूप वाईट सेवा होती, जेवणाला चवच नव्हती, 1 स्टार इत्यादी.

3) तटस्थ अभिप्राय (Neutral Feedback)- या मध्ये अभिप्राय देणारा हा ना सकारात्मक अभिप्राय देतो ना नकरात्मक अभिप्राय नोंदवतो. म्हणजे तटस्थ भूमिका. 

      उदा. जेवण ठीक होते, नो स्टार इत्यादी.

असे हे अभिप्राय नोंदवण्यासाठी मुख्य तीन प्रकार पडतात. तर वर्तमानकाळात सर्व काही ऑनलाईन झाले आहे, तर ऑनलाईन अभिप्राय नोंदवण्याची पण सोय झालेली आहे. जसे की एखादी वस्तू किंवा सेवा त्याखाली 3 स्टार , 4 स्टार अशी सुविधा असते ज्यावर क्लिक करून आपण किती स्टार द्यायचे त्या सेवेला किंवा नवीन घेतलेल्या वस्तू ला हे आपण किंवा अभिप्राय नोंद करणारा किंवा ग्राहक ठरवणार. 


       ऑनलाईन अभिप्राय हा वेबसाइट मध्ये खालच्या बाजूला कमेंट बॉक्स दिलेला असतो त्यामध्ये कमेंट करावे लागते. ज्यामध्ये तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता.

         आपण म्हणाल या अभिप्राय चा काय उपयोग, याला कोण विचारणार तर तसे नव्हे, या अभप्रयाची नोंद सेवा देणारा, वस्तू विकणारा आपल्या वस्तूची किंवा सेवेचा दर्जा स्वतः तपासतो आणि जास्त नकरात्मक प्रतिक्रिया असतील तर त्यामध्ये काय चुका आहेत हे त्या मालकाला कळेल आणि त्यामध्ये दिवसे न दिवस सुधारणा करत राहील. यामुळे ग्राहकाला गुणवत्तापूर्ण सेवा मिळेल.

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पांचाळ सोनार समाज

सोनार समाजामध्ये विविध अठरा पोटजाती आहेत त्यापैकी पांचाळ सोनार हि एक पोटजात आहे. पांचाळ सुतार, पांचाळ लोहार हे पांचाळ जातींपैकीच आहेत. तर फार इतिहासात न जाता अलीकडील अनुभवावरून हा लेख लिहीत आहे. 

          पांचाळ सोनार समाजातील प्रमुख पाच आडनावे आहेत जसे की महामुने, धर्माधिकारी, पंडित, दीक्षित आणि वेदपाठक. इतर आडनावे हि टोपण आडनावे समजली जातात, उदा. पोतदार, पांचाळ इत्यादी. संत नरहरी सोनार यांचे आडनाव देखील महामुनी हे होते (संदर्भ क्र. १) पांचाळ सोनारांची गोत्र देखील पाच आहेत. पांचाळ सोनार समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात शहरात आढळते आणि खेडेगावात अगदी दोन ते चार घरे असतात. पांचाळ सोनार समाज हा जास्त प्रमाणात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, लातूर, बारामती आणि पुणे या शहरात जास्त प्रमाणत आढळून येतो. 

      पांचाळ सोनार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा सोनार कारागीर असून वर्तमाण काळात या समाजातील युवक वेगवेगळा व्यवसाय व नोकरी ला प्राधान्य देत आहेत. पांचाळ सोनार समाजात उच्चशिक्षित युवकांचे प्रमाण हे अल्पशिक्षित युवकांपेक्षा खूप कमी आहे. हा समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे. समाजातील पाहुणे एकमेकास भेटल्यास सहज चर्चा होते "या आपले पांचाळ सोनाराचे घर पहायचे म्हटल्यास शंभर कोसावर एक घर" अशी चर्चा निघते. तर सांगायचे कारण म्हणजे त्यामुळे हा समाज म्हणावा तेवढा आधुनिकतेकडे आलेला नाही.

        पांचाळ सोनार समाजात बटूनची मुंज देखील होते म्हणजे जसे की वय वर्ष दहा म्हणजे बालवयात यांची मुंज करतात. मुंज करताना केस कापले जातात, छोटी शेंडी ठेवतात, बालसंस्कार करतात, जानवे परिधान केले जाते इत्यादी. आधुनिकते सोबत हल्ली जानवे वगैरे कुणी वापरत नाहीत परंतु वयस्कर लोक अजूनही जानवे परिधान करतात.

         पांचाळ सोनार समाज हा शाकाहारी आहे. त्याचप्रमाणे दैवज्ञ सोनार, दैवज्ञ ब्राह्मण सोनार, वैश्य सोनार हे देखील शाकाहारी आहेत. 

          पांचाळ सोनार आणि दैवज्ञ यांचे बरेचशे विवाह म्हणजे रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत. कारण यांनच्या खूप साऱ्या चालीरीती समान आहेत इत्यादी.

        पांचाळ सोनार समाजात समाजातीलच भटजी असतो जो वीवाह, उपनयन संस्कार, पूजा विधी करतात. मृत्यनन्तर दहावा, तेरावा हे सुद्धा हे भटजीच करतात. पेशवाईच्या काळात पेशव्यांनी या पांचाळ सोनार भटजींवर बंदी आणली होती. अलीकडील काळात हे पांचाळ सोनार भटजींचे प्रमाण कमी झाले आहे. समाज दिवसेनदिवस आधुनिकतेकडे वळत आहे.

          पश्चिम महाराष्ट्रातील पांचाळ सोनार समाज हा बऱ्यापैकी सधन आणि सुधारलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र सुधारित भाग आहे आणि सुधारित भाग म्हटल्यास सोनारांची दुकाने बऱ्यापैकी चालतात. 


           आधुनिक म्हणजे मागील दहा वर्षांपासून पांचाळ सोनार समाजाचे वधू वर मेळावे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत कारण ती काळाची गरज आहे. समाजातील घरे दूर दुर असतात कोणाचा पत्ता कोणाला नसतो म्हणून ही वधुवर मेळावा च्या ठिकाणी सर्व एकत्र येतात आणि गरज वंतांना आपला जोडीदार मिळतो. त्यापेक्षा पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि विवाह जुळवा जुळवी साठी होत आहे उदा. वॉटसप, ऑनलाईन वधुवर सूची इत्यादी. 

         या समाजातील खूप युवक उच्च अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यापारी देखील आहेत परंतु समाजाचा आधुनिक काळानुसार शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. पांचाळ सोनार समाज हा "इतर मागास वर्ग" (OBC) प्रवर्गात गणला जातो.

         हि सर्व माहिती समाज अनुभव, चर्चा आणि वाचनातून या लेखात मांडलेली आहे. तरी वाचकांपैकी अधिक माहिती असेल तर लेखाच्या शेवटी दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी.

        आधुनिक उच्चशिक्षित युवकांनी आपल्या समाजातील युवकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाज प्रगतीपथावर कसा जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.


संदर्भ:1) संत नरहरी सोनार



            

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

Twitter (ट्विटर)

Twitter हे काय आहे: Twitter हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे आपण म्हणजे वापरकर्ता आपले थोडक्यात सांगणे किंवा संदेश आपल्या फॉलोवर्स(अनुयायी) ना त्वरित पाठवते.

       Twitter ला microblog (छोटासा लेख) असेही म्हणतात. म्हणजेच आपला संदेश थोडक्यात सांगणे.

Twitter चा शोध: Twitter चा शोध ज्याक डोरसि, नोव्ह ग्लास, बिझ स्टोन, एवान विल्ल्यम्स यानी लावला असून, मार्च 2006 साली त्यांनी twitter हे माध्यम बनवले. सुरवातीला ज्याक डोरसि यांनी या बद्दल विचार केला की असे माध्यम असावे ज्याद्वारे मित्रांचे एकमेकांचे स्थिती जाणून घेण्यासाठी छोटेसे संदेश एकमेकांना पाठवता येतील. 


Twitter मधील काही बटणे: ट्विटर वापरण्यासाठी त्यावर वेगवेगळे बटण दिलेले आहेत जसे की लाईक, ट्विट, retweet इत्यादी. लाईक बटन इतराने लिहिलेले ट्विट like करण्यासाठी करतात, ट्विट बटन वर क्लिक केल्यास नवीन ट्विट टाकण्यासाठी करतात, आणि retweet चा वापर एखादया ट्विट ला आपल्या प्रोफाइल वॉल वर तीच tweet करण्यासाठी करतात.

# चा वापर: Twitter मध्ये # या चिन्हाद्वारे, सध्या म्हणजे आज चालू स्थितीमध्ये सर्वात जास्त कोणती बातमी चर्चेत आहे त्या समंधी छोटासा संदेश शेअर करणे म्हणजे #ट्विट होय. उदा. #शेतकरी_आंदोलन #चलोदिल्ली इत्यादी. 

@ या चिन्हाचा वापर: @ या चिन्हाचा वापर विशिष्ट व्यक्तीला सरळ संदेश देण्यासाठी करतात. उदा. अमिताभ बच्चन च्या ट्विटर हँडल ला संदेश पाठवणे. @amitabbachan. इत्यादी.

शब्द मर्यादा: Twitter द्वारे संदेश पाठवण्याची मर्यादा असते, 140 शब्द आपण ट्विट द्वारे टाईप करून पाठवू शकतो. एकदा एक ट्विट आपण सेकंदामध्ये लाखो फॉलोवर्स किंवा चाहत्यांना पाठवता येते.

Twitter खाते कसे तयार करावे- Twitter चा वापर इंटरनेट द्वारे होतो. Twitter चा वेबसाईट पत्ता (http://twitter.com) आपण इंटरनेट वर टाकला असता Twitter चे वेब पेज समोर स्क्रीन वर दिसते. त्यावर प्रथम खाते तयार करण्यासाठी साइन अप (sign up ) वर क्लिक करून वापरकर्त्या चे पूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, इमेल पत्ता, मोबाईल नंबर आणि लॉगिन साठी सांकेतिक कोड टाकावा लागतो. त्या नन्तर आपल्या इमेल पत्त्यावर twitter तर्फे खात्री करण्यासाठी इमेल येतो, आलेल्या इमेल मध्ये खात्री साठी आलेली वेबसाइट लिंक वर क्लिक करून आपले twitter खाते तयार होते. 

लॉगिन पद्धत: त्यांनंतर आपण जो user id आणि पासवर्ड रेजिस्ट्रेशन (sign up) करताना निवडला तो लॉगिन id आणि पासवर्ड लॉगिन बॉक्स मध्ये टाकून लॉगिन करावे लागते. लॉगिन झाल्या नन्तर वापरकर्ता हा आपले tweet (छोटा संदेश) करू शकतो. 


       सध्या जगामध्ये जवळपास 50 कोटी लोक ट्विटर चा वापर आपला छोटा संदेश किंवा छोटा लेख, वाढदिवस चित्र, विशेष कार्यक्रमाची माहिती आपल्या चाहते, मित्र याना त्वरित देण्यासाठी करतात.

         भारतात बॉलीवूड मध्ये कलाकार लोक, राजकीय लोक, प्रसिद्ध गायक, कलाकार, प्रसिद्ध लेखक हे ट्विटर चा वापर आपल्या चाहत्यांना रोजच्या परिस्थिती, येणारा चित्रपट किंवा आवश्यक सांदेश आपल्या चाहत्यांना ट्विट द्वारे देत राहतात.

             बॉलिवूड मध्ये अमिताभ बच्चन यांचे सर्वात जास्त फॉलोवर्स (चाहते) आहेत.

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

माहिती तंत्रज्ञान

 सध्या आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत आणि वर्तमान युग हे माहिती तंत्रज्ञान युग म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दशकापासून आपण पाहतोय कि संगणका मूळे खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये बदल घडत आहेत. याला कारण म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये होणार तंत्रज्ञानाचा वापर.

       थोडक्यात वीस वर्षांपूर्वीचा काळ आठवा आपण तहसील मध्ये साधे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलो तर लांबच लांब लोकांची रांग लागत असे, प्रत्येक कागदपत्र एका फाईल ला जोडून कार्यालयात जमा करावी लागत असे, नन्तर त्याची पावती घेणे, नन्तर महिनो न महिने चकरा मारत राहणे, फाईल वेळेवर सापडत नसे, म्हणजे खूप सारे ढिसाळ आणि वेळखाऊ सर्व कारभार होते. 


       त्यांनतर हळूहळू संगणक बाजारात येणे चालू झाले सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट, नन्तर कलर संगणक, विंडोज 95 ऑपरेटिंग सिस्टिम पासून ते विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम पर्यंत एवढे बदल झाले की, एवढे बदल होतील याची कल्पना देखील कुणी केली नसेल. हे सर्व माहिती तंत्रज्ञानाच्या वापर वाढल्या मुळे दिसत आहे.

       माहिती तंत्रज्ञान म्हणजे प्रत्येकाला लागणारी सुविधा, माहिती, त्याचे रोजचे काही अडचणी किंवा प्रश्न, शासकीय किंवा अशासकीय सोयी सुविधा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळणे किंवा मिळवणे याला आपण माहिती तंत्रज्ञान असे म्हणतो.

       उदा. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीने मिळणे, सरकारी सुविधा ई-सुविधा द्वारे मिळणे, बँकेतील पैसे एटीएम द्वारे काढणे इत्यादी.

        आपण सध्या स्वतः टच प्याड चा मोबाईल वापरतोय, मुलांसाठी आय पॅड खेळण्यासाठी घेतोय, ऑनलाईन टिकेट बुकिंग, ऑनलाईन शॉपिंग, ग्यास बुकिंग मोबाईल द्वारे इत्यादी. आणि लोकडाऊन च्या काळात तर सर्वात महत्वाचा अनुभव म्हणजे ऑनलाईन शिक्षण. हे सर्व बदल माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे च होत आहेत.

       येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञाना मध्ये खूप सारे बदल होतील जसे की रोबोट द्वारे ऑनलाईन शस्त्रक्रिया, म्हणजे माणसाची जवळपास 80 ते 90 टक्के कामे हि माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होतील. डिजिटल इंडिया चा प्रचार प्रसार ज्याप्रमाणे चालू आहे, जसे की प्रत्येक क्षेत्रात जसे ऑनलाईन बँकिंग, इ निविदा, इ प्रशासन इत्यादी. मोबाईल द्वारे बिल पेमेंट सुविधा म्हणजे भारतामध्ये या सुविधा इतक्या वेगाने येतील असे कधी वाटले नव्हते पण त्या सुविधा आपल्या पर्यंत आल्यात.


         भारतामध्ये सर्वत्र इंटरनेट चे जाळे सर्वदूर पसरले असून प्रत्येक शहरात आणि खेडेगावात इंटरनेट साठी लागणारी केबल आणि मोबाईल इंटरनेट टॉवर बसवण्यात आलेली आहेत. आपनास आठवत असेल 10 वर्षांपूर्वी सारखी लाईट जात असे पण आता लाईट जात नाही आणि त्याचमुळे मोबाईल आणि इंटरनेट सुविधा व्यवस्थित वापरात येत आहे. 

        संगणक साक्षर जो कुणी नसेल तो अशिक्षित आणि अडाणी म्हणून गणला जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी संगणक साक्षर होणे काळाची गरज आहे. जे सध्या वयाची पंचावन किंवा साठी ओलांडली त्यांना एवढे अत्याआवश्यकता नाही परंतु येणारी पिढीतील प्रत्येक जण संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. 

          या सर्व माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत असताना माणसं माणसांना कमी ओळखायला लागलीत, माणुसकी हि वॉट्सप व फेसबुक मार्फत दिसत आहे, समोरून येणाऱ्या माणसाला नमस्कार किंवा रामराम घालणे बंद झाले असून वॉट्सप फेसबुक वर हाय, हॅलो चालू झाले आहे.

        वरील मुद्दा सांगण्याचा उद्देश एकच कि माणसाने माणसाची ओळख विसरू नये, किती हि तंत्रज्ञान पुढे गेले तरी आणि तेच मनुष्य जातीच्या हिताचे आहे. माहिती तंत्रज्ञान आवश्यक आहेच पण त्याचा अति वापर हा घातकच आहे. 

संदर्भIT

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार हे थोर संत होते त्यांचा जन्म 1313 मधील असून काही संतांच्या सांगण्यानुसार त्यांचा जन्म 1115 शतकातिल आहे. संत नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपूर येथील असून ते शैव उपासक होते, म्हणजे ते फक्त भगवान शिवाची पूजा अर्चा करत असत इतर कुठल्याही देवाची ते पूजा वगैरे करत नसत. त्यांच्या घरात शैव पूजा कृपेनेच संत नरहरी सोनार यांचा जन्म झाला आणि त्या काळातील थोर संत चांगदेव यांनी त्यांचे नाव नरहरी ठेवले आणि हा भविष्यात थोर व्यक्ती होईल असे भाकीत केले होते. 


        संत नरहरी सोनार पंढरपुरातील प्रसिद्ध कारागीर होते, दूर वरून लोक त्यांची हातचे अलनकार नेण्यासाठी येत. त्याच क्षेत्रातील प्रसिद्ध सावकाराला खूप वर्षांनी मुल झाले आणि नवस म्हणून त्याने विठ्ठल भगवन्ताला चांदीचा करदोरा देण्याचे ठरवले. त्यासाठी ते संत नरहरी सोनार यांच्या घरी आले व नवस म्हणून भगवान विठ्ठलाला चांदीचा करदोरा करण्यासाठी त्यांनी नरहरी सोनार यांस सांगितले. परंतु संत नरहरी सोनारानी मी हे कार्य करू शकत नाही आपण दुसऱ्या सोनाराकडे करा म्हणून सांगितले. 

       त्यावर सावकाराने कारण विचारले त्यावर संत नरहरी म्हणाले की आम्ही शिवा चे उपासक आहोत आणि इतर कुठल्याही देवाचे दर्शन आम्हास जमत नाही म्हणून सांगितले. पण सावकाराने नरहरी सोनाराकडेच विठ्ठलासाठी करदोरा करण्याचा हट्ट केला, नन्तर नरहरी सोनार एका अटीवर राजी झाले, ती अट म्हणजे विठ्ठलाचे करदोऱ्याचे माप आणल्यास करदोरा तयार करून देतो म्हणून.

     त्यांनतर सावकाराने ठरल्या प्रमाणे विठलाच्या कमरेचे माप घेऊन संत नरहरी सोनार याना दिले, त्यांनंतर संत नरहरी सोनारानी आपल्या कुशल कारागिरीने उत्कृष्ट असा करदोरा बनवला आणि सावकाराला दिला. सावकाराने पूजेच्या दिवशी विठ्ठलाला करदोरा बांधत असताना तो चार बोटे कमी पडू लागला, रागाने सावकार असे कसे झाले म्हणून तावातावाने नरहरी सोनाराकडे निघाले परंतु वाटेत थोडे विचार करुण त्यांनी शांततेने परत चार बोटे करदोरा वाढून देण्यास सांगितले, नन्तर परत विठ्ठलाला करदोरा चार बोटे मोठा झाल्याचे जाणवले. परत सावकार संत नरहरी सोनाराकडे गेले आणि त्याना स्वतः माप घेण्यासाठी विनवणी केली, शेवटी संत नरहरी सोनार डोळ्यावर पट्टी बांधून मोजमाप घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात येण्यास राजी झाले.


       मंदिरात जाण्यापूर्वी त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, विठ्ठल मूर्ती जवळ गेले, संत नरहरी सोनार जेव्हा विठलाच्या गळ्याभोवती हात फिरवत होते त्यावेळी त्यांना भगवान शिवाच्या गळ्यातील सापाची अनुभूती झाली, नन्तर विठ्ठलाच्या कमरेचे माप घेताना त्यांना शिवाची अनुभूती झाली, त्यांनतर परत त्यानी मूर्तीला परत चाचपडून पहिले तर डमरू आणि त्रिशूळाची अनुभूती संत नरहरी सोनार याना झाली, त्याक्षणी संत नरहरी सोनारानी डोळ्यावरील पट्टी काढली तर त्यांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले आणि डोळ्यावर पट्टी लावल्यास शिवाचे दर्शन झाले. त्या दिवशी "संत नरहरी सोनार याना शिव आणि विठ्ठल एकच आहेत" याचा साक्षात्कार झाला आणि हा साक्षात्कार झाल्यापासून  संत नरहरी सोनार विठ्ठलाचे निसिम भक्त जाहले. 

    || देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार ||

    वरील अभंग म्हणत संत नरहरी सोनार विठ्ठल भक्ती मध्ये तल्लीन होत असत. 

       इ.स. 1285 मध्ये संत नरहरी सोनार विठ्ठल अलनकृत जाहले. संदर्भ क्र.1. 

     या साक्षात्कार झाल्या नन्तर संत नरहरी सोनार प्रसिद्धीस पावले. सोनार समाजातील सर्व समाज संत नरहरी सोनार महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी करतात. 

संदर्भ

1) www.myportal.org.in

2) https://bhaktamal.co

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.



         

बुधवार, २ डिसेंबर, २०२०

Depression (औदासिन्य)

या ब्लॉग चे शीर्षक इंग्रजी मध्ये देण्याचे कारण म्हणजे सध्या मराठी मध्ये चोहीकडे डिप्रेशन हा शब्द खूप लोकप्रिय किंवा प्रसिद्ध झालाय. या विषयावर चर्चा निघाली तर आपण सहज म्हणतो डिप्रेशन चा त्रास होतोय आणि तेही अगदी सहज. तर ठीक आहे, या विषयावर ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे हा आजारच तसा आहे पण दिसेनासा किंवा अदृश्य आजार आहे. उदा. सर्दी झाली की नाक गळते, ताप आल्यास शरीर तापते, खोकला आल्यास सारखे खोकलने इत्यादी. या सर्व आजाराचे लक्षणे आपल्याला जाणवतात किंवा डोळ्याने दिसतात. परंतु डिप्रेशन (उदासीनता) असा आजार आहे जो कि माणसाच्या हावभावावर किंवा दिसण्यावरून ओळखायला येत नाही. या आजाराची लक्षणे थोडी वेगळी असतात.खालीलप्रमाणे,    
 
       सतत उदास उदास वाटणे, काहीतरी खूप मोठे गमावल्या सारखे वाटणे, चिडचिडेपणा, राग-राग करणे, भूक न लागणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, तुमच्या रोजच्या जीवनमानावर परिणाम होणे किंवा तुमचा रोजचा दिनक्रम बिघडणे इत्यादी.
         आता आपण म्हणाल हा काय आजार आहे का, हे तर जीवनात कधी सुख कधी दुःख चालूच असते, हो बरोबर आहे परंतु इथेच या आजाराची कोंडी होते कारण सुख दुःख नेहमी करता नसते त्याचा काळ वेळ कधी येतो कधी जाते. 
          डिप्रेशन (उदासीनता) हि सतत चालू राहते म्हणजे, सतत महिनो न महिने उदासीन राहणे, आपल्या आवडी निवडी न समजणे, कुठल्याही आनंदच्या क्षणात पूर्णपणे सहभागी न होणे, जेवण वेळेवर नसणे, कामात मन न लागणे, वेळेवर कामे न करणे, अति झोप किंवा निद्रानाश, अति विचार, चिंताग्रस्त राहणे, आत्महत्या करण्याचे विचार,  घबराहट होणे इत्यादी.
        कारणे- उदासीनता येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात जसे कि अति जवळची प्रिय व्यक्ती गमावणे, सतत आजारपण, कॅन्सर, शुगर, अस्थमा आजारामुळे सतत चिंताग्रस्त राहणे, आजकालच्या स्पर्धेच्या युगात लवकर यश न मिळणे, सतत अपयश, सतत आर्थिक टंचाई, फसवणूक इत्यादी कारणामुळे औदासिन्य येते किंवा उदासींनतेकडे व्यक्ती वळायला लागते, अपघातामुळे शारीरिक नुकसान इत्यादी.
          या व्यतिरिक्त अनुवांशिक कारणे, तुमची शारीरिक स्वास्थ्य, मेंदू विकार इत्यादी कारणे पण असू शकतात.
        उपाय- लवकरात लवकर  मनोविकार तज्ञांंचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याना तुमच्या रोजच्या दिनक्रम मध्ये काय बदल होत आहेत स्पष्टपणे सत्य सांगणे. 
         डॉक्टर ने सांगितलेली औषधी वेळेवर घेणे आवश्यक आहेत. 
        सर्वात महत्वाचे म्हणजे औषधा सोबत तुमचे व्यायाम जसे सकाळी लवकर उठून (morning walk) करणे, किमान तीन ते चार किलोमीटर चालणे, योगासने करणे, वेळेवर जेवण, सकारात्मक विचार सरणी असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलणे, नकरात्मक विचार सरणी पासून दूर राहणे.       
        व्यसनापासून दूर राहणे, ड्रिंक टाळणे किंवा नसनेच योग्य, ड्रग वगैरे पासून दूर राहणे इत्यादी        

टीप- या माहिती मध्ये थोडक्यात माहिती संगतलेली असून विस्तृत माहितीसाठी आपण डॉक्टर शी सविस्तर बोलणे आवश्यक किंवा यावर आधारित पुस्तके वाचणे. 

संदर्भ- Healthline

💐💐💐💐💐
लेखक,
ज्ञानेश्वर पांचाळ.

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

सोशिएल मेडिया

सोसिएल मेडिया म्हणजे एक असे माध्यम जेकी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून एक असे डिजिटल मंच ज्या द्वारे आपण आपले विचार किंवा संदेश सार्वजनिक किंवा ठराविक समूहामध्ये शेअर किंवा मनमोकळे करू शकतो.


        असे सोसियल मेडिया सध्याच्या काळात डिजिटल सोसिएल मेडिया म्हणून ओळखले जातात. उदा. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, वॉट्सअप्प, टेलिग्राम इत्यादी. पूर्वी असे विचारांचे आदाण प्रदान करण्यासाठी सहज सोपे माध्यम उपलब्ध नव्हते. सध्या इंटरनेट सुविधा खूप वाढल्यामुळे डिजिटल युग झाले आहे. प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड टचप्याड मोबाईल आला आहे. ज्या व्यक्तीला वाचता किंवा लिहिता येत नाही ती व्यक्ती देखील अगदी सहज पद्धतीने या मोबाईलचा सहज वापर करत आहे. कारण बनवणाऱ्या लोकांनी मोबाईल बनवलाच त्या उद्देशाने, जेणे करून प्रत्येकाला त्या मोबाईल चा वापर करता यावा. 

         सोसियल मेडिया किंवा सामाजिक डिजिटल माध्यम, जसे फेसबुक, ट्विटर, वॉटसप एवढे लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे याद्वारे एक व्यक्ती एक संदेश किंवा विचार, महत्वपूर्ण माहिती अनेक लोकांना एकाच वेळी पाठवू शकते आणि तेही काही सेकंदात. सोसिएल मेडियाचे फायदे आहेत च आहे तेवढे तोटेपण आहेत. 

           सोसियल मेडियाचे फायदे हे आहेत की याद्वारे माहितीचे आदान प्रदान होते, बरेचशे मित्रसमूह जोडले जातात, नवनवीन उपक्रम, विविध ज्ञानपुरक नवनवीन माहिती सतत मिळत राहते. पूर्वी कोणता आजार कुठे पसरला, किंवा काही बातम्या, वयक्तिक असो वा सामाजिक या सहज बाहेर येत नसत किंवा चर्चा होत नसे परंतु या माध्यमा द्वारे त्या खूप कमी वेळात बाहेर येत आहेत. काही भ्रष्टाचार किंवा चोरी, बेकायदेशीर कामे हि कमी झाली किंवा सर्रास होत नाहीत जशी अगोदर होत असे. कारण रेकॉर्डेड विडिओ सेकंदामध्ये पूर्ण देशभर पसरतात एवढी मोठी ताकत या सोसियल मेडिया मध्ये आहे.

       बातमी पसरताच खोटी माहिती पसरवणाऱ्याची किंवा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्याची प्रचंड फजिती होते. त्यामुळे सोसियल मेडिया काळजीपूर्वक हाताळणे तेवढेच महत्वाचे आहे. आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर न करने, इंटरनेट कॅफे किंवा दुसऱ्याच्या मोबाईल किंवा संगणकावर लॉग आऊट केल्याची खात्री करणे अत्यन्त महत्वाचे आहे.


     आपणास अनुभव असेलच कि काही तंत्रज्ञानाचे फायदे जसे असतात तसे तोटे पण असतात, तसे सोसियल मेडियाचे पण आहेत. उदा. फेसबुकवर नवीन मैत्री साठी आलेली विनंती (फ्रेंड रिक्वेस्ट) स्वीकारणे नन्तर तो मित्र किंवा मैत्रीण कालांतराने आभासी मित्र असतात म्हणजे एकमेकांना जास्त न ओळखता एकमेकांचे खूप सारे प्रश्नः शेअर करतात, परंतु याच वेळी धोका होण्याची शक्यता असते, कारण ते एकमेकाला सत्य किती बोलतात ते फसवणूक झाल्यावर लक्षात येते तोपर्यंत नाही. त्यामुळे सोसिएल मीडियाचा वापर मर्यादित आणि चांगल्या उपक्रमासाठी च करावा. अथवा याचे दुष्परिणाम हि तेवढेच आहेत.

         सकारात्मक कामे: समाज उपयोगी माहिती शेअर करणे, सार्वजनिक हिताचे उपक्रम इत्यादी

          नकारात्मक कामे: समाजा मध्ये तेढ निर्माण करणारे संदेश पसरवणे, समाजविघातक उपक्रमांना प्रोत्साहन इत्यादि.

         तर 21व्या शतका कडे जात असताना समाजाच्या हित लक्षात ठेवून सोसियल मेडिया जसे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, वॉटसप यांचा योग्य रीतीने वापर करावा आणि तेच समाजाच्या आणि आपल्या हिताचे आहे.

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ. 

      

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...