संत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पांचाळ सोनार समाज

सोनार समाजामध्ये विविध अठरा पोटजाती आहेत त्यापैकी पांचाळ सोनार हि एक पोटजात आहे. पांचाळ सुतार, पांचाळ लोहार हे पांचाळ जातींपैकीच आहेत. तर फार इतिहासात न जाता अलीकडील अनुभवावरून हा लेख लिहीत आहे. 

          पांचाळ सोनार समाजातील प्रमुख पाच आडनावे आहेत जसे की महामुने, धर्माधिकारी, पंडित, दीक्षित आणि वेदपाठक. इतर आडनावे हि टोपण आडनावे समजली जातात, उदा. पोतदार, पांचाळ इत्यादी. संत नरहरी सोनार यांचे आडनाव देखील महामुनी हे होते (संदर्भ क्र. १) पांचाळ सोनारांची गोत्र देखील पाच आहेत. पांचाळ सोनार समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात शहरात आढळते आणि खेडेगावात अगदी दोन ते चार घरे असतात. पांचाळ सोनार समाज हा जास्त प्रमाणात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, लातूर, बारामती आणि पुणे या शहरात जास्त प्रमाणत आढळून येतो. 

      पांचाळ सोनार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा सोनार कारागीर असून वर्तमाण काळात या समाजातील युवक वेगवेगळा व्यवसाय व नोकरी ला प्राधान्य देत आहेत. पांचाळ सोनार समाजात उच्चशिक्षित युवकांचे प्रमाण हे अल्पशिक्षित युवकांपेक्षा खूप कमी आहे. हा समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे. समाजातील पाहुणे एकमेकास भेटल्यास सहज चर्चा होते "या आपले पांचाळ सोनाराचे घर पहायचे म्हटल्यास शंभर कोसावर एक घर" अशी चर्चा निघते. तर सांगायचे कारण म्हणजे त्यामुळे हा समाज म्हणावा तेवढा आधुनिकतेकडे आलेला नाही.

        पांचाळ सोनार समाजात बटूनची मुंज देखील होते म्हणजे जसे की वय वर्ष दहा म्हणजे बालवयात यांची मुंज करतात. मुंज करताना केस कापले जातात, छोटी शेंडी ठेवतात, बालसंस्कार करतात, जानवे परिधान केले जाते इत्यादी. आधुनिकते सोबत हल्ली जानवे वगैरे कुणी वापरत नाहीत परंतु वयस्कर लोक अजूनही जानवे परिधान करतात.

         पांचाळ सोनार समाज हा शाकाहारी आहे. त्याचप्रमाणे दैवज्ञ सोनार, दैवज्ञ ब्राह्मण सोनार, वैश्य सोनार हे देखील शाकाहारी आहेत. 

          पांचाळ सोनार आणि दैवज्ञ यांचे बरेचशे विवाह म्हणजे रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत. कारण यांनच्या खूप साऱ्या चालीरीती समान आहेत इत्यादी.

        पांचाळ सोनार समाजात समाजातीलच भटजी असतो जो वीवाह, उपनयन संस्कार, पूजा विधी करतात. मृत्यनन्तर दहावा, तेरावा हे सुद्धा हे भटजीच करतात. पेशवाईच्या काळात पेशव्यांनी या पांचाळ सोनार भटजींवर बंदी आणली होती. अलीकडील काळात हे पांचाळ सोनार भटजींचे प्रमाण कमी झाले आहे. समाज दिवसेनदिवस आधुनिकतेकडे वळत आहे.

          पश्चिम महाराष्ट्रातील पांचाळ सोनार समाज हा बऱ्यापैकी सधन आणि सुधारलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र सुधारित भाग आहे आणि सुधारित भाग म्हटल्यास सोनारांची दुकाने बऱ्यापैकी चालतात. 


           आधुनिक म्हणजे मागील दहा वर्षांपासून पांचाळ सोनार समाजाचे वधू वर मेळावे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत कारण ती काळाची गरज आहे. समाजातील घरे दूर दुर असतात कोणाचा पत्ता कोणाला नसतो म्हणून ही वधुवर मेळावा च्या ठिकाणी सर्व एकत्र येतात आणि गरज वंतांना आपला जोडीदार मिळतो. त्यापेक्षा पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि विवाह जुळवा जुळवी साठी होत आहे उदा. वॉटसप, ऑनलाईन वधुवर सूची इत्यादी. 

         या समाजातील खूप युवक उच्च अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यापारी देखील आहेत परंतु समाजाचा आधुनिक काळानुसार शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. पांचाळ सोनार समाज हा "इतर मागास वर्ग" (OBC) प्रवर्गात गणला जातो.

         हि सर्व माहिती समाज अनुभव, चर्चा आणि वाचनातून या लेखात मांडलेली आहे. तरी वाचकांपैकी अधिक माहिती असेल तर लेखाच्या शेवटी दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी.

        आधुनिक उच्चशिक्षित युवकांनी आपल्या समाजातील युवकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाज प्रगतीपथावर कसा जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.


संदर्भ:1) संत नरहरी सोनार



            

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार हे थोर संत होते त्यांचा जन्म 1313 मधील असून काही संतांच्या सांगण्यानुसार त्यांचा जन्म 1115 शतकातिल आहे. संत नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपूर येथील असून ते शैव उपासक होते, म्हणजे ते फक्त भगवान शिवाची पूजा अर्चा करत असत इतर कुठल्याही देवाची ते पूजा वगैरे करत नसत. त्यांच्या घरात शैव पूजा कृपेनेच संत नरहरी सोनार यांचा जन्म झाला आणि त्या काळातील थोर संत चांगदेव यांनी त्यांचे नाव नरहरी ठेवले आणि हा भविष्यात थोर व्यक्ती होईल असे भाकीत केले होते. 


        संत नरहरी सोनार पंढरपुरातील प्रसिद्ध कारागीर होते, दूर वरून लोक त्यांची हातचे अलनकार नेण्यासाठी येत. त्याच क्षेत्रातील प्रसिद्ध सावकाराला खूप वर्षांनी मुल झाले आणि नवस म्हणून त्याने विठ्ठल भगवन्ताला चांदीचा करदोरा देण्याचे ठरवले. त्यासाठी ते संत नरहरी सोनार यांच्या घरी आले व नवस म्हणून भगवान विठ्ठलाला चांदीचा करदोरा करण्यासाठी त्यांनी नरहरी सोनार यांस सांगितले. परंतु संत नरहरी सोनारानी मी हे कार्य करू शकत नाही आपण दुसऱ्या सोनाराकडे करा म्हणून सांगितले. 

       त्यावर सावकाराने कारण विचारले त्यावर संत नरहरी म्हणाले की आम्ही शिवा चे उपासक आहोत आणि इतर कुठल्याही देवाचे दर्शन आम्हास जमत नाही म्हणून सांगितले. पण सावकाराने नरहरी सोनाराकडेच विठ्ठलासाठी करदोरा करण्याचा हट्ट केला, नन्तर नरहरी सोनार एका अटीवर राजी झाले, ती अट म्हणजे विठ्ठलाचे करदोऱ्याचे माप आणल्यास करदोरा तयार करून देतो म्हणून.

     त्यांनतर सावकाराने ठरल्या प्रमाणे विठलाच्या कमरेचे माप घेऊन संत नरहरी सोनार याना दिले, त्यांनंतर संत नरहरी सोनारानी आपल्या कुशल कारागिरीने उत्कृष्ट असा करदोरा बनवला आणि सावकाराला दिला. सावकाराने पूजेच्या दिवशी विठ्ठलाला करदोरा बांधत असताना तो चार बोटे कमी पडू लागला, रागाने सावकार असे कसे झाले म्हणून तावातावाने नरहरी सोनाराकडे निघाले परंतु वाटेत थोडे विचार करुण त्यांनी शांततेने परत चार बोटे करदोरा वाढून देण्यास सांगितले, नन्तर परत विठ्ठलाला करदोरा चार बोटे मोठा झाल्याचे जाणवले. परत सावकार संत नरहरी सोनाराकडे गेले आणि त्याना स्वतः माप घेण्यासाठी विनवणी केली, शेवटी संत नरहरी सोनार डोळ्यावर पट्टी बांधून मोजमाप घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात येण्यास राजी झाले.


       मंदिरात जाण्यापूर्वी त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, विठ्ठल मूर्ती जवळ गेले, संत नरहरी सोनार जेव्हा विठलाच्या गळ्याभोवती हात फिरवत होते त्यावेळी त्यांना भगवान शिवाच्या गळ्यातील सापाची अनुभूती झाली, नन्तर विठ्ठलाच्या कमरेचे माप घेताना त्यांना शिवाची अनुभूती झाली, त्यांनतर परत त्यानी मूर्तीला परत चाचपडून पहिले तर डमरू आणि त्रिशूळाची अनुभूती संत नरहरी सोनार याना झाली, त्याक्षणी संत नरहरी सोनारानी डोळ्यावरील पट्टी काढली तर त्यांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले आणि डोळ्यावर पट्टी लावल्यास शिवाचे दर्शन झाले. त्या दिवशी "संत नरहरी सोनार याना शिव आणि विठ्ठल एकच आहेत" याचा साक्षात्कार झाला आणि हा साक्षात्कार झाल्यापासून  संत नरहरी सोनार विठ्ठलाचे निसिम भक्त जाहले. 

    || देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार ||

    वरील अभंग म्हणत संत नरहरी सोनार विठ्ठल भक्ती मध्ये तल्लीन होत असत. 

       इ.स. 1285 मध्ये संत नरहरी सोनार विठ्ठल अलनकृत जाहले. संदर्भ क्र.1. 

     या साक्षात्कार झाल्या नन्तर संत नरहरी सोनार प्रसिद्धीस पावले. सोनार समाजातील सर्व समाज संत नरहरी सोनार महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी करतात. 

संदर्भ

1) www.myportal.org.in

2) https://bhaktamal.co

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.



         

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...