बुधवार, २ डिसेंबर, २०२०

Depression (औदासिन्य)

या ब्लॉग चे शीर्षक इंग्रजी मध्ये देण्याचे कारण म्हणजे सध्या मराठी मध्ये चोहीकडे डिप्रेशन हा शब्द खूप लोकप्रिय किंवा प्रसिद्ध झालाय. या विषयावर चर्चा निघाली तर आपण सहज म्हणतो डिप्रेशन चा त्रास होतोय आणि तेही अगदी सहज. तर ठीक आहे, या विषयावर ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे हा आजारच तसा आहे पण दिसेनासा किंवा अदृश्य आजार आहे. उदा. सर्दी झाली की नाक गळते, ताप आल्यास शरीर तापते, खोकला आल्यास सारखे खोकलने इत्यादी. या सर्व आजाराचे लक्षणे आपल्याला जाणवतात किंवा डोळ्याने दिसतात. परंतु डिप्रेशन (उदासीनता) असा आजार आहे जो कि माणसाच्या हावभावावर किंवा दिसण्यावरून ओळखायला येत नाही. या आजाराची लक्षणे थोडी वेगळी असतात.खालीलप्रमाणे,    
 
       सतत उदास उदास वाटणे, काहीतरी खूप मोठे गमावल्या सारखे वाटणे, चिडचिडेपणा, राग-राग करणे, भूक न लागणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, तुमच्या रोजच्या जीवनमानावर परिणाम होणे किंवा तुमचा रोजचा दिनक्रम बिघडणे इत्यादी.
         आता आपण म्हणाल हा काय आजार आहे का, हे तर जीवनात कधी सुख कधी दुःख चालूच असते, हो बरोबर आहे परंतु इथेच या आजाराची कोंडी होते कारण सुख दुःख नेहमी करता नसते त्याचा काळ वेळ कधी येतो कधी जाते. 
          डिप्रेशन (उदासीनता) हि सतत चालू राहते म्हणजे, सतत महिनो न महिने उदासीन राहणे, आपल्या आवडी निवडी न समजणे, कुठल्याही आनंदच्या क्षणात पूर्णपणे सहभागी न होणे, जेवण वेळेवर नसणे, कामात मन न लागणे, वेळेवर कामे न करणे, अति झोप किंवा निद्रानाश, अति विचार, चिंताग्रस्त राहणे, आत्महत्या करण्याचे विचार,  घबराहट होणे इत्यादी.
        कारणे- उदासीनता येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात जसे कि अति जवळची प्रिय व्यक्ती गमावणे, सतत आजारपण, कॅन्सर, शुगर, अस्थमा आजारामुळे सतत चिंताग्रस्त राहणे, आजकालच्या स्पर्धेच्या युगात लवकर यश न मिळणे, सतत अपयश, सतत आर्थिक टंचाई, फसवणूक इत्यादी कारणामुळे औदासिन्य येते किंवा उदासींनतेकडे व्यक्ती वळायला लागते, अपघातामुळे शारीरिक नुकसान इत्यादी.
          या व्यतिरिक्त अनुवांशिक कारणे, तुमची शारीरिक स्वास्थ्य, मेंदू विकार इत्यादी कारणे पण असू शकतात.
        उपाय- लवकरात लवकर  मनोविकार तज्ञांंचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याना तुमच्या रोजच्या दिनक्रम मध्ये काय बदल होत आहेत स्पष्टपणे सत्य सांगणे. 
         डॉक्टर ने सांगितलेली औषधी वेळेवर घेणे आवश्यक आहेत. 
        सर्वात महत्वाचे म्हणजे औषधा सोबत तुमचे व्यायाम जसे सकाळी लवकर उठून (morning walk) करणे, किमान तीन ते चार किलोमीटर चालणे, योगासने करणे, वेळेवर जेवण, सकारात्मक विचार सरणी असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलणे, नकरात्मक विचार सरणी पासून दूर राहणे.       
        व्यसनापासून दूर राहणे, ड्रिंक टाळणे किंवा नसनेच योग्य, ड्रग वगैरे पासून दूर राहणे इत्यादी        

टीप- या माहिती मध्ये थोडक्यात माहिती संगतलेली असून विस्तृत माहितीसाठी आपण डॉक्टर शी सविस्तर बोलणे आवश्यक किंवा यावर आधारित पुस्तके वाचणे. 

संदर्भ- Healthline

💐💐💐💐💐
लेखक,
ज्ञानेश्वर पांचाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...