शनिवार, २५ मे, २०२४

पी.एच.डी ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया

मित्रानो या लेखाचे शीर्षक सांगते कि हा लेख पीएचडी विषयी माहिती सांगणार आहे. हो तर मित्रानो त्यासाठीच या ब्लॉग चे शीर्षक “पी.एच.डी. ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया” असे लिहिले आहे. असो, तर पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी काही अटी शर्ती असतात, जसे प्रत्येक वर्गात प्रवेश घेण्यासाठी असतात त्याचप्रमाणे पीएचडी ला पण प्रवेश घेण्यासाठी काही क्रायटेरिया ठरलेला असतो तो खालील प्रमाणे.

पात्रता: पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी प्रथमताः ज्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याने अगोदर पद्युत्तर पदवी (Post Graduation Eg. उदा. MA, MSC, MCA, MTECH, ME etc) पास असणे आवश्यक आहे. पीजी (Post Graduation) विषया मध्ये कमीत कमी ५५ टक्के मार्क असणे बंधनकारक असते, इथे काही विद्यापीठामध्ये पीजी टक्केवारी ची अट कमी जास्त असू शकते, परंतु सहसा ५५ टक्के असणे गरजेचे असते. त्यासाठी आपणास संबंधित विद्यापिठाच्या वेबसाईट वर जाऊन त्या वेबसाईट वर पीएचडी विषयी चे माहिती पत्र पूर्ण पणे वाचणे आवश्यक आहे, या माहिती पत्रामध्ये पीएचडी प्रवेशासाठी लागणारी सर्व माहिती व्यवस्थित रित्या दिलेली असते, तर पीएचडी ला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर संबंधित विद्यापीठाच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

      पेट किंवा नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक: पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी पीजी पास असलेल्या विद्यार्थ्याला पेट किंवा नेट किंवा सेट परीक्षा पास असणे बंधनकारक आहे. तर ज्या विध्यार्थाना पीएचडी करण्याची इच्छा आहे. त्या विध्यार्थ्यानी वरील पैकी कोणती हि एक परीक्षा पास असणे बंधनकारक आहे. पेट परीक्षेची माहिती आपणास पुढील उताऱ्या मध्ये दिलेली आहे. नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) हि परीक्षा युजीसी तर्फे वर्षातून दोन वेळेस घेतली जाते त्याची जाहिरात डिसेंबर किंवा जून जुलै मध्ये समन्धित news पेपर मध्ये येत असते किंवा आपण ugc.ac.in या वेबसाईट ला भेट देऊन नेट परीक्षे विषय पूर्ण माहिती घेऊ शकता.

      त्याचप्रमाणे सेट परीक्षा देखील राज्यशासनातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेतली जाते. सेट परीक्षेविषयी माहिती घेण्यासाठी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या वेबसाईट ला भेट देऊन सर्व माहिती मिळवू शकता.

      पेट परीक्षा: विद्यापीठाची पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी एक पात्रता परीक्षा असते. तर जे विद्यार्थी पीजी पास आहेत आणि पीएचडी ला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी पेट /नेट /सेट परीक्षा पास करणे गरजेचे आहे. पेट म्हणजे (पीएचडी प्रवेश पात्रता परीक्षा) i.e. Ph.D. entrance test. पेट परीक्षा हि प्रत्येक विद्यापीठाची सेपरेट परीक्षा असते जी कि प्रत्येक वर्षी विद्यापीठातर्फे राबवली जाते. पेट परीक्षे ची जाहिरात हि प्रत्येक news paper ला येते, जसे कि लोकमत, सकाळ, लोकसत्ता इत्यादी. तर आपण रोजचा मराठी news पेपर नक्की वाचावा ज्यामध्ये विद्यापीठ समन्धित जाहिराती येत असतात. प्रत्येक विद्यापीठाची पेट परीक्षा हि एकाच वेळी प्रसिद्ध होत नाही त्यांच्या वेगवेगळया तारखा किंवा वेगवेळ्या महिन्यात त्या त्या विध्यापिठाची परीक्षा होत असते.

    पेट परीक्षेसाठी online form भरावा लागतो, समन्धित विद्यापीठाच्या जाहिरातीमध्ये त्या पेट परीक्षेची वेबसाईट दिलेली असते. दिलेल्या वेबसाईट ला भेट देऊन आपण तो पेट परीक्षेचा पूर्ण फॉर्म भरणे आवश्यक आहे. जसे कि विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, कोणत्या विषयामध्ये पीएचडी करायची आहे त्या विषयाचे नाव, वयक्तिक माहिती, पत्ता, फोटो, ओळखपत्र, पीजी परीक्षेचे मार्क्स, online शुल्क  इत्यादी. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर फॉर्म download करावा लागतो. त्यानंतर पेट परीक्षे च्या जाहीर झालेल्या दिनांक च्या साधारणता आठ दिवस अगोदर हॉलटीकेट online समन्धित वेबसाईट वर येते, ते आपणास download करून त्याची प्रिंट घ्यावी लागते. प्रिंट घेतल्यानंतर परीक्षेच्या दिनांकदिवशी हॉल टीकेट सोबत घेऊन आपणास परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेप्रमाणे हजर राहावे लागते. परीक्षा दिल्यानंतर, परीक्षेचा निकाल साधारणतः १ ते २ महिन्यानंतर लागतो. आपला निकाल आपणास online संबंधित विद्यापीठाच्या वेबसाईट वर पाहण्यास मिळतो. त्यांमध्ये दोन ते तीन मेरीट लिस्ट लागतात त्या त्या मेरीट लिस्ट मध्ये आपले नाव आल्यास आपण पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.

तर पेट / नेट / सेट या तीन पैकी एक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपले नाव पात्रता यादीत आल्यानंतर आपण समन्धित विद्यापीठात जाऊन पीएचडी विभागात जाऊन प्रवेशासाठी लागणाऱ्या पुढील प्रक्रियेसाठी चौकशी करावी लागते. त्यासाठी आपणास विद्यापीठाच्या वेबसाईट वर पीएचडी च्या गाईड ची यादी दिलेली असते. त्या गाईड च्या यादी मधून आपणास समन्धित आपल्या विषयाच्या गाईड ची भेट घेऊन आपणास पीएचडी करण्याची इच्छा आहे हे त्यांच्याशी चर्चा करावी लागते आणि सोबत पेट परीक्षा पास झालेले मार्क्स मेमो न्यावा लागतो. आपल्या विषयाचा समन्धित गाईड आपणास गाईड करण्यास तयार असेल तर आपण समन्धित विद्यापीठातील पुढील प्रक्रीयासाठी पीएचडी विभागामध्ये चौकशी करू शकता ते आपणास पुढील मार्गदर्शन करतील.

आपणास गाईड मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे विद्यापीठाची संशोधन कमिटी समोर आपल्याला आपण पीएचडी साठी निवडलेल्या संशोधन विषयाचे प्रेझेन्टेशन द्यावे लागते, ज्यामध्ये आपल्या विषयाचे तज्ञ आपणास प्रश्नोत्तर करतात, त्यानंतर आपला पीएचडी संशोधनाचा विषय निश्चित होतो. त्यानंतर आपण पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी निवडले किंवा नाही त्याची फाईनल यादी समन्धित विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाहीर होते. त्यामध्ये आपण आपले नाव निवडले किंवा नाही हे आपणास समन्धित वेबसाईट ला भेट देऊन खात्री करून घ्यावे लागते. 

    आपले नाव शेवटच्या निवड यादीत आल्यानंतर आपण पीएचडी ला प्रवेश घेऊ शकता. प्रवेश घेण्यासाठी पुढील प्रक्रिया म्हणजे विद्यापीठातून प्रवेश फॉर्म घेणे त्यासोबत पीजी पास असलेले मार्कस्मेमो, पेट / नेट / सेट परीक्षा पास झालेले प्रमाणपत्र, प्रवेश शुल्क, जो गाईड निवडला त्या गाईड चे लेटर, ओळख पत्र (आधार कार्ड, pan कार्ड इत्यादी) ची सत्यप्रत जोडावी लागते. शेवटी आपणास हा फॉर्म समन्धित विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयात जमा करावा लागतो, त्यानंतर विद्यापीठ आपणास आपला प्रवेश निश्चित झाला किंवा नाही हे, प्रवेशित यादी मध्ये जाहीर करते, त्यासाठी आपणास विद्यापीठाच्या साम्द्न्धीत वेबसाईट ला भेट देत राहावे लागते. प्रवेश निश्चित यादीत आपले नाव आल्या नंतर आपला पीएचडी साठी प्रवेश झाला आहे हे निश्चित होते. शेवटी आपणास प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र (लेटर) दिले जाते, ज्यामध्ये आपला प्रवेश क्रमांक, आपला संशोधन विषय व गाईड चे नाव इत्यादीचा उल्लेख असतो. तिथून पुढे आपण आपल्या विषयाचे संशोधनकार्याला सुरुवात करू शकता.

तर आपण पीएचडी ला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर, आपणास पीएचडी प्रवेश घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ   





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...