सोनाचांदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोनाचांदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पांचाळ सोनार समाज

सोनार समाजामध्ये विविध अठरा पोटजाती आहेत त्यापैकी पांचाळ सोनार हि एक पोटजात आहे. पांचाळ सुतार, पांचाळ लोहार हे पांचाळ जातींपैकीच आहेत. तर फार इतिहासात न जाता अलीकडील अनुभवावरून हा लेख लिहीत आहे. 

          पांचाळ सोनार समाजातील प्रमुख पाच आडनावे आहेत जसे की महामुने, धर्माधिकारी, पंडित, दीक्षित आणि वेदपाठक. इतर आडनावे हि टोपण आडनावे समजली जातात, उदा. पोतदार, पांचाळ इत्यादी. संत नरहरी सोनार यांचे आडनाव देखील महामुनी हे होते (संदर्भ क्र. १) पांचाळ सोनारांची गोत्र देखील पाच आहेत. पांचाळ सोनार समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात शहरात आढळते आणि खेडेगावात अगदी दोन ते चार घरे असतात. पांचाळ सोनार समाज हा जास्त प्रमाणात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, लातूर, बारामती आणि पुणे या शहरात जास्त प्रमाणत आढळून येतो. 

      पांचाळ सोनार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा सोनार कारागीर असून वर्तमाण काळात या समाजातील युवक वेगवेगळा व्यवसाय व नोकरी ला प्राधान्य देत आहेत. पांचाळ सोनार समाजात उच्चशिक्षित युवकांचे प्रमाण हे अल्पशिक्षित युवकांपेक्षा खूप कमी आहे. हा समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे. समाजातील पाहुणे एकमेकास भेटल्यास सहज चर्चा होते "या आपले पांचाळ सोनाराचे घर पहायचे म्हटल्यास शंभर कोसावर एक घर" अशी चर्चा निघते. तर सांगायचे कारण म्हणजे त्यामुळे हा समाज म्हणावा तेवढा आधुनिकतेकडे आलेला नाही.

        पांचाळ सोनार समाजात बटूनची मुंज देखील होते म्हणजे जसे की वय वर्ष दहा म्हणजे बालवयात यांची मुंज करतात. मुंज करताना केस कापले जातात, छोटी शेंडी ठेवतात, बालसंस्कार करतात, जानवे परिधान केले जाते इत्यादी. आधुनिकते सोबत हल्ली जानवे वगैरे कुणी वापरत नाहीत परंतु वयस्कर लोक अजूनही जानवे परिधान करतात.

         पांचाळ सोनार समाज हा शाकाहारी आहे. त्याचप्रमाणे दैवज्ञ सोनार, दैवज्ञ ब्राह्मण सोनार, वैश्य सोनार हे देखील शाकाहारी आहेत. 

          पांचाळ सोनार आणि दैवज्ञ यांचे बरेचशे विवाह म्हणजे रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत. कारण यांनच्या खूप साऱ्या चालीरीती समान आहेत इत्यादी.

        पांचाळ सोनार समाजात समाजातीलच भटजी असतो जो वीवाह, उपनयन संस्कार, पूजा विधी करतात. मृत्यनन्तर दहावा, तेरावा हे सुद्धा हे भटजीच करतात. पेशवाईच्या काळात पेशव्यांनी या पांचाळ सोनार भटजींवर बंदी आणली होती. अलीकडील काळात हे पांचाळ सोनार भटजींचे प्रमाण कमी झाले आहे. समाज दिवसेनदिवस आधुनिकतेकडे वळत आहे.

          पश्चिम महाराष्ट्रातील पांचाळ सोनार समाज हा बऱ्यापैकी सधन आणि सुधारलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र सुधारित भाग आहे आणि सुधारित भाग म्हटल्यास सोनारांची दुकाने बऱ्यापैकी चालतात. 


           आधुनिक म्हणजे मागील दहा वर्षांपासून पांचाळ सोनार समाजाचे वधू वर मेळावे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत कारण ती काळाची गरज आहे. समाजातील घरे दूर दुर असतात कोणाचा पत्ता कोणाला नसतो म्हणून ही वधुवर मेळावा च्या ठिकाणी सर्व एकत्र येतात आणि गरज वंतांना आपला जोडीदार मिळतो. त्यापेक्षा पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि विवाह जुळवा जुळवी साठी होत आहे उदा. वॉटसप, ऑनलाईन वधुवर सूची इत्यादी. 

         या समाजातील खूप युवक उच्च अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यापारी देखील आहेत परंतु समाजाचा आधुनिक काळानुसार शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. पांचाळ सोनार समाज हा "इतर मागास वर्ग" (OBC) प्रवर्गात गणला जातो.

         हि सर्व माहिती समाज अनुभव, चर्चा आणि वाचनातून या लेखात मांडलेली आहे. तरी वाचकांपैकी अधिक माहिती असेल तर लेखाच्या शेवटी दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी.

        आधुनिक उच्चशिक्षित युवकांनी आपल्या समाजातील युवकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाज प्रगतीपथावर कसा जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.


संदर्भ:1) संत नरहरी सोनार



            

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...