फॉलोअर

भारतीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारतीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

१५ ऑगस्ट भारतीय स्वतंत्रता दिवस

 1947 मध्ये ब्रिटीश औपनिवेशिक राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. ब्रिटिश संसदेकडून भारतीय संविधान सभेकडे वैधानिक सार्वभौमत्व हस्तांतरित करून, 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा अंमलात आणल्याचा दिवस आहे. या कायद्यामुळे भारताची दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये फाळणी झाली: भारत आणि पाकिस्तान.


 स्वातंत्र्यदिनी, ध्वजारोहण समारंभ, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर भाषणे यांसह संपूर्ण भारतात विविध उत्सव कार्यक्रम आयोजित केले जातात. मुख्य कार्यक्रम राजधानी नवी दिल्ली येथे होतो, जेथे भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभारतात आणि राष्ट्राला भाषण देतात. या कार्यक्रमाला मान्यवर, परदेशी मुत्सद्दी आणि नागरिक उपस्थित आहेत.

स्वातंत्र्य दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सुट्टी आहे, आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानावर विचार करण्याची आणि देशाची सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगती साजरी करण्याची ही वेळ आहे. हा दिवस अनेकदा देशभरात देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाच्या प्रदर्शनाद्वारे चिन्हांकित केला जातो.

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

माजलगाव धरण

माजलगाव येथील धरण हे सिंदफणा नदीवर बांधले असून, हे धरण बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचन आणि विद्युत निर्मिती होय. हे धरण माजलगाव शहरापासून चार किलोमीटर दूर आहे. आणि अलीकडच्या काळात पिण्यासाठी देखील या धरणाचे पाणी वापरत आहेत.


       माजलगाव येथील धरण बांधकाम करण्याची सुरवात हि 1977 साली झाली होती व साधारण 1986 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जवळपास 3840 चौरस किलोमीटर परिसर पाणलोट क्षेत्र या धरणा ने व्यापले आहे. धरणाची एकूण जल संग्रह क्षमता हि 454 दशलक्ष घण मीटर एवढी असून त्या पैकी 312 दसलक्ष घनमीटर उपयुक्त साठा या जलाशयात उपलब्ध आहे.

      या धरणाची उंची नदी पात्रापासून साधारण 31 मीटर उंच असून, लांबी हि 4668 मीटर आहे. सांडव्याची लांबी साधारण 239 मिटर एवढी आहे.

      धरणामध्ये एकूण बुडणरे क्षेत्र हे 7813 हेक्टर एवढे आहे, या धरणा मध्ये जवळपास 20 बुडीत गावे आहेत. या धरणासाठी 5600 tmc मातीकाम झाले असून 116 tmc दगड काम झाले आहे. 


      पैठण च्या नाथ सागरातून उजव्या कालव्याचे पाणी या धरणाला मिळते. एकूण 13 लक्ष हेक्टर लाभक्षेत्र असून, पैकी सव्वा लाख हेक्टर लागवडी साठी लाभ क्षेत्र होय आणि सिंचनासाठी जवळपास 1 लाख हेक्टर उपयुक्त झालेले आहे. त्याच बरोबर विद्युत निर्मिती साठी सुद्धा या धरणाचा वापर होतो. त्यासाठी तीन संच बसवले असून त्यामधून साधारण 2250 किलो वॉट विद्युत निर्मिती होते. 

       तर अशी ही माजलगाव धरणाची एकूण माहिती असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या धरणामुळे सुजलाम सुफलाम झालेले आहेत.

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पांचाळ सोनार समाज

सोनार समाजामध्ये विविध अठरा पोटजाती आहेत त्यापैकी पांचाळ सोनार हि एक पोटजात आहे. पांचाळ सुतार, पांचाळ लोहार हे पांचाळ जातींपैकीच आहेत. तर फार इतिहासात न जाता अलीकडील अनुभवावरून हा लेख लिहीत आहे. 

          पांचाळ सोनार समाजातील प्रमुख पाच आडनावे आहेत जसे की महामुने, धर्माधिकारी, पंडित, दीक्षित आणि वेदपाठक. इतर आडनावे हि टोपण आडनावे समजली जातात, उदा. पोतदार, पांचाळ इत्यादी. संत नरहरी सोनार यांचे आडनाव देखील महामुनी हे होते (संदर्भ क्र. १) पांचाळ सोनारांची गोत्र देखील पाच आहेत. पांचाळ सोनार समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात शहरात आढळते आणि खेडेगावात अगदी दोन ते चार घरे असतात. पांचाळ सोनार समाज हा जास्त प्रमाणात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, लातूर, बारामती आणि पुणे या शहरात जास्त प्रमाणत आढळून येतो. 

      पांचाळ सोनार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा सोनार कारागीर असून वर्तमाण काळात या समाजातील युवक वेगवेगळा व्यवसाय व नोकरी ला प्राधान्य देत आहेत. पांचाळ सोनार समाजात उच्चशिक्षित युवकांचे प्रमाण हे अल्पशिक्षित युवकांपेक्षा खूप कमी आहे. हा समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे. समाजातील पाहुणे एकमेकास भेटल्यास सहज चर्चा होते "या आपले पांचाळ सोनाराचे घर पहायचे म्हटल्यास शंभर कोसावर एक घर" अशी चर्चा निघते. तर सांगायचे कारण म्हणजे त्यामुळे हा समाज म्हणावा तेवढा आधुनिकतेकडे आलेला नाही.

        पांचाळ सोनार समाजात बटूनची मुंज देखील होते म्हणजे जसे की वय वर्ष दहा म्हणजे बालवयात यांची मुंज करतात. मुंज करताना केस कापले जातात, छोटी शेंडी ठेवतात, बालसंस्कार करतात, जानवे परिधान केले जाते इत्यादी. आधुनिकते सोबत हल्ली जानवे वगैरे कुणी वापरत नाहीत परंतु वयस्कर लोक अजूनही जानवे परिधान करतात.

         पांचाळ सोनार समाज हा शाकाहारी आहे. त्याचप्रमाणे दैवज्ञ सोनार, दैवज्ञ ब्राह्मण सोनार, वैश्य सोनार हे देखील शाकाहारी आहेत. 

          पांचाळ सोनार आणि दैवज्ञ यांचे बरेचशे विवाह म्हणजे रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत. कारण यांनच्या खूप साऱ्या चालीरीती समान आहेत इत्यादी.

        पांचाळ सोनार समाजात समाजातीलच भटजी असतो जो वीवाह, उपनयन संस्कार, पूजा विधी करतात. मृत्यनन्तर दहावा, तेरावा हे सुद्धा हे भटजीच करतात. पेशवाईच्या काळात पेशव्यांनी या पांचाळ सोनार भटजींवर बंदी आणली होती. अलीकडील काळात हे पांचाळ सोनार भटजींचे प्रमाण कमी झाले आहे. समाज दिवसेनदिवस आधुनिकतेकडे वळत आहे.

          पश्चिम महाराष्ट्रातील पांचाळ सोनार समाज हा बऱ्यापैकी सधन आणि सुधारलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र सुधारित भाग आहे आणि सुधारित भाग म्हटल्यास सोनारांची दुकाने बऱ्यापैकी चालतात. 


           आधुनिक म्हणजे मागील दहा वर्षांपासून पांचाळ सोनार समाजाचे वधू वर मेळावे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत कारण ती काळाची गरज आहे. समाजातील घरे दूर दुर असतात कोणाचा पत्ता कोणाला नसतो म्हणून ही वधुवर मेळावा च्या ठिकाणी सर्व एकत्र येतात आणि गरज वंतांना आपला जोडीदार मिळतो. त्यापेक्षा पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि विवाह जुळवा जुळवी साठी होत आहे उदा. वॉटसप, ऑनलाईन वधुवर सूची इत्यादी. 

         या समाजातील खूप युवक उच्च अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यापारी देखील आहेत परंतु समाजाचा आधुनिक काळानुसार शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. पांचाळ सोनार समाज हा "इतर मागास वर्ग" (OBC) प्रवर्गात गणला जातो.

         हि सर्व माहिती समाज अनुभव, चर्चा आणि वाचनातून या लेखात मांडलेली आहे. तरी वाचकांपैकी अधिक माहिती असेल तर लेखाच्या शेवटी दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी.

        आधुनिक उच्चशिक्षित युवकांनी आपल्या समाजातील युवकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाज प्रगतीपथावर कसा जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.


संदर्भ:1) संत नरहरी सोनार



            

Featured post

मुलीना मोफत शिक्षण ? याचे काय झाले 'अ‍ॅडमिशनवेळीच भरायला पैसे नाहीत, नंतर मिळालेल्या लाभाचं काय करू?'

  "अ‍ॅडमिशन फी इतकी होती की, घरचे पुढे शिक्षण घ्यायलाच नको म्हणत होते. वडील म्हणाले, काय करायचंय पुढं शिक्षण घेऊन?" असं तेजस्विनी ...