रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

भारतीय आरोग्यव्यवस्था

भारतीय आरोग्यव्यवस्था अतिशय कमकुवत असल्याचे खरी जाणीव आपणास मागील नऊ महिन्यात प्रकर्षाने जाणवले. कारण कोरोना चा प्रादुर्भाव, संचारबंदी आणि दवाखाने व डॉकटरची कमतरता हे सर्व अनुभव भारतीय लोकांनि पहिल्यांदा जवळून अनुभवले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रति 1000 व्यक्तिमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे, परंतु भारतात हेच प्रमाण तीन ते चार हजार व्यक्तिमागे एक डॉक्टर असे आहे. देशाच्या बजेट मधील किमान 5 टक्के खर्च आरोग्यावर होणे आवश्यक असताना केवळ एक टक्का खर्च हा आरोग्य व्यवस्थेवर होत असून ही मोठी शोकांतिका आहे. 

          बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मी रहिवाशी असलंयामुळे तेथील परिस्थिती जवळून पहिली आहे आणि लहान पणा पासून अनुभवतोय. माजलगाव हा तालुका असून जवळपास सत्त्तर खेडी या तालुक्यात येतात. माजलगावत एक सरकारी इस्पितळ आहे आणि तिथे केवळ तीन डॉक्टर व इतर सहाययक नर्स, कम्पाऊंडर असतात. परंतु यातील एखादा डॉक्टर सुट्टीवर असेल तर येथील आरोग्य व्यवस्ता कोलमडली जाते. कारण पेशन्ट रोजचे जवळपास अंदाजे सातशे ते हजार असतात, त्यामध्ये प्रसूती महिला, शुगर, हाडाचे बरेच पेशन्ट असतात. मग सरकारने याकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला काय अडचण आहे. कारण हा आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न असतो. खाजगी दवाखान्यात अव्वाच्या सव्वा फी असते, मध्यमवर्गीयांना ती परवडत नाही. यावर उपाय करणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. एखादा गंभीर आजाराचा पेशन्ट असेल तर त्याला हमखास बीड, अंबाजोगाई किंवा औरंगाबाद ला न्यावे लागते. मग तो पेशन्ट तिथपर्यंत जाई पर्यंत जगेल याची शाश्वती नसते. यावर खूप अगोदर उपाय होणे आवश्यक होते परंतु आजही हि परिस्थिती वीस वर्षापासून आहे तशीच आहे. याला जबाबदार स्थानिक पुढारी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार.
           अमर्त्य सेन यांनी टाटा च्या एका कार्यक्रमात म्हटले की भारतापेक्षा लहान असलेले देश श्रीलंका, बांगलादेश, भूतान हे आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहेत, भारताची परिस्थिती किती कमकुवत आहे हे यावरून 100% माहिती होते. 
            भारतीय राजकारण्यांनी प्रत्येक क्षेत्रात असे विचित्र राजकारण केल्यामुळे हि परिस्थिती भारतावर ओढवली आहे. सरकारी योजना जसे आयष्मांन भारत, आरोग्यदूत इत्यादी यांची काटेकोर अमल बजावणी होणे गरजेचे आहे. सरकारी आरोग्य सेवा देताना त्यामध्ये सवलती असणे देखील आवश्यक आहे. 
          दिल्ली मध्ये केजरीवाल सरकारने जी व्यवस्था केली त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्थेमध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या आहेत. दिल्ली मध्ये मोहल्ला क्लिनिक प्रत्येक भागामध्ये दिले आहेत, सरकारी दवाखाने उच्च दर्जाची बनवली असून तेथे तज्ञ डॉक्टर लोकांना हि काटेकोर नियम केले आहेत, असेच उपाय पूर्ण भारतात होणे आवश्यक आहे, तरच भारताची आरोग्य व्यवस्था सुधारेल.

संदर्भ

लेखक, 
ज्ञानेश्वर पांचाळ. 
          

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

Family (कुटुंब)

कुटुंब हा शब्द कानावर पडला की आपणास आपले प्रथम आई वडील, बहीण-भाऊ आणि आपले घर डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये आपल्या कुटुंबातील लहानपणापासून आपला चालत आलेला प्रवास आठवतो. कुटुंब एक असे घर असते जिथे सर्व आपले रक्त नात्यातील व्यक्ती असतात. कुटुंबात आजी आजोबा हे पण असतात. आजी आजोबा असलंयास त्या कुटुंबाची रंगत आणि अनुभव हा शब्दात मांडणे थोडे अवघडच आहे. आजी आजोबा असलयास ते नातवाचा संभाळ करतात आणि आई वडिलांच्या व्यस्त जीवनात तो एक प्रकारचा आधारच असतो. 


          हल्लीच्या जीवन पहिले तर दोन प्रकारच्या कुटुंब पद्धती प्रकर्षाने दिसून येतात पहिली म्हणजे एकत्र कुटुंब आणि दुसरी म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. एकत्र कुटुंबात आई-वडील, भाऊ-भाऊ, सुना, नातू, पणतु हे सर्व एकत्र राहतात. विभक्त कुटुंबात भाऊ-भाऊ लग्न झाल्यानन्तर वेगळे राहतात. आई-वडील काही दिवस एका मुलाकडे तर काही दिवस दुसऱ्या मुलाकडे राहतात. पण या दोन्हीमध्ये एकत्र राहणारे कुटुंब जास्त सुखी आणि समाधानी असते, पण सर्व कामे समजुतीने केली तर. एकत्र कुटुंबात कुणी एक जणाने जरी समजदारीने राहिले नाही तर हे कुटुंब हि कालांतराने विभक्त होतात.

         शहरी भागात तर विभक्त कुटुंब पध्दती सर्रास आहे, कारण पती-पत्नी नोकरीला असतात मग घरकाम कोण करणार यावर वाद तयार होतात किंवा एक सून सर्व घरातले काम करण्यास तयार नसते. असे हे कुटुंबातील वेगवेगळ्या कारणामुळे विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. परंतु खेड्या मध्ये हि एकत्र कुटुंब पद्धती मुले लग्नाला येईपर्यंत एकत्र राहतात. 

       ज्यांना एकच मुलगा आहे त्यांना त्या एकट्या मुलासाठीच सर्व प्रपंच करावा लागतो आणि तो मुलगाही दूर गावी किंवा विदेशात नोकरी ला गेल्यास त्या वृद्ध आई वडिलांची खायची आणि सम्भाळायची पंचाईत होते. मुलगा एकुलता एक असेल तर तो आहे त्याच गावात राहून जॉब किंवा व्यवसाय करत असेल तर त्यांचे वृद्ध आई वडिलांचे व्यवस्थित चालते. कारण मुलगा मेट्रो सिटीत नोकरी ला असल्यास तेथील वातावरण, जसे कि दोन किंवा तीन रूम चा फ्लॅट मध्ये रहावे लागते.  वृद्ध माणसांना थोडे मोकळी हवा असणंऱ्या ठिकाणी राहणे सोयीचे असते. परंतु मेट्रो सिटी मध्ये असे घर मिळणे अत्यन्त कठीण जाते. त्यामुळे वृद्ध माणसांना जगणे खूप कठीण जाते त्यावर उपाय म्हणून यावर उपाय म्हणून ही वृद्ध माता पिता मंदिरात जाऊन, नातवे असतील त्यांच्यासोबत वेळ घालवतात. परंतु मेट्रो सिटी मध्ये आणि फ्लॅट सोसायटी मध्ये मंदिर आणि भजन कीर्तन पहायला मिळत नाहीत. तर मेट्रो सिटीचे हेही दुष्परिणाम आहेत. 

          तर काळानुसार मेट्रो सिटी मधील वृद्ध माता-पित्यांचे हाल असतात हे मात्र तेवढे खरेच आहे. यावर मेट्रो सिटीतील शासन कर्त्यांनी थोडा विचार विनिमय करून योग्य त्या सोयी वृद्धांसाठी करायला हव्यात. तर अशी हि महाराष्ट्रातील कुटुंब पद्धती आहे, सुख-दुःखात सर्व नातेवाईक एकत्र येतात आणि सुख-दुःख आंनदाने वाटून घेतात. आणि कुटुंबात हे सुख-दुःखात एकत्र आलेच पाहिजे आणि असणे आवश्यक आहे. 

💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ. 


शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

दीपावली

दीपावली या सणाला दिवाळी किंवा दीपावली म्हटले जाते. दोन्हीही शब्द दीप आणि दिवा या वरून तयार झालेले आहेत. दिवाळी सण हा हिंदु धर्मियांचा सणापैकी एक मोठा सण आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण या दिवशी घरोघरी सांयकाळी तेलाचे दिवे, आकाशदिवे खूप आवडीने लावले जातात, दारा समोर महिला रांगोळ्या काढतात. या सणानिमित्त शासकीय सुट्ट्या 15 ते 20 दिवस दिल्या जातात. दरवर्षी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.


         एका कथेनुसार प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला सीतेला घेऊन परत आले होते त्यावेळी सर्व आयोद्धया वासीयांनी दिवे लावून आंणदोत्सव साजरा केला होता. दिवाळी सणामध्ये नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, लक्ष्मीपूजन इत्यादी एकामागोमाग साजरे केले जातात. नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला होता म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते, बलिप्रतिपदा या सणाला दिवाळी पाडवा सुद्धा म्हणतात या दिवशी नवीन वह्या, व्यापारी लोक नवीन खतावणी साठी नवीन खातेवही ची पूजा अर्चा करून नवीन वर्षाची सुरुवात करतात "इडा पीडा टळूदे व बळीचे राज्य येऊदे" म्हणून बलिप्रतिपदा साजरी केली जाते, भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. सासरी गेलेल्या बहिणी माहेरी दिवाळी निमित्त आनंद साजरा करण्यासाठी येतात. लक्ष्मीपूजनादिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते व देवी समोर नवीन वही किंवा नवीन वर्षाची रोजनिशी ठेऊन संकल्प केले जातात. असे विविध सण या दीपावली मध्ये साजरे केले जातात. 

        दीपावली ची वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांना खूप सारे फटाके वाजवायला मिळतात, त्याबरोबर दिवाळीचा फराळ खायला मिळतो व हा फराळ खूप लोकप्रिय असतो. या सणामध्ये वेगवेगळे गोड पदार्थ आवडीने घरीच बनवले जातात. नुक्तीचे लाडू, चिवडा, शनकरपाळे, काठिशेव, शेव इत्यादी. असा हा सण सर्वांच्या आवडीचा आणि आनंदोत्सव साजरा करण्याचा असतो. गरीब श्रीमंत सर्व जण आपापल्या परीने खूप आनंदाने हा सण साजरा करतात. 

           या सणाला दरवर्षी वेगवेगळे दिवाळी अंक बाजारात येतात ज्यामध्ये विविध लेख आणि माहितीपूर्ण अंक लिहिलेले असतात. बरेचशे वाचक आवडीने दिवाळी अंक दरवर्षी आवर्जून घेतात. 

          या दिवशी ध्वनी वर्धक फटाके वाजवू नये म्हणून सरकार तर्फे बातम्या मध्ये सतत सांगितले जाते. पर्यावरणासाठी फटाके, सुतळी बॉम्ब हे घातक असतात. बऱ्याचशा घटना घडतात, जसे फटाक्या मुळे हात भाजणे, डोळा जाणे इत्यादी. 21 व्या शतकाकडे जात असताना फटाके वाजवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, पर्यावरणपूरक दिवाळी अनेक युवक साजरी करत आहेत.

           यावर्षी कोरोना (korona) मुळे सर्वांनी दिवाळी साध्या आणि शांत वातावरणात साजरी केली, त्याबद्दल आपना सर्वांचे अभिनंदन. तर अशी ही दिवाळी सर्वांच्या घरात आंनदाने साजरी केली जाते त्याबद्दल सर्वाना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐

लेखक, 

ज्ञानेश्वर पांचाळ. 💐💐

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

खाजगी शिक्षण vs सरकारी शिक्षण

खाजगी शिक्षण आणि सरकारी शाळा,  महाविद्यालय किंवा विद्यापीठ असो सर्वांची तुलना केली तर शिक्षण क्षेत्रामध्ये बाजारीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आणि होत असलेले जाणवते. याचे कारण म्हणजे सरकार चे दुर्लक्ष किंवा सरकारला यामध्ये बदल करणे खूप किचकट किंवा त्यांच्या फायद्याचे नसल्यामुळे कदाचित याकडे सरकार म्हणावे तसे लक्ष देत नाही.

 

       आपण नेहमी पाहतो सरकारी शाळा सध्या बऱ्याचशा बंद पडल्या आहेत आणि काही ज्या थोडया बहोत राहिल्या आहेत त्या शाळेत हि शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. मी ज्या सरकारी जील्हा परिषद  शाळेत 1995 ते 2001 शिकायला होतो तेंव्हा आम्हाला शिकवायला खूप अनुभवी आणि ज्ञानी शिक्षक होते. वर्गात सतत वर्ग होत असत, प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक होते त्यामुळे प्रत्येक विषयाचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होत असे. तुलनेने गावातीलच इतर खाजगी शाळेचा चर्चा आणि मोठेपणा खूप होत असे. उदा. खाजगी शाळा खूप छान आहे, सर्व विद्यार्थी रोज स्वच्छ गणवेशात आणि दप्तर पेटी घेऊन रोज जातात,  पालकांचे सतत सम्पर्क वगैरे वगैरे. सरकारी शाळेत मात्र गणवेश एखादया विद्यार्थ्यांकडे नसला तरी सर त्या विद्यार्थ्यांना गणवेश आणन्यासाठी जब्रदस्ती करत नव्हते कारण सर्व विद्यार्थी सामान्य घरचे असायचे, जास्त प्रमाण मजुरी करणार्याचें मुले असायचे. परंतु मुख्य मुद्दा म्हणजे शिक्षण खूप चांगले दिले जात होते. प्रत्येक धडा शिकवला कि गृहपाठ दिला जात असे, चाचणी परीक्षा आणि दहावीच्या परीक्षेसाठी खूप जास्त लक्षपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असे. तसे खाजगी शाळेतील मुले शिकवणी ला सायकल वर जाताना खूप मोठ्या प्रमाणात दिसत असे. विचार करा सरकारी शाळेपेक्षा खाजगी शाळेत किंवा महाविद्यालयात फीस खूप जास्त असते तरीही खाजगी शाळेतील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी शिकवणी लावण्यास पुढे का असतात? हे थोडे विचार करण्यासारखेच आहे. 

           सुरवातीला तर खाजगी शाळा नव्हत्या त्या काळात मोठे IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर याच शाळेतून घडले, मग मागच्या वीस वर्षांत असे कोणते बदल झाले की सरकारी शाळा बंद पडण्याची वेळ आली. सरकारने हळूहळू खाजगिकर्णाला प्रोत्साहन देत गेले, आणि शिक्षणाचे सत्त्तर टक्क्या पेक्षा जास्त बाजारीकरण होत आले आहे. याचा परिणाम असा झाला की गरीब श्रीमंत यातील दरी अजून वाढत गेली. शिकवणीची संख्या वाढली आणि येणाऱ्या काळात शाळा केवळ प्रवेश घेण्यासाठीच राहतील कि काय अशा शंका निर्माण होत आहेत. 


       मागील पाच वर्षांपासून दिल्ली मध्ये केजरीवाल सरकार ने सरकारी शाळा आणि सरकारी सुविधे मध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. उच्च अधिकाऱ्याचा पाल्य आणि सामान्य घरातील पाल्य एकाच वर्गात शिकतील. नवीन इमारती ज्या फक्त खाजगी शाळेत बगायला मिळत होत्या, पण आता तिथे सरकारी शाळेत केजरीवाल सरकारने नवीन इमारती साठी मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन बदल करून घेतलेत. मग प्रश्न असा पडतो तोच आराखडा इतर राज्यातही लागू करता येऊ शकत नाही का? पण इतर राज्याच्या सरकारला मुळात इच्छाच नाही कि सरकारी शाळा अशा खाजगी शाळे पेक्षा मजबूत आणि सर्वसुविधा युक्त व्हाव्यात. 

         या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांचा तुलनात्मक अभ्यास केला तर सरकारी सोयी सुविधाच जनतेच्या हिताच्या आहेत. जनतेने असेच सरकार निवडावे जे जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. "सार्वजनिक सोयी सुविधा योग्य रीतीने देणारे सरकार". आपण पाहतोय कि छोट्या गल्लीत सुद्धा ज्युनियर केजी, सिनिअर केजी चे वारे खूप मोठया प्रमाणात वाहत आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. कारण शिक्षण जगण्यासाठी असते, तेच शिक्षण देण्यासाठी पालकांना आयुष्य खर्ची करावे लागत असेल तर यांसारखी शोकांतिका कुठली नाही. 

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ

क्रमश: 

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

भारतीय संशोधन आणि फेलोशिप (copy of previous blog)

संशोधन हे खूप अभ्यासु, जिज्ञासा वाढवणारे, ज्ञानात भर पाडणारेआणि छान काम आहे.  संशोधनामुळे बऱ्याचशा नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळतात. भारत देशामध्ये इतर देशांच्या तुलनेत संशोधनाला एवढे महत्व दिले जात नाही, विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी लागणारे प्रोत्साहन दिले जात नाही, जेवढे महत्व इतर देशात दिले जाते तेवढे भारतामध्ये दिले जात नाही. 


       विद्यापीठात वेगवेगळ्या फेलोशिप मिळवण्यासाठी खूप वेगवेगळ्या वेबसाईट वर जाऊन त्यावर लागणारी माहिती सविस्तर भरावी लागते, सोबत वेगवेगळी document (कागदपत्रे) जोडावी लागतात (स्कॅन करून अपलोड करावी लागतात), नन्तर इन्स्टिट्युट चा विद्यार्थी आहे त्याचे (व्हेरिफाईड) खात्रीसाठी स्टॅम्प सहीत कागदपत्र लागतात, शेवटी तुमचा संशोधन विषयी सिनोप्सीस प्रत जोडावी लागते. एवढे सर्व पाठवून शेवटी हजारो फॉर्म पैकी केवळ एका विद्यापीठातून सर्व विषय मिळून केवळ 3 ते 4 विद्यार्थी फेलोशिप साठी निवडले जातात. 

        एक फेलोशिप चा फॉर्म भरन्यासाठी एक ते दोन आठवडे सहज निघून जातात. ज्याला फेलोशिप नाही मिळाली तो साहजिकच दुसरी फेलोशिप साठी apply करतो. परत दुसऱ्या फेलोशिप 2 ते 3 आठवडे वेळ खातात, मधेच तांत्रिक अडचणी येतात, तारीख आलेली कळत नाही, कळाली तरी वेळ पुरत नाही. काही वेळेस घाई मध्ये चूकीचे document (कागदपत्र) ऑनलाईन जोडली जातात. एवढे सर्व प्रक्रिया करून पहिल्या चार विद्यार्थ्यांची निवड होते, त्यामध्ये आरक्षण हा प्रकार. बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करायची आणि बातम्या छापायच्या, कि विद्यापीठात या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाली. आकडेवारी व्यवस्थित काढली तर बरेचशे गुणवंत विद्यार्थी निघतील कि ज्यांना वास्तविक फेलोशिप मिळायला हवी होती पण त्यांना ती मिळत नाही. याला कारण म्हणजे विद्यापीठ व्यवस्थापन समिती, हे सर्व समिती मधील सदस्यांना हे नियोजन व्यवस्थित जमले नाही किंवा त्यांनी तेवढी खोलवर त्याचे आकलन केले नाही. 

        या सर्व फेलोशिप मिळणाऱ्या मध्ये त्रुटी सांगण्या मागच्या कारण म्हणजे गरजवंत गुंवत्ताधारकाला फेलोशिप न मिळता तुटपुंजा तेही गुणवत्ता खरेच आहे का नाही याची खात्री न करता फेलोशिप दिली जाते. माज्या संशोधनातील अनुभवानुसार विद्यापीठात जेवढे पण संशोधक विद्यार्थी असतील जसे की पी.एचडी. किंवा एम.फील. करणारे, या सर्व विद्यार्थ्यांना महागाई भत्ता धरून, साधारण त्या विद्यार्थ्यांचा मेस चा खर्च अधिक खोलीभाडे अधिक मेडिकल अधिक संशोधन साहित्य खरेदी विक्री हे सर्व खर्चाचे आकलन केले तर, 2020 च्या महागाई नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे संशोधन पूर्ण होईपर्यंत किमान 20000/- रुपये (stipend) मानधन देण्यात यावे नव्हे द्यायलाच हवे. 

        विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या फेलोशिप मंजूर झालेल्या आहेत व या सर्व विविध फेलोशिप चे एक विद्यापीठ स्तरावर खाते उघडून, सर्व रक्कम एकत्र करून, सर्वच संशोधक विद्यार्थ्यांना समान फेलोशिप द्यावी आणि ते अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे, यामुळे संशोधनाची गुणवत्ता आणि दर्जा वाढेल. शिक्षण क्षेत्राची जी पडझड झालीय ती लवकरात लवकर सुधारेल. 

       हा ब्लॉग शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री, शास्त्रद्य आणि ज्यांच्या हितासाठी हा ब्लॉग लिहिला ते हणजे संशोधक विद्यार्थी यांनी हा ब्लॉग आवर्जून वाचावा आणि योग्य प्रतिक्रिया द्यावी हि नम्र विनंती. महाराष्ट्र सरकार आणि खासकरून UGC फेलोशिप समिती च्या सदस्यांनी यावर योग्य मार्ग काढावा जेणे करून हा ब्लॉग लिहिल्याचे सार्थक होईल. 

धन्यवाद!
ज्ञानेश्वर पांचाळ,
एक संशोधक विद्यार्थी.

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाच्या मथळ्या वरून आपल्या डोळ्या समोर अंगात येणाऱ्या लोक आठवतात जास्त करून महिलांच्या अंगात येते परंतु काळानुसार खूप बदल होत आहेत. सध्या विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान युग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे त्याचप्रमाणे अंगात वगैरे येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. शहरी भागात तुरळीक ठिकाणी अंगात येते तसेच ग्रामीण भागात हि याचे प्रमाण दशकापूर्वीचा विचार केला तर खूप कमी झालेले आहे. 


          तरीही इतर अंधश्रद्धा आहेतच. जसे रस्त्यावर हात पाहून भविष्य सांगणारे लोक, घरावर मिरची किंवा नजर लागू नये म्हणू काळा कपडा लावलेली बाहुली लावणे, घरामध्ये वादविवाद होत असतील तर कुणीतरी जाणता व्यक्ती असतो त्याच्या कडे जाऊन त्याला घरातील वाद विवादावर तोडगा काढणे त्यासाठी हा जाणता माणूस वेगवेगळे उपाय नाहक सांगतो जसे काहीतरी शांती करा, हे उपवास करा, याची पूजा करा, त्यांना दान करा, कोंबडे बकऱ्याचा बळी द्या इत्यादी. हे सांगायचा उद्देश म्हणजे आजही लोक या जाणत्या लोकांनी सांगितलेले उपाय करतात त्यामध्ये मग काही सुशिक्षित घरातील लोक हि असतात. हे सर्व ठीक आहे परंतु आपण एकविसाव्या शतकाकडे जात असताना नरबळी सारखी बातमी वाचण्यात येते हि मोठी शोकांतिका आहे. 

          मी श्रद्धेच्या विरुद्ध नाही ज्याची त्याची श्रद्धा आणि भावना असते परंतु श्रद्धा करता करता आपण कुठे तरी अंधश्रद्धेकडे वळायला लागतो हे घातक आहे. धकाधकीचे जीवन आहे तसे तुम्हाला अडचणी येणारच पण त्यावर उपाय म्हणून अशा जाणत्या व्यक्ती कडे जाणे योग्य नाही. त्यातून उपाय तर होत नाही परंतु माणूस भरकटून जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन असायला हवा, वास्तविकतेला धरून निरीक्षण करावे, त्यावर नक्कीच उपाय असतो. बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत कुठे कोंम्बड किंवा बकरे कापले जाते हे अतीच होते. 

           लोकांच्या या अंधविश्वासाचा गैरफायदा हे भोंदू बाबा लोक खूप मोठया प्रमाणात घेतात यांचा हा शिल्लक व्यवसाय झाला आहे. बऱ्याचशा तरुण वर्ग आता याकडे फिरकत नाही ही चांगली गोष्ट आहे. परंतु महिला वर्ग या बाबतीत अजूनही म्हणावा तेवढा सजग नाही. त्यांच्यासाठी प्रबोधन होणे आवश्यक आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा देखील वाढणे अत्यन्त आवश्यक आहे. कारण म्हण आहेच की "स्त्री शिकली घराची प्रगती झाली" त्यामुळे महिला जागृत होणे अत्यन्त आवश्यक आहे.

           आपण पाहतो महिला वर्ग त्यांच्या घरातील कामात खूप व्यस्त असतात, त्यांना कुठे असे प्रबोधनात्मक कार्यक्रमाला जायला मिळत नाही. सुशिक्षित आणि सुधारित घरातील महिला चें व्यवस्थित आहे परंतु साधारण परिस्थिती आणि शिक्षण कमी असणंऱ्या घरातील महिला ना खूप मर्यादा असतात त्या ठिकाणी प्रबोधन होण्यासाठी वेगवेगळे उपाय होणे आवश्यक आहे. हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे सुशिक्षित लोकांनी देखिल या लोकांना वास्तविक गोष्टी लक्षात किंवा त्यांचे प्रबोधन करून त्यांना वैज्ञानिक विचाराकडे आणायला हवे. 

          आता वॉट्सप आहे, सोसियल मेडिया आहे याचा वापर आपण अंधश्रद्धा कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील काही नतद्रष्ट लोक अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करत आहेत. उदा. चमत्कार झाला फलान्या ठिकाणी आणि हा संदेश 10 जणांना पाठवा आणि नाही पाठवला तर तुमच्या सोबत दुर्दैवी घटना घडेल. असे म्हणजे हे लोक प्रत्येक आधुनिकते सोबत अंधश्रद्धा लावून आपले दुकान कसे चालू राहील हे चांगले डोके लावतात. परंतु ते समाजासाठी घातक आहे. 

         अंधश्रद्धेला सध्याच्या तरुण पिढीने बळी पडू नये व्यज्ञानिक दृष्टिकोन वाढवा, वाचन करा आणि जिथे जिथे हे अंधश्रद्धेचे वारे वाहत आहेत तिथे तिथे सर्व तरुणांनी त्याला वाढू देऊ नये. एवढीच सर्वाना विनंती.

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

नौकरी योग्य कि व्यवसाय

 नमस्कार, ब्लॉग वाचक मित्रानो. या महिन्यात मी ब्लॉग लिहिण्याचे चांगलेच मनावर घेतले आणि बगता बगता या महिन्यातील हा सहावा ब्लॉग आहे. कोणतेही काम मनावर घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही हे ऐकले ते खरेच निघाले. असो आपला आजचा विषय नोकरी योग्य कि व्यवसाय, तसे पाहिले तर दोन्ही हि मार्ग वाईट किंवा अयोग्य नाहीत. नोकरी लागली तरी पैसे कमावण्यासाठीच आणि व्यवसाय केला तरी पैशासाठीच. दोन्ही हि मार्गा चा उद्देश एकच जगण्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे आणि त्यासाठी लागतो पुरेसा पैसा. 

        नोकरी मध्ये खाजगी नोकरी कि सरकारी हे निवडणे महत्वाचे असते त्यातल्या त्यात सरकारी नोकरी ला जास्त प्राधान्य दिले जाते, कारण सरकारी नोकरी एकदा लागली की तिथे खूप सुविधा असतात जसे छोट्या मोठ्या चुकी साठी बोलणी कमी खावी लागतात, पगारकपात तुरळीक, सक्तीची रजा, कामाऊन काढणे, पगार कमी करणे, प्रोमोशन थांबवने असले प्रकार नसतात. सरकारी नोकरी मध्ये आपल्या साहेबाचे (बॉस) जास्त लाड करण्याची आवश्यकता नसते जसे खाजगी क्षेत्रात करावी लागते. 


         खाजगी नोकरी करायची म्हटले की सरकारी नोकरीच्या उलट सर्व नियम असतात, कारण तिथे मालक हा स्वतः सर्वेसर्वा असतो त्यामुळे तो सर्व फायद्याच्या आणि त्याच्या व्यवसाय उद्योग वाढीचा विचार करतो, नोकरदाराच्या वयक्तिक अडचणी बद्दल खाजगी मालकाला काही देणे घेणे नसते. 

      नोकरी हि उत्तम आहे, मी इथे अति उत्तम म्हणत नाही कारण आपण 21 व्या शतकाकडे जात आहोत आणि प्रचंड स्पर्धेचे युग आहे, स्पर्धा हि दिवसा गणिक वाढत आहे. सरकारी जागा केंव्हा निघतात लवकर कळत नाही, परीक्षेचा सतत अभ्यास करत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण व्यवस्था हळू हळू कमी होत आहे जसे डी एड किंवा बीएड या अभ्यासकरमा कडे विद्यार्थी कमी होत असून, विद्यार्थी कुशल काम (skill based) शिक्षणाकडे वळत आहेत. ते योग्यच आहे प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान आणि संगणक ज्ञान आवश्यक झाले आहे, त्यामुळे तुम्ही संगणक साक्षर असणे आवश्यक आहे. नोकरीची आपणास आवड असेल तर नोकरी मध्ये खूप संधी आहेत, हा मार्ग पकडला तर नोकरी कोणती करायची त्यानुसार त्यासाठी लागणाऱ्या परीक्षेची तयारी करायला लागते उदा: स्पर्धा परिक्षासाठी mpsc, upsc, ibps इत्यादी, पोलीस भरती, रेल्वे भरती, st महामंडळ इत्यादी. नोकरी मिळते परंतु सतत त्यामागे (update) मागोवा घेत रहावे लागते. 

                 व्यवसाय हि योग्य आहे आपली आवड व्यवसाय करण्याकडे असेल तर आपण पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून किंवा बारावी नन्तरही व्यवसाय कडे वळू शकता. व्यवसाय कोणताही असु शकतो उदा: किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेल, कोचिंग क्लास, इलेक्टरीकल, दुग्ध व्यवसाय. त्यामध्ये कोणता व्यवसाय आपल्याला अनुकूल कसा होईल त्यानुसार तो निवडावा.

        व्यवसाय कुणा कुणाचा पारंपरिक असतो जसे कुंभार, चांभार, लोहार, सुतार, सोनार त्यांना पिढी दर पिढी वडील कडून मुलाला त्या व्यवसायातील ज्ञान मिळते. नवीन आधुनिक व्यवसाय असेल तर त्यासाठी कुठे तरी प्रशिक्षण घ्यावे लागते किंवा दुसऱ्याच्या दुकानावर किमान सहा महिने ते एक वर्ष काम करून ट्रेनिंग घ्यावी लागते, उदा: इलेक्टरोनिक, सायकल दुकान, मोटार रेवायण्डिंग, इलेक्ट्रिकल, training इन्स्टिट्युट, कापड दुकान, कृषी साहित्य खरेदी विक्री, आयुर्वेदिक दुकान, furniture, मोबाईल शॉपी इत्यादी. व्यवसाय केला तर वर्ष दोन वर्षात आपणास व्यवसायातील बरीच माहिती होऊन आपण चांगले व्यावसायिक होऊ शकता. 

               नोकरी करत असताना फावल्या वेळेत आपण छोटे मोठे व्यवसाय किंवा गुंतवणूक करून आपल्या महिन्याचे उत्पन्न वाढवू शकता. त्यासाठी खूप सारे ताण किंवा विचार करून खचून न जाता सकारात्मक दृष्टीने आणि विचाराने मार्गक्रमण करणे व करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. 

धन्यवाद 💐💐

ज्ञानेश्वर पांचाळ. 

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

मी अनुभवलेले कुलगुरू (Dr. B. A. M. U. Aurangabad)

पदवी नंतर पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश मिळणे म्हणजे एक प्रकारचे मनाला प्रथम आस्चर्यच वाटले होते. 2006 ला विद्यापीठात प्रथम M.Sc. I.T. ला प्रवेश मिळाला त्यावेळेस खूप अभिमान वाटत असे कि मी औरंगाबाद ला आणि तेही विद्यापीठात शिकत आहे आणि अजूनही वाटतो यामध्ये काही दुमत नाही. त्यावेळी कोतापल्ले सर कुलगुरू होते. पदयुत्तर शिक्षण असलंयामुळे कुलगुरू सोबत कधी सम्पर्क आला नाही किंवा त्यांचे भाषण वगैरे जास्त ऐकण्यात आले नाही. कोतापल्ले सर मराठी विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक होते, त्यांच्याविषयी सतत विद्यापीठात मराठी आणि हुमिनिटीझ विभागाचे विद्यार्थी भेटल्यां नंतर चर्चा ऐकायला मिळायची. कोतापल्ले सरांची शैली, दरारा वगैरे वगैरे. परंतु मी त्यांना संगणक शास्त्र विभागात एकदा आणि विद्यापीठातील एडिटोरियम मध्ये एकदा ऐकले होते, मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व जाणवले. 


       माझी M.Sc. 2008 ला पूर्ण झाली आणि त्यांनतर मी विद्यापीठ सोडले नन्तर एक वर्षांनी पदवी फॉर्म विद्यापीठ परीक्षा विभागात apply केला महिनाभरात डिग्री मिळाली त्यावेळेस डिग्रीच्या पेज ची (size) आकार खूप मोठा होता. त्यांनतर परत मी विद्यापीठात येईल याची मला कल्पना देखील नव्हती, परंतु 2012 ला विद्यापीठाकडे परत आलो नेट सेट आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी या उद्देशाने, त्याच वेळेस M. Phil. Computer Sci. ची cet टेस्ट (entrance) आहे हे कळाले. कळल्या नन्तर थोडा विचार करून चलता चलता टेस्ट देऊ म्हणून परीक्षा दिली. काही दिवसांनी mphil cet चा निकाल लागला, दुसऱ्या यादी मध्ये माजे नाव आले, त्यामध्ये थोडी चूक झाली होती, माज्या नावात प्रिंट मिस्टयेक झाली होती, नन्तर नावासमोरील सीट नंबर वरून खात्री झाली की तो माझाच क्रमांक आहे, नन्तर मी M.Phil. ला प्रवेश घेतला 2012 साली. यावेळी कुलगुरू डॉ. विजय पंढरीपांडे होते, या सरांना मात्र बऱ्याच वेळेस ऐकले त्यांची कार्यशैली पाहण्यात आली. 

       पंढरीपांडे सर science (विज्ञान) शाखेचे आणि त्यातल्या त्यात शास्रज्ञा सोबत काम केलेले ज्ञानी व्यक्ती होते. त्यानच्या काळात खूप शिस्तप्रिय कामे झाली. ऑडिटोरियम मध्ये त्यांना विविध कार्यक्रमानिमित्त ऐकले. CFC सेन्टर त्यांच्या कार्यकाळात झाले, पंढरीपांडे सर सकाळी सकाळी अचानक विद्यापीठातील कोणत्याही एका विभागास भेट देत असत, सर्व कामे वेळेवर पूर्ण करणे हे त्यांची कला होती. त्यांच्या काळात विद्यापीठाला A grade NAAC तर्फे मिळाला. त्यांनतर डॉ. बी.य. चोपडे सर विद्यापीठाला कुलगुरू लाभले, हे सर पण विज्ञान शाखेतून पीएचडी झालेले होते. या सरांच्या काळात म्हणजे 2014 ते 2019 खूप सारी कामे विद्यापीठात झाली आणि याच काळात म्हणजे 2015 ला माझे पीएचडी चे registration झाले व पीएचडी चे संशोधन कार्याला सुरुवात मी केली. 

       चोपडे सरानी विद्यापीठातील जसे अंतर्गत रस्ते, बऱ्याचशा नवीन बिल्डिंग चे बांधकाम झाले जसे की फिजिकल एडुकेशन, व्होकेशनल कोर्सची बिल्डिंग, dna बारकोडिंग, incubation सेंटर, अथेलस्टिकस ग्राउंड, प्रिंटिंग टेक्नॉलॉजि, सायकोलॉजि विभाग इत्यादी. विद्यापीठाचा दर्जा टिकवून ठेवण्यात डॉ. बी. ए. चोपडे सर यशस्वी झाले. चोपडे सरांच्या काळात खूप आंदोलने झाली परंतु शैक्षणिक कामे पण खूप झाली. 

       मी चोपडे सरांना व्यक्तीश: इमेल पाठवून तीन ते चार वेळा विद्यार्त्यांचे विविध अडचणी सरांनि सोडवल्या. चोपडे सर माज्या प्रत्येक इमेल ला reply देत असत. पहिल्या इमेल विद्यापीठातील रस्त्यावरच्या लाईट समनधित होता, त्यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी विद्यापीठातील सर्व light बसवण्यात सांगितले. नन्तर हॉस्टेल number 2 मधील वॉटर कुलर तात्काळ बसवले होते, नन्तर गोल्डन जुब्लि फेलोशिप सदंर्भात तातडीने विद्यार्त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले, हॉस्टेल क्र. २ वरील सोलार दुरुस्ती, स्पीड ब्रेकर संमधीत इत्यादी, असे माझ्या वयक्तिक इमेल ला कुलगुरु चोपडे सर तात्काळ प्रतिसाद देत होते. चोपडे सरानी खूप सारी चांगली कामे विद्यापीठात केली. 

        चोपडे सर यांचा कार्यकाळ संपल्या नंतर 2019 ला नवीन कुलगुरु डॉ. येवले सर नागपुर विभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रुजू झाले. डॉ. येवले सर आल्यापासून विद्यापीठातील ऑनलाईन कार्यप्रणाली बऱ्यापैकी चालू आहे. फाईल ट्रॅकिंग चालु करण्यात आली आहे, त्यामुळे सर्व कामे वेळेत पूर्ण होत आहेत. नन्तर लॉकडाऊन जाहीर झाला आणि नोव्हेंबर 2020 पर्यंत चालूच आहे.

💐💐💐💐

क्रमश:

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

भारतीय संशोधन आणि फेलोशिप

   संशोधन हे खूप अभ्यासु, जिज्ञासा वाढवणारे, ज्ञानात भर पाडणारेआणि छान काम आहे.  संशोधनामुळे बऱ्याचशा नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळतात. भारत देशामध्ये इतर देशांच्या तुलनेत संशोधनाला एवढे महत्व दिले जात नाही, विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी लागणारे प्रोत्साहन दिले जात नाही, जेवढे महत्व इतर देशात दिले जाते तेवढे भारतामध्ये दिले जात नाही. 

       विद्यापीठात वेगवेगळ्या फेलोशिप मिळवण्यासाठी खूप वेगवेगळ्या वेबसाईट वर जाऊन त्यावर लागणारी माहिती सविस्तर भरावी लागते, सोबत वेगवेगळी document (कागदपत्रे) जोडावी लागतात (स्कॅन करून अपलोड करावी लागतात), नन्तर इन्स्टिट्युट चा विद्यार्थी आहे त्याचे (व्हेरिफाईड) खात्रीसाठी स्टॅम्प सहीत कागदपत्र लागतात, शेवटी तुमचा संशोधन विषयी सिनोप्सीस प्रत जोडावी लागते. एवढे सर्व पाठवून शेवटी हजारो फॉर्म पैकी केवळ एका विद्यापीठातून सर्व विषय मिळून केवळ 3 ते 4 विद्यार्थी फेलोशिप साठी निवडले जातात. 

        एक फेलोशिप चा फॉर्म भरन्यासाठी एक ते दोन आठवडे सहज निघून जातात. ज्याला फेलोशिप नाही मिळाली तो साहजिकच दुसरी फेलोशिप साठी apply करतो. परत दुसऱ्या फेलोशिप 2 ते 3 आठवडे वेळ खातात, मधेच तांत्रिक अडचणी येतात, तारीख आलेली कळत नाही, कळाली तरी वेळ पुरत नाही. काही वेळेस घाई मध्ये चूकीचे document (कागदपत्र) ऑनलाईन जोडली जातात. एवढे सर्व प्रक्रिया करून पहिल्या चार विद्यार्थ्यांची निवड होते, त्यामध्ये आरक्षण हा प्रकार. बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करायची आणि बातम्या छापायच्या, कि विद्यापीठात या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाली. आकडेवारी व्यवस्थित काढली तर बरेचशे गुणवंत विद्यार्थी निघतील कि ज्यांना वास्तविक फेलोशिप मिळायला हवी होती पण त्यांना ती मिळत नाही. याला कारण म्हणजे विद्यापीठ व्यवस्थापन समिती, हे सर्व समिती मधील सदस्यांना हे नियोजन व्यवस्थित जमले नाही किंवा त्यांनी तेवढी खोलवर त्याचे आकलन केले नाही. 

        या सर्व फेलोशिप मिळणाऱ्या मध्ये त्रुटी सांगण्या मागच्या कारण म्हणजे गरजवंत गुंवत्ताधारकाला फेलोशिप न मिळता तुटपुंजा तेही गुणवत्ता खरेच आहे का नाही याची खात्री न करता फेलोशिप दिली जाते. माज्या संशोधनातील अनुभवानुसार विद्यापीठात जेवढे पण संशोधक विद्यार्थी असतील जसे की पी.एचडी. किंवा एम.फील. करणारे, या सर्व विद्यार्थ्यांना महागाई भत्ता धरून, साधारण त्या विद्यार्थ्यांचा मेस चा खर्च अधिक खोलीभाडे अधिक मेडिकल अधिक संशोधन साहित्य खरेदी विक्री हे सर्व खर्चाचे आकलन केले तर, 2020 च्या महागाई नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे संशोधन पूर्ण होईपर्यंत किमान 20000/- रुपये (stipend) मानधन देण्यात यावे नव्हे द्यायलाच हवे. 

        विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या फेलोशिप मंजूर झालेल्या आहेत व या सर्व विविध फेलोशिप चे एक विद्यापीठ स्तरावर खाते उघडून, सर्व रक्कम एकत्र करून, सर्वच संशोधक विद्यार्थ्यांना समान फेलोशिप द्यावी आणि ते अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे, यामुळे संशोधनाची गुणवत्ता आणि दर्जा वाढेल. शिक्षण क्षेत्राची जी पडझड झालीय ती लवकरात लवकर सुधारेल. 

       हा ब्लॉग शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री, शास्त्रद्य आणि ज्यांच्या हितासाठी हा ब्लॉग लिहिला ते हणजे संशोधक विद्यार्थी यांनी हा ब्लॉग आवर्जून वाचावा आणि योग्य प्रतिक्रिया द्यावी हि नम्र विनंती. महाराष्ट्र सरकार आणि खासकरून UGC फेलोशिप समिती च्या सदस्यांनी यावर योग्य मार्ग काढावा जेणे करून हा ब्लॉग लिहिल्याचे सार्थक होईल.

https://dnyanu171985.blogspot.com/2020/11/copy-of-previous-blog.html?m=1

हा ब्लॉग व्यवस्थित पूर्ण वाचता येत नसेल तर, याच ब्लॉग ची कॉपी वरील वेबसाईट लिंक वर दिली आहे वेबसाईट कॉपी करून ऍड्रेस बार मध्ये पेस्ट करा, असे केल्यास आपणास हा ब्लॉग वाचता येईल. 💐💐💐💐

💐💐💐💐

धन्यवाद!
ज्ञानेश्वर पांचाळ,
एक संशोधक विद्यार्थी.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार

हा ब्लॉग चे नाव बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार टाकण्या मागचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील असलेली व्यवस्था. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जील्हा म्हणून ओळखला जातो, कारण या जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात लोक ऊस तोडणी करण्यासाठी जातात. वर्षा नु वर्ष हे चक्र चालू आहे. जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे, माहिती आणि तंत्रज्ञान युग आहे, प्रत्येक क्षेत्रात मोबाईल आणि संगणकाचा वापर वाढत आहे. परंतु बीड या जिल्ह्यात उच्चशिक्षित बेरोजगारांसाठी म्हणाव्या तशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. 


         इंजिनीरिंग, मास्टर डिग्री असनाऱ्या युवकांना पुणे मुंबई अशा मेट्रो सिटी ला गेल्याशिवाय पर्याय नाहीत, यामध्ये बदल व्हायला हवा. या युवकांना स्थानिक ठिकाणी आपल्या जिल्ह्यात त्यांना हवा तसा रोजगार मिळायला हवा., त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. हे गरजेचे आहे कारण सर्व जण कुटुंब घेऊन मेट्रो सिटी मध्ये जॉब करू शकत नाहीत, बऱ्याच युवकांना कुटुंब सोडून राहने अशक्य असते. मेट्रो सिटी मध्ये जॉब हे कायम नसतात, राहण्याचा खर्च, खाण्याचा खूप सारा खर्च असतो, शिवाय हाल खूप होतात. याच जॉब ची संधी या युवकांना आपल्या गावात किंवा 50 किलोमीटर च्या जवळपास मिळाली तर तो उकच्चशिक्षित युवक ती नोकरी आनंदाने करेल, भले हि पगार पुणे किवा मुंबई पेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी असेल आणि शहरात होणारी गर्दी हि कमी होईल, पर्यावरण हि शुद्ध राहील. 

          बीड या जिल्ह्यातील युवकांचे जास्त प्रमाण डी एड किंवा बि एड करण्या कडे जास्त असते, कारण नोकरी हि जिल्ह्यात मिळण्याचे प्रमाण जास्त असते म्हनून. सर्वच जण शिक्षक नाही होऊ शकत त्यामुळे इतर कौशल्य आधारित रोजगार जिल्ह्यात निर्माण होणे अत्यन्त आवश्यक आहे.

         हा ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी त्यांच्या उच्च शिक्षणा नुसार जिल्ह्यातच मिळायला हवे,  असे व्यवस्थापन शासनाने करावे ही महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती. बीड या जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद , पुणे, मुंबई ला जाणार्याचे प्रमाण हि खूप मोठया प्रमाणात आहे. स्थानिक नेत्यांनी आणि शासनाने यावर एक समिती नेमून या जिल्ह्यातील बेरोजगारांचा प्रश्न सोडवावा.

क्रमशः


बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

तासिका तत्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकांची व्यथा

विषयाच्या शीर्षका वरून आपणास विषयाचे गांभीर्य समजले असेल. आज आपण एकविसाव्या शतकाकडे मार्गक्रमण करत आहोत. स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेत तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या जगण्या साठी जो संघर्ष चालू आहे त्याकडे महराष्ट्र सरकार, तसेच देशाच्या शासन कर्त्याचे किंचित हि लक्ष नाही. प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण वाढत आहे त्यासोबत बेरोजगारी वाढत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा अति वापर आणि त्यामुळे पारंपरिक रोजगारांची दिशा बदलत आहेत, त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रा मध्ये हि मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. विकासासाठी बदल आवश्यक आहे परंतु त्याचा परिणाम लोकांच्या जगण्यासाठी लागणाऱ्या संघर्षावर होऊ नये. 


        तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापकांना तुटपुंज्या मानधनावर जगण्यासाठी नौकरी करावी लागत आहे. कायम स्वरुपी प्राध्यापका प्रमाणेच तासिका तत्वावरील प्राध्यापक हि काम करतात आणि दोघांनच्या मिळणाऱ्या पगारी मध्ये जमीन आसमान चा फरक आहे, एवढा फरक कशामुळे? मग प्रश्न पडतो कायमस्वरूपी व्यक्ती ने तात्पुरत्या स्वरूपात नोकरी करणाऱ्या प्रध्यापका पेक्षा चार पटीने जास्त काम करायला हवे, पण तसे होत नाही, उलट तासिका तत्वावरील प्राध्यापक जास्त प्रमानात काम करताना दिसून येते. हे शासनाला किंवा शिक्षणमंत्र्याला समजत नाही का? शिक्षणमंत्री खरेच उच्चशिक्षित आहेत का? हे सर्व प्रश्न पडतात आणि पडायलाच पाहिजे. 

        या व्यवस्थे मुळे तरूण प्राध्यापकांचे स्वप्न धुळीस मिळतात, भ्रष्टाचार वाढत आहे, शिक्षनाचा दर्जा कमी होत आहे, पिढी दर पिढी दर्जाहीन होत आहे. प्रतेक क्षेत्रात हुकुमशाही वाढत आहे, यामुळे तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे जगणे हवालदिल झाले आहे. आगोदर शिक्षणासाठी संघर्ष आणि नंतर नौकरी मिळावी म्हणून भ्रष्टाचार करून संघर्ष. हे असे झाले इकडे आड आणि तीकडे विहीर, या सर्व अन्यायाचा खूप वाईट परिणाम समाजावर होत आहे. प्राध्यापक हा प्राध्यापक असतो तो कोणत्या शाखेचा असू शकतो, मग सर्व प्राध्यापकांचे वेतनाचे नियम समान असायला हवे, तेही वेगवेगळे कशामुळे? विज्ञान शाखेला अगोदर मंजुरी नंतर इतर शाखेतील प्राध्यापकांची पगार वाढ हा काय प्रकार आहे. 


      मागच्या वर्षी तासिका तत्वावरील प्राध्यापकांना मिळणाऱ्या मानधना मध्ये वाढ शासना तर्फे करण्यात आली परंतु हि वाढीव मानधन फक्त विद्यापीठातील प्राध्यापकांना देण्यात आली, इतर शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना जुन्या पद्धतीनेच मानधन दिले, मग इथे विद्यापीठ पण शासकीय आहे आणि महाविद्यालये पण शाशकीय आहे तरी हि मानधन देण्या मध्ये दुजाभाव का? हे सर्व चालू असताना यावर कुणी हि तक्रार नोंदवत नाही. "कार्यालये वेगळी आहेत", अशी वेगवेगळी करणे दिली जातात. 

        शिक्षण क्षेत्र एका छताखाली का आणली जात नाहीत? यामुळे शिक्षण क्षेत्राची होणारी हेळसांड केंवा थामबनार? यावर उपाय असायला हवा. यासाठी योग्य उमेदवार निवडून द्यायला हवा. निवडलेला उमेदवार उच्चशिक्षित आणि त्याक्षेत्रातील प्रत्येक खाच खळगयाची माहिती असणारा हवा. नाही तर अशेच तरूण वर्षा नु वर्ष बेकार राहतील आणि एक दिवस शिक्षण क्षेत्र सर्व सोयी सुविधायुक्त होते असे इतिहासात वाचावे लागेल. याकडे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे काटेकोर लक्ष असायला हवे. ज्यांनी हा ब्लॉग वाचला त्यांनी छोटी को होईना प्रतिक्रिया द्यावी हि नम्र विनंती. 🙏💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

corona (covid 19)

कोरोना हा Viral आजार २०२० साली खूप मोठ्या प्रमाणात वाढला. जगातील प्रत्येक देशात हा Covid 19 पोहोचला. यामुळे सर्व जग ठप्प झाले. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ढासळली. वयस्कर माणसे आणि ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांचे प्राण जास्त प्रमाणात गमावले. २०२० हे वर्ष लोकांच्या वयातून वजा झाले. 

या वर्षी सर्व लोक घरी बसून होते कारण हा आजार च खूप भयंकर होता आणि आहे, संपर्कातील एका व्यक्ती कडून दुसर्या व्यक्ती कडे जायला काही वेळ लागत नाही. हातात हात दिल्याने, जवळपास शिंक दिल्याने, खोकल्याने, एक मेकाच्या वस्तू वापरल्याने हा आजार पसरतो. या आजार पसरू नये म्हणून शासनाने संचार बंदी केली दवाखाने आणि अत्यावश्यक सेवा सोडता बाकी सर्व बंद होते, ती संचारबंदी जवळपास २ महिने चालू होती. नंतर हळूहळू जिल्हा अंतर्गत आणि नंतर सर्व सुविधा चालू झाल्या. तरी हि लोकांना मास्क वापरणे, हस्तांदोलन केल्यानंतर, बाहेरील वस्तू हताळल्या नंतर  Sanitizer वापरणे, गर्दीत जाने टाळणे इत्याद काळजी घेण्यास सरकारने सतत सूचना TV, आकाशवाणी वरून दिल्या. 

लोक खूप जागृत झाले. याचा गैर वापर पन झाला, काही खाजगी दवाखान्या मध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला, जसे करोना नसताना आहे असे सांगून खोटी Treatment करून पैसा लाटण्यात आला. या सर्व चकरा मध्ये लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधांचे महत्व पटले माणुसकी कळली. निसर्गातील प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले, पाऊस दर वर्षी पेक्षा खूप जास्त पडला इत्यादी. देशाचे आर्थिक नुकसान झाले परंतु निसर्गातील प्रदूषण कमी झाले आणि तेच सर्वांसाठी अत्यावश्यक आहे.त्यामुळे वर्षातून १ महिना का होईना Lockdown असावे. 

क्रमश:



Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...