रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

नौकरी योग्य कि व्यवसाय

 नमस्कार, ब्लॉग वाचक मित्रानो. या महिन्यात मी ब्लॉग लिहिण्याचे चांगलेच मनावर घेतले आणि बगता बगता या महिन्यातील हा सहावा ब्लॉग आहे. कोणतेही काम मनावर घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही हे ऐकले ते खरेच निघाले. असो आपला आजचा विषय नोकरी योग्य कि व्यवसाय, तसे पाहिले तर दोन्ही हि मार्ग वाईट किंवा अयोग्य नाहीत. नोकरी लागली तरी पैसे कमावण्यासाठीच आणि व्यवसाय केला तरी पैशासाठीच. दोन्ही हि मार्गा चा उद्देश एकच जगण्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे आणि त्यासाठी लागतो पुरेसा पैसा. 

        नोकरी मध्ये खाजगी नोकरी कि सरकारी हे निवडणे महत्वाचे असते त्यातल्या त्यात सरकारी नोकरी ला जास्त प्राधान्य दिले जाते, कारण सरकारी नोकरी एकदा लागली की तिथे खूप सुविधा असतात जसे छोट्या मोठ्या चुकी साठी बोलणी कमी खावी लागतात, पगारकपात तुरळीक, सक्तीची रजा, कामाऊन काढणे, पगार कमी करणे, प्रोमोशन थांबवने असले प्रकार नसतात. सरकारी नोकरी मध्ये आपल्या साहेबाचे (बॉस) जास्त लाड करण्याची आवश्यकता नसते जसे खाजगी क्षेत्रात करावी लागते. 


         खाजगी नोकरी करायची म्हटले की सरकारी नोकरीच्या उलट सर्व नियम असतात, कारण तिथे मालक हा स्वतः सर्वेसर्वा असतो त्यामुळे तो सर्व फायद्याच्या आणि त्याच्या व्यवसाय उद्योग वाढीचा विचार करतो, नोकरदाराच्या वयक्तिक अडचणी बद्दल खाजगी मालकाला काही देणे घेणे नसते. 

      नोकरी हि उत्तम आहे, मी इथे अति उत्तम म्हणत नाही कारण आपण 21 व्या शतकाकडे जात आहोत आणि प्रचंड स्पर्धेचे युग आहे, स्पर्धा हि दिवसा गणिक वाढत आहे. सरकारी जागा केंव्हा निघतात लवकर कळत नाही, परीक्षेचा सतत अभ्यास करत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण व्यवस्था हळू हळू कमी होत आहे जसे डी एड किंवा बीएड या अभ्यासकरमा कडे विद्यार्थी कमी होत असून, विद्यार्थी कुशल काम (skill based) शिक्षणाकडे वळत आहेत. ते योग्यच आहे प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान आणि संगणक ज्ञान आवश्यक झाले आहे, त्यामुळे तुम्ही संगणक साक्षर असणे आवश्यक आहे. नोकरीची आपणास आवड असेल तर नोकरी मध्ये खूप संधी आहेत, हा मार्ग पकडला तर नोकरी कोणती करायची त्यानुसार त्यासाठी लागणाऱ्या परीक्षेची तयारी करायला लागते उदा: स्पर्धा परिक्षासाठी mpsc, upsc, ibps इत्यादी, पोलीस भरती, रेल्वे भरती, st महामंडळ इत्यादी. नोकरी मिळते परंतु सतत त्यामागे (update) मागोवा घेत रहावे लागते. 

                 व्यवसाय हि योग्य आहे आपली आवड व्यवसाय करण्याकडे असेल तर आपण पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून किंवा बारावी नन्तरही व्यवसाय कडे वळू शकता. व्यवसाय कोणताही असु शकतो उदा: किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेल, कोचिंग क्लास, इलेक्टरीकल, दुग्ध व्यवसाय. त्यामध्ये कोणता व्यवसाय आपल्याला अनुकूल कसा होईल त्यानुसार तो निवडावा.

        व्यवसाय कुणा कुणाचा पारंपरिक असतो जसे कुंभार, चांभार, लोहार, सुतार, सोनार त्यांना पिढी दर पिढी वडील कडून मुलाला त्या व्यवसायातील ज्ञान मिळते. नवीन आधुनिक व्यवसाय असेल तर त्यासाठी कुठे तरी प्रशिक्षण घ्यावे लागते किंवा दुसऱ्याच्या दुकानावर किमान सहा महिने ते एक वर्ष काम करून ट्रेनिंग घ्यावी लागते, उदा: इलेक्टरोनिक, सायकल दुकान, मोटार रेवायण्डिंग, इलेक्ट्रिकल, training इन्स्टिट्युट, कापड दुकान, कृषी साहित्य खरेदी विक्री, आयुर्वेदिक दुकान, furniture, मोबाईल शॉपी इत्यादी. व्यवसाय केला तर वर्ष दोन वर्षात आपणास व्यवसायातील बरीच माहिती होऊन आपण चांगले व्यावसायिक होऊ शकता. 

               नोकरी करत असताना फावल्या वेळेत आपण छोटे मोठे व्यवसाय किंवा गुंतवणूक करून आपल्या महिन्याचे उत्पन्न वाढवू शकता. त्यासाठी खूप सारे ताण किंवा विचार करून खचून न जाता सकारात्मक दृष्टीने आणि विचाराने मार्गक्रमण करणे व करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. 

धन्यवाद 💐💐

ज्ञानेश्वर पांचाळ. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...