गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

भारतीय संशोधन आणि फेलोशिप

   संशोधन हे खूप अभ्यासु, जिज्ञासा वाढवणारे, ज्ञानात भर पाडणारेआणि छान काम आहे.  संशोधनामुळे बऱ्याचशा नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळतात. भारत देशामध्ये इतर देशांच्या तुलनेत संशोधनाला एवढे महत्व दिले जात नाही, विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी लागणारे प्रोत्साहन दिले जात नाही, जेवढे महत्व इतर देशात दिले जाते तेवढे भारतामध्ये दिले जात नाही. 

       विद्यापीठात वेगवेगळ्या फेलोशिप मिळवण्यासाठी खूप वेगवेगळ्या वेबसाईट वर जाऊन त्यावर लागणारी माहिती सविस्तर भरावी लागते, सोबत वेगवेगळी document (कागदपत्रे) जोडावी लागतात (स्कॅन करून अपलोड करावी लागतात), नन्तर इन्स्टिट्युट चा विद्यार्थी आहे त्याचे (व्हेरिफाईड) खात्रीसाठी स्टॅम्प सहीत कागदपत्र लागतात, शेवटी तुमचा संशोधन विषयी सिनोप्सीस प्रत जोडावी लागते. एवढे सर्व पाठवून शेवटी हजारो फॉर्म पैकी केवळ एका विद्यापीठातून सर्व विषय मिळून केवळ 3 ते 4 विद्यार्थी फेलोशिप साठी निवडले जातात. 

        एक फेलोशिप चा फॉर्म भरन्यासाठी एक ते दोन आठवडे सहज निघून जातात. ज्याला फेलोशिप नाही मिळाली तो साहजिकच दुसरी फेलोशिप साठी apply करतो. परत दुसऱ्या फेलोशिप 2 ते 3 आठवडे वेळ खातात, मधेच तांत्रिक अडचणी येतात, तारीख आलेली कळत नाही, कळाली तरी वेळ पुरत नाही. काही वेळेस घाई मध्ये चूकीचे document (कागदपत्र) ऑनलाईन जोडली जातात. एवढे सर्व प्रक्रिया करून पहिल्या चार विद्यार्थ्यांची निवड होते, त्यामध्ये आरक्षण हा प्रकार. बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करायची आणि बातम्या छापायच्या, कि विद्यापीठात या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाली. आकडेवारी व्यवस्थित काढली तर बरेचशे गुणवंत विद्यार्थी निघतील कि ज्यांना वास्तविक फेलोशिप मिळायला हवी होती पण त्यांना ती मिळत नाही. याला कारण म्हणजे विद्यापीठ व्यवस्थापन समिती, हे सर्व समिती मधील सदस्यांना हे नियोजन व्यवस्थित जमले नाही किंवा त्यांनी तेवढी खोलवर त्याचे आकलन केले नाही. 

        या सर्व फेलोशिप मिळणाऱ्या मध्ये त्रुटी सांगण्या मागच्या कारण म्हणजे गरजवंत गुंवत्ताधारकाला फेलोशिप न मिळता तुटपुंजा तेही गुणवत्ता खरेच आहे का नाही याची खात्री न करता फेलोशिप दिली जाते. माज्या संशोधनातील अनुभवानुसार विद्यापीठात जेवढे पण संशोधक विद्यार्थी असतील जसे की पी.एचडी. किंवा एम.फील. करणारे, या सर्व विद्यार्थ्यांना महागाई भत्ता धरून, साधारण त्या विद्यार्थ्यांचा मेस चा खर्च अधिक खोलीभाडे अधिक मेडिकल अधिक संशोधन साहित्य खरेदी विक्री हे सर्व खर्चाचे आकलन केले तर, 2020 च्या महागाई नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे संशोधन पूर्ण होईपर्यंत किमान 20000/- रुपये (stipend) मानधन देण्यात यावे नव्हे द्यायलाच हवे. 

        विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या फेलोशिप मंजूर झालेल्या आहेत व या सर्व विविध फेलोशिप चे एक विद्यापीठ स्तरावर खाते उघडून, सर्व रक्कम एकत्र करून, सर्वच संशोधक विद्यार्थ्यांना समान फेलोशिप द्यावी आणि ते अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे, यामुळे संशोधनाची गुणवत्ता आणि दर्जा वाढेल. शिक्षण क्षेत्राची जी पडझड झालीय ती लवकरात लवकर सुधारेल. 

       हा ब्लॉग शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री, शास्त्रद्य आणि ज्यांच्या हितासाठी हा ब्लॉग लिहिला ते हणजे संशोधक विद्यार्थी यांनी हा ब्लॉग आवर्जून वाचावा आणि योग्य प्रतिक्रिया द्यावी हि नम्र विनंती. महाराष्ट्र सरकार आणि खासकरून UGC फेलोशिप समिती च्या सदस्यांनी यावर योग्य मार्ग काढावा जेणे करून हा ब्लॉग लिहिल्याचे सार्थक होईल.

https://dnyanu171985.blogspot.com/2020/11/copy-of-previous-blog.html?m=1

हा ब्लॉग व्यवस्थित पूर्ण वाचता येत नसेल तर, याच ब्लॉग ची कॉपी वरील वेबसाईट लिंक वर दिली आहे वेबसाईट कॉपी करून ऍड्रेस बार मध्ये पेस्ट करा, असे केल्यास आपणास हा ब्लॉग वाचता येईल. 💐💐💐💐

💐💐💐💐

धन्यवाद!
ज्ञानेश्वर पांचाळ,
एक संशोधक विद्यार्थी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...