शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

Family (कुटुंब)

कुटुंब हा शब्द कानावर पडला की आपणास आपले प्रथम आई वडील, बहीण-भाऊ आणि आपले घर डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये आपल्या कुटुंबातील लहानपणापासून आपला चालत आलेला प्रवास आठवतो. कुटुंब एक असे घर असते जिथे सर्व आपले रक्त नात्यातील व्यक्ती असतात. कुटुंबात आजी आजोबा हे पण असतात. आजी आजोबा असलंयास त्या कुटुंबाची रंगत आणि अनुभव हा शब्दात मांडणे थोडे अवघडच आहे. आजी आजोबा असलयास ते नातवाचा संभाळ करतात आणि आई वडिलांच्या व्यस्त जीवनात तो एक प्रकारचा आधारच असतो. 


          हल्लीच्या जीवन पहिले तर दोन प्रकारच्या कुटुंब पद्धती प्रकर्षाने दिसून येतात पहिली म्हणजे एकत्र कुटुंब आणि दुसरी म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. एकत्र कुटुंबात आई-वडील, भाऊ-भाऊ, सुना, नातू, पणतु हे सर्व एकत्र राहतात. विभक्त कुटुंबात भाऊ-भाऊ लग्न झाल्यानन्तर वेगळे राहतात. आई-वडील काही दिवस एका मुलाकडे तर काही दिवस दुसऱ्या मुलाकडे राहतात. पण या दोन्हीमध्ये एकत्र राहणारे कुटुंब जास्त सुखी आणि समाधानी असते, पण सर्व कामे समजुतीने केली तर. एकत्र कुटुंबात कुणी एक जणाने जरी समजदारीने राहिले नाही तर हे कुटुंब हि कालांतराने विभक्त होतात.

         शहरी भागात तर विभक्त कुटुंब पध्दती सर्रास आहे, कारण पती-पत्नी नोकरीला असतात मग घरकाम कोण करणार यावर वाद तयार होतात किंवा एक सून सर्व घरातले काम करण्यास तयार नसते. असे हे कुटुंबातील वेगवेगळ्या कारणामुळे विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. परंतु खेड्या मध्ये हि एकत्र कुटुंब पद्धती मुले लग्नाला येईपर्यंत एकत्र राहतात. 

       ज्यांना एकच मुलगा आहे त्यांना त्या एकट्या मुलासाठीच सर्व प्रपंच करावा लागतो आणि तो मुलगाही दूर गावी किंवा विदेशात नोकरी ला गेल्यास त्या वृद्ध आई वडिलांची खायची आणि सम्भाळायची पंचाईत होते. मुलगा एकुलता एक असेल तर तो आहे त्याच गावात राहून जॉब किंवा व्यवसाय करत असेल तर त्यांचे वृद्ध आई वडिलांचे व्यवस्थित चालते. कारण मुलगा मेट्रो सिटीत नोकरी ला असल्यास तेथील वातावरण, जसे कि दोन किंवा तीन रूम चा फ्लॅट मध्ये रहावे लागते.  वृद्ध माणसांना थोडे मोकळी हवा असणंऱ्या ठिकाणी राहणे सोयीचे असते. परंतु मेट्रो सिटी मध्ये असे घर मिळणे अत्यन्त कठीण जाते. त्यामुळे वृद्ध माणसांना जगणे खूप कठीण जाते त्यावर उपाय म्हणून यावर उपाय म्हणून ही वृद्ध माता पिता मंदिरात जाऊन, नातवे असतील त्यांच्यासोबत वेळ घालवतात. परंतु मेट्रो सिटी मध्ये आणि फ्लॅट सोसायटी मध्ये मंदिर आणि भजन कीर्तन पहायला मिळत नाहीत. तर मेट्रो सिटीचे हेही दुष्परिणाम आहेत. 

          तर काळानुसार मेट्रो सिटी मधील वृद्ध माता-पित्यांचे हाल असतात हे मात्र तेवढे खरेच आहे. यावर मेट्रो सिटीतील शासन कर्त्यांनी थोडा विचार विनिमय करून योग्य त्या सोयी वृद्धांसाठी करायला हव्यात. तर अशी हि महाराष्ट्रातील कुटुंब पद्धती आहे, सुख-दुःखात सर्व नातेवाईक एकत्र येतात आणि सुख-दुःख आंनदाने वाटून घेतात. आणि कुटुंबात हे सुख-दुःखात एकत्र आलेच पाहिजे आणि असणे आवश्यक आहे. 

💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...