शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

दीपावली

दीपावली या सणाला दिवाळी किंवा दीपावली म्हटले जाते. दोन्हीही शब्द दीप आणि दिवा या वरून तयार झालेले आहेत. दिवाळी सण हा हिंदु धर्मियांचा सणापैकी एक मोठा सण आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण या दिवशी घरोघरी सांयकाळी तेलाचे दिवे, आकाशदिवे खूप आवडीने लावले जातात, दारा समोर महिला रांगोळ्या काढतात. या सणानिमित्त शासकीय सुट्ट्या 15 ते 20 दिवस दिल्या जातात. दरवर्षी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.


         एका कथेनुसार प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला सीतेला घेऊन परत आले होते त्यावेळी सर्व आयोद्धया वासीयांनी दिवे लावून आंणदोत्सव साजरा केला होता. दिवाळी सणामध्ये नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, लक्ष्मीपूजन इत्यादी एकामागोमाग साजरे केले जातात. नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला होता म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते, बलिप्रतिपदा या सणाला दिवाळी पाडवा सुद्धा म्हणतात या दिवशी नवीन वह्या, व्यापारी लोक नवीन खतावणी साठी नवीन खातेवही ची पूजा अर्चा करून नवीन वर्षाची सुरुवात करतात "इडा पीडा टळूदे व बळीचे राज्य येऊदे" म्हणून बलिप्रतिपदा साजरी केली जाते, भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. सासरी गेलेल्या बहिणी माहेरी दिवाळी निमित्त आनंद साजरा करण्यासाठी येतात. लक्ष्मीपूजनादिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते व देवी समोर नवीन वही किंवा नवीन वर्षाची रोजनिशी ठेऊन संकल्प केले जातात. असे विविध सण या दीपावली मध्ये साजरे केले जातात. 

        दीपावली ची वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांना खूप सारे फटाके वाजवायला मिळतात, त्याबरोबर दिवाळीचा फराळ खायला मिळतो व हा फराळ खूप लोकप्रिय असतो. या सणामध्ये वेगवेगळे गोड पदार्थ आवडीने घरीच बनवले जातात. नुक्तीचे लाडू, चिवडा, शनकरपाळे, काठिशेव, शेव इत्यादी. असा हा सण सर्वांच्या आवडीचा आणि आनंदोत्सव साजरा करण्याचा असतो. गरीब श्रीमंत सर्व जण आपापल्या परीने खूप आनंदाने हा सण साजरा करतात. 

           या सणाला दरवर्षी वेगवेगळे दिवाळी अंक बाजारात येतात ज्यामध्ये विविध लेख आणि माहितीपूर्ण अंक लिहिलेले असतात. बरेचशे वाचक आवडीने दिवाळी अंक दरवर्षी आवर्जून घेतात. 

          या दिवशी ध्वनी वर्धक फटाके वाजवू नये म्हणून सरकार तर्फे बातम्या मध्ये सतत सांगितले जाते. पर्यावरणासाठी फटाके, सुतळी बॉम्ब हे घातक असतात. बऱ्याचशा घटना घडतात, जसे फटाक्या मुळे हात भाजणे, डोळा जाणे इत्यादी. 21 व्या शतकाकडे जात असताना फटाके वाजवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, पर्यावरणपूरक दिवाळी अनेक युवक साजरी करत आहेत.

           यावर्षी कोरोना (korona) मुळे सर्वांनी दिवाळी साध्या आणि शांत वातावरणात साजरी केली, त्याबद्दल आपना सर्वांचे अभिनंदन. तर अशी ही दिवाळी सर्वांच्या घरात आंनदाने साजरी केली जाते त्याबद्दल सर्वाना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐

लेखक, 

ज्ञानेश्वर पांचाळ. 💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...