भावना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भावना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ मे, २०२४

सुसंवाद असणे आवश्यक

या लेखाचे शीर्षक सुसंवाद असणे आवश्यक आहे, तर सुसंवाद गरजेचा का आहे हे या लेखात वर्णन केलेले आहे. तर मित्रानो आपण जीवन जगताना आपल्याला विविध लोकासोबत संपर्क येतो जसे कि, सुरुवात आपल्या कुटुंबापासून, नंतर आपले मित्र, आपण जिथे काम करतो तेथील आपले वेगवेगळे सहकारी, कुठे कुणाच्या वाढदिवसाला, एखाद्या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र येतो. तर या ठिकाणी जर आपण कुणाशी बोललो नाही तर किंवा कुणी तरी आपल्याला स्वतः होऊन बोलेन अशी आपण वाट बघत राहिलो तर संवाद किंवा सुसंवाद होणार नाही. तर त्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे आपण स्वतः होऊन नमस्कार घालणे, विचारपूस करणे गरजेचे असते, त्यामुळे तेथे आपली वेगळी ओळख निर्माण होते. लोक आपल्या संवादा वरून आपल्याला ओळखतात आणि त्याचा उपयोग हि आपण जगात असताना समाजात आपल्याला आणि आपल्या वयक्तिक विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होत असतो.


     दुसरी आवश्यकता म्हणजे जर आपण संवाद साधला तर सुसंवाद होईल. कारण आपण विद्यार्थी असाल, व्यवसायिक असाल, घरकाम करत असाल, कुठे तरी नोकरी करत असाल तर प्रत्येक क्षेत्रात आपला किंवा प्रत्येक व्यक्तीचा इतरांशी किंवा इतर व्यक्ती शी संपर्क येतो. तर तिथे आपण जर बोलण्यास कमी पडत असेल तर आपण काही प्रश्न स्वताला विचारावेत जसे कि आपण लवकर कुणाशी का संवाद साधत नाही, किंवा आपला सुसंवाद वाढण्यासाठी काय आपण स्वत मध्ये बदल करणे गरजेचे आहे, ते आपण तपासणे गरजेचे आहे.

    सुसंवादाचे बरेचशे उपयोग आहेत, जसे कि कुणी व्यवस्थित रीतीने आपले मुद्दे बोलत असेल, एखादा विषय व्यवस्थित हाताळत असेल तर त्या व्यक्तीची ती एक कला आहे आणि ती कला तो दिवसेंदिवस विकसित करत असतो. या कलेमुळे त्या व्यक्तीची सामाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते. तर सहसा जे मुले तरुण वयात येतात किंवा नुकतीच दहावी बारावी झालेली आहे अशे तरुण सहसा संवाद करण्यास कुठे तरी लाजतात, किंवा त्यांना काय बोलावे हे सुचत नाही किंवा त्यांना त्यांचे लहान पानापासुंचे वातावरण अगदी शांत असते, किंवा त्यांच्या वर आजूबाजूचं वातावरणाचा तसा प्रभाव पडलेला असतो, त्यामुळे अशी मुले सहसा सुसंवाद करण्यास, त्यांचे प्रश्न व्यक्त करण्यास तेवढे सक्षम नसतात. तर यासाठी अशा मुलांनी सहसा आपल्या शहरात जिथे जिथे साहित्यक कार्यक्रम असतात, किंवा काही खेळाच्या स्पर्धा असो, किंवा वादविवाद स्पर्धा यामध्ये आवर्जून भाग घ्यावा आणि आपल्या व्यक्तिमत्व विकसित करून घ्यावे.

    अजून सांगायचे झाले तर आतापर्यंत आपण आपल्या सभोवतालची काही कारणे पहिलीत, पण ज्यावेळेस आपण मोठे होतो आपले विवाह होतात, किंवा विवाह जमवायला आपण जातो त्यावेळी आपणास सुसंवाद साधता आला पाहिजे. आपले काय म्हणणे ते क्लियर मांडता आले पाहिजे. कारण लग्न जमवणे म्हणजे आपण एका जीवन अवस्थेतून दुसर्या जीवन व्यवस्थेत एक प्रकारे जात असतो तर हा लग्न व्यवहार अत्यंत हुशारीने किंवा अत्यंत तुमचे बुद्धी जाग्यावर ठेऊन करावा लागतो. कारण इथे ज्यांचे विवाह होणार असतात त्यांच्या जीवनाचा प्रश्न असतो. तर योग्य सुसंवाद साधून आपण ते विवाह जमवले किंवा ज्याचा विवाह आहे त्याने त्याचे व्यवस्थित मत मांडले तरच हे साध्य होते अन्याथा तिथे त्यांना त्याची किमत मोजावी लागते.

 
    अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना तुम्ही तुमचे मत परखड पाने मांडले नाही किंवा तुमचा व्यवहारावर तुम्ही ठाम नसाल तर तुम्ही तिथे कुठे तरी शंभर टक्के फसणार किंवा कुणीतरी तुम्हाला जाणीव पूर्वक फसवणार. कारण तुमच्या मतावर तुम्ही ठाम नाही, त्यासाठी रोजच्या जीवनात आपल्याला जे रोज भेटतात त्यांना नमस्कार घालणे, खुश्हाली विचारणे, किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर त्याठिकाणी आपण सतत अपडेट राहायला हवे. अपडेट राहिल्यामुळे आपण एक प्रकारे आपले ज्ञान दिवसेंदिवस वाढवत असतो, ज्ञान वाढले कि आपली कार्यक्षमता हि वाढतेच.

    बर्याचशा ठिकाणी गैरसमजामुळे वाद (भांडण) विकोपाला जाते, त्यासाठी ज्यांची कुणाची भांडण झाली आहे त्यांनी एकत्र बसून नेमके कोणत्या कारणामुळे आपण भांडतोय याची चर्चा करावी त्यात काही गैरसमज असतील, ज्याची त्यांनी समजून घ्यावी, त्या विषयी चर्चा करून शहानिशा करावी किंवा त्यावर काय योग्य उपाय होईल जेणे करून लवकरात लवकर होणार्या वादावर तोडगा मिळेल किंवा काही तरी उपाय होईल. 

    तर मित्रानो सर्व लेखावरून मला एवढेच सांगायचे आहे कि जीवन जगत असताना आपण प्रतेकानी एकमेकांशी सुसंवाद असू द्यावा जेणे करून आपण आपल्या सोबत आपले नातेवाईक आपले जवळचे सर्व एक प्रकारे समाधानी राहतील, आपले जीवन सुलाभतेणे आपण जगू शकतील, सुसंवादाने बर्याचशा समस्या सोडवल्या जातात.

    त्यामुळे आपले सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी सुसंवाद असणे अत्यंत आवश्यक (गरजेचे) आहे.

लेखक: ज्ञानेश्वर सु. पांचाळ

    

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...