सोमवार, २० मे, २०२४

उन्हाची तीव्रता वाढत आहे, झाडे लावा झाडे जगवा

या ब्लॉग चे शीर्षक पाहता आपणास ब्लॉग चा विषय समजला असे मी समजतो. तर आपण सर्व वाचक म्हणाल कि हे वाक्य आम्हाला शाळेत शिकवले आहे, आम्हाला माहिती आहे वगैरे वगैरे. मला हा ब्लॉग आता यावेळी का लिहावा वाटला याचे कारण म्हणजे यावर्षी म्हणजे २०२४ च्या उन्हाची तीव्रता पाहता मला असे जाणवले कि झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि त्याला सर्व आपण मनुष्य प्राणी जिम्मेदार आहोत. मनुष्यांनी जागोजागी सिमेंट कोन्क्रीट चे रस्ते वाढवले, पण रस्त्याच्या दुतर्फा झाडे मात्र लावली नाही, काही ठिकाणी झाडे लावली परंतु ती योग्य पधतिने जगवली नाहीत. त्यानंतर सिमेंट कोन्क्रीट च्या इमारती अति मोठ्या प्रमाणात वाढल्या, त्यासाठी झाडे तोडण्यात आली. शेती योग्य जमिनी चा वापर शहरीकरण वाढवण्यासाठी अती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि दिवसेंदिवस ती वाढत आहे.


 

     शहरीकरण वाढत आहे परंतु झाडे मात्र कमी होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. तर मित्रहो आपण पर्यावरण आणि पर्यावरणाचा समतोल वाढवण्यासाठी झाडे कशे वाढवता येतील यासाठी खूप सारे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जसे कि आपण शहरातच झाडांची संख्या कशी वाढवू शकतो, जी झाडे लावली आहेत ती कशा पद्धतीने जगवू शकतो. काही वेळेस असे होते कि आपण मोठा गाजावाजा करून झाडे लावतो परंतु ती झाडे परत पंधरा दिवसात कुणी तरी तोडून टाकतात. तर त्यासाठी ती झाडे मोठी होईपर्यंत त्याची योग्य प्रकारे कशी निगा राखता येईल याचे नियोजन प्रथम होणे गरजेचे आहे. 


   झाडे आपण प्रत्येक इमारतीच्या आवारात लाऊ शकतो जसे कि आपल्या घरातील प्रांगणात, रस्त्यांच्या दुतर्फा, शासकीय इमारतीच्या प्रांगणात, मंदिरासमोरील प्रांगणात, शहरात बगीचा असतो तिथे झाडांची संख्या आपण वाढवू शकतो. तसे पहिले तर झाडे लावण्यासाठी जागा असते पण आपण मनुष्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतो. तर झाडे लावणे आणि ती वाढवणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. कारण झाडामुळे प्रत्येक प्राण्यांना प्राणवायू मोफत मिळतो, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांसारखी मदत दुसरे कुणी करू शकत नाही. 

      सध्याचे २०२४ चे उन्हाचे तापमान पाहता आपणास लक्षात येईल कि यावर्षी चे उन्हाचे चटके हे दरवर्षी पेक्षा जास्त प्रमाणात जाणवत आहेत. आपण प्रवासात पाण्याची थंड बाटली विकत घेतली तर तासाभरात त्या पाण्याच्या बाटलीतील पाणी गरम होत आहे, यावरून समजावे कि उन्हाचे प्रमाण किती वाढले आहे.

      तर प्रथ्वीवरील पर्यावरण आबाधित राखण्यासाठी झाडे लावून जगवणे अत्यंत गरजेचे आहे, तर आपण हा ब्लॉग वाचल्यानंतर लवकरात लवकर आपल्याच्याने शक्य असेल जिथे कुठे आपण झाड लाऊन ते वाढवू शकतो तिथे ते झाड लावावे, जेणे करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपली ती एक प्रकारची मदतच होईल. तर आपणास विनंती आहे कि येणाऱ्या पावसाळ्यात आपण एक तरी झाड लावावे आणि तेथेच न थांबता ते झाड वाढेपर्यंत त्याची निगा राखावी.

 आपला विश्वासू लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...