शनिवार, ९ जानेवारी, २०२१

जुना मारुती मंदिर माजलगाव

 माजलगाव शहर हे बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे, माजलगाव दोन भागात विभागले आहे जसे की जुने माजलगाव आणि नवीन माजलगाव. जुना माजलगाव म्हणजे झेंडा चौक परिसर आणि नवीन माजलगाव हे हनुमान चौक पासून केसापुरी कॅम्प पर्यन्त. तर जुना मारुती मंदिर हे देखील जुने आहे म्हणजे खूप वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले आहे. 

           जुना मारुती ला साधारण मी सहावी ला असल्यापासून दर शनिवारी दर्शन करण्यासाठी जात असे कधी सायकलवर कधी पायी. येथे दर्शनाला गेल्यास खूप शांत आणि प्रसन्न वाटते. या मारुती वर माजलगाव वासीयांची खूप श्रद्धा आहे. दर शनिवारी आणि आमावस्या दिवशी लोक आवर्जून वेळात वेळ काढून येथे दर्शनाला जातात. 

         या मारुतीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे जुन्या माजलगाव म्हणजे झेंडा चौकातून सरळ खाली जावे लागते, पुढे सिंदफना नदी पात्रातून रस्ता केलेला आहे तो रस्ता ओलांडून मारुतीला जाता येते, नदीला थोडे पाणी असते परंतु ते पाणी फार खोल नसते अगदी खूप झाले गुडघ्या इतके, हे पाणी सहज ओलांडून आपण जुन्या मारुतीला जाऊ शकतो. दुसरा मार्ग म्हणजे तेलगाव रोड वरील पूल ओलांडून परभणी चौकातून सरळ पाथरी रोड ने जाणे वाटेत एक किलोमीटर च्या जवळपास डाव्या बाजूला दक्षिण मुखी मारुतीला जाण्यासाठी एक कमान लावली असून तेथून देखील आपण या दक्षिणमुखी मारुती चे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो. 

        या मारुतीला हनुमान जयंतीला महाप्रसाद असतो भल्या पहाटे भाविक दर्शनासाठी येतात. मारुतीचे मंदिर खूप सजवले जाते. लायटिंग मंडप, हनुमान चालिसा पठण वगैरे कार्यक्रम इथे होतात. नदीपात्रातील रस्ता साफ करून त्या पूर्ण रस्त्यावर पाणी मारून स्वच्छ रस्ता केला जातो. 

       सध्या या मारुतीच्या मंदिर परिसरात अगोदर च्या तुलनेत खूप बदल झाले आहेत जसे की भव्य सभामंडप मंदिरासमोर बांधला असून दोन्ही मार्गाकडून येणाऱ्या रस्त्यावर कमानी बांधल्या आहेत, मंदिराच्या सभोवताली लोखनडी पाईपचे कुंपण केले आहे, मंदिर परिसरात लहान मुलांसाठी घसरगुंडी करण्यात आली आहे.

       या मंदिर परिसरात एक लिंबाचे झाड आणि एक हपसा आहे त्याचे पाणी हमखास गोड लागते. नदी पात्रातील रस्ता नदीला पूर आल्यावर बुजून जातो म्हणून भाविकांसाठी पर्यायी रस्ता जो कि पाथरी रोड वरून करण्यात आलेला आहे, या मार्गे लोक दर्शनासाठी जाऊ शकतात. तर असे हे माजलगाव चे जुने हनुमान मंदिर आहे, जे कुणी अजूनही गेले नसतील त्यांनी अवश्य या दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घ्यावे.

आपला विश्वासु,

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ,

रा. माजलगाव.

२ टिप्पण्या:

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...