रविवार, २७ डिसेंबर, २०२०

ऑनलाईन विवाह जुळवताना

 विषयाचे नाव वाचून आपल्या डोळ्यासमोर इंटरनेट चे चित्र समोर दिसते कारण विषयच इंटरनेट शी समनधित आहे. सध्याचे वर्तमान युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते, कारण सध्या सर्वत्र इंटरनेटचा वापर हा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या सहाय्यानेच होत आहे. उदाहरणार्थ: आपला मोबाईल, संगणक, ऑनलाईन फॉर्म भरणे, ऑनलाईन पैसे पाठवणे इत्यादी. म्हणजे इलेक्ट्रॉनिक शिवाय जगणे अवघड होईल जर काही दिवस हे इंटरनेट बंद झाले तर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


      सध्या ऑनलाईन प्रणाली च्या सहाय्या ने विवाह जुळत आहेत जसे की ऑनलाईन विवाह जुळवणी च्या वेबसाईट आहेत ज्यावर इच्छुक वर किंवा वधु नोंदणी करून पसंती चे स्थळ निवडतात, उदा. Www.shadi.com, matchmeker इत्यादी. तसेच सध्या वॉटसप च्या माध्यमातून बायोडाटा येतात त्यावर हि वधु वरांची थोडक्यात माहिती येते, आणि पसंतीचे विवाह जुळतात. 

       ऑनलाईन विवाह जुळवा जुळवी काळाची गरज आहे, कारण प्रत्येकाला वेळ देणे सध्याच्या व्यस्त जीवनात कठीण आहे, त्यातल्या त्यात नाते गोते पाहणे, शिक्षणाची अपेक्षा, नोकरीची जुळवा जुळव, वयाचा, उंचीचा, विचारांचा दिखील विचार केला जातो आणि तो केलाच पाहिजे. कारण पारंपरिक विवाह जुळत होते पण त्यावेळी वॉट्सप, ऑनलाईन विवाह जुळण्याची सुविधा नव्हती त्यामुळे शिक्षण आणि इतर पसंती एवढी कुणी पाहत नव्हते, कारण मुलगा कमावतो एवढे पुरेशे होते आणि मुलीला स्वयंपाक येतो एवढे पुरेशे होते. आता दीवसेंदिवस मुलाच्या आणि मुलीच्या हि अपेक्षा शिक्षणा नुसार आणि नोकरी नुसार वाढल्या आहेत.

     अपेक्षा वाढल्या ठीक आहे ज्याच्या त्याच्या गरजा असतात त्याबद्दल काही दुमत नाही, मूळ विषय म्हणजे ऑनलाईन विवाह जुळवताना प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खूप साऱ्या फसवणुकी होत आहेत, जसे चुकीची किंवा फसवी नोंदणी केली जाते, डमी फोटो , शिक्षण टाकून फसवी माहिती देऊन ऑनलाईन विवाह जुळतात आणि विवाह जुळल्या नन्तर , लग्न झाल्यावर डमी उमेदवाराची खरी माहिती मिळते, नन्तर फसवणूक झाल्याची जाणीव होते. त्यांमुळे ऑनलाईन किंवा वॉट्सउप द्वारे विवाह जुळवताना वधु किंवा वर दोन्ही बाजूने योग्य चौकशी करावी, उदा. मुलीचे किंवा मुलाचे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, घर आहे किंवा नाही, काही आजार आहे किंवा नाही, नाते समंध या सर्व चौकशी होणे अत्यन्त गरजेचे आणि आवश्यक आहे.


    या ब्लॉग लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की ऑनलाईन विवाह जुळवताना किंवा वॉट्सप द्वारे मिळालेल्या माहिती ची, म्हणजे उमेदवाराने जी माहिती बायोडाटा वर ऑनलाईन किंवा वॉट्सउप वर दिली आहे ती माहिती खरी आहे का? याची खात्री झाल्याशिवाय विवाह जुळवा जुळवीची घाई करू नये, कारण हा प्रत्येकाच्या म्हणजे ज्यांचे लग्न होणार असते त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो, मुला मुलींचे आई वडिलांचे स्वप्न असतात आणि खर्च हि खूप सारा होतो म्हणून हे सर्व खात्री लायक पाहणे अत्यन्त आवश्यक आहे.

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...