भ्रमणध्वनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भ्रमणध्वनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

Mobile Fad (मोबाईल वेड)

ब्लॉग चा मथळा वाचुन आपणास ब्लॉग चा विषय समजला असेल. सध्या चे युग मोबाईल (भ्रमणध्वनी) युग असे म्हणल्यास काही वावगे ठरणार नाही, कारण लहान वयाच्या मुलापासून ते वयस्कर माणसे हे मोबाईल चा वापर सर्रास वापर करतात. सुरवातीला मोबाईल हा दुरवर असणाऱ्या नातेवाईकांना निरोप देणे, खुशाली विचारण्यासाठी होत होता, परंतु जेव्हा पासून ॲण्रड्रॲइड मोबाईल सोबत फाईव्ह जी तंत्रज्ञान आले आहे तेव्हापासून मोबाईल चा वापर हा विविध उपयोगासाठी होत आहे. जसे की फोटो, चित्रीकरण, रेकॉर्डिंग, यूट्यूबवर विविध व्हिडिओ पाहण्यासाठी, इंटरनेट वरील माहिती काढणे, पत्ता शोधणे ईत्यादी साठी होत आहे. त्यामुळे लोक एकमेकांशी खुप कमी संवाद साधत आहे. प्रत्येकाला मोबाईल हवाहवासा वाटतो. कारण या मोबाईल मध्ये आपणास हवी ती माहिती हवी तेव्हा मिळते. 
      


      प्रत्येक तंत्रज्ञान जसे उपयोगी पडते तसे त्याच्या पासुन होणारे तोटे ही तेवढेच असतात. जसे की मोबाईल चे व्यसण लागणे, लहान मुले सतत मोबाईल वर गेम खेळत असतील तर त्यांचे डोळे कमजोर होतात, बुद्धी क्षमता कमी होणे, नजर कमी होणे, शारीरिक कामे कमी झाली आहेत, माणसा माणसा मध्ये सुसंवाद कमी झाला आहे, कारण मोबाईल वर प्रत्येक जण विविध छंद जोपासत आहे. यामुळे समाज एका वेगळ्या दिशेने जात आहे, इत्यादी. मोबाईल ने होणाऱ्या दुष्परिणामापासुन वाचण्यासाठी सर्वानी आपणास आवश्यक असणार्या कामासाठीच मोबाईल चा वापर करणे आवश्यक आहे. तरच येणारा समाज हा मोबाईल वेडा होण्यापासून वाचेल. 
     मोबाईल वेड कींवा व्यसण टाळण्यासाठी आपण सर्वांनी विविध प्रकारची अनावश्यक कामे मोबाईल द्वारे करणे टाळावेत. जसे कि मनोरंजक युट्युब व्हिडिओ सतत पाहणे टाळावेत, आपल्या जवळपासच्या दुकानात मिळणार्या वस्तू ऑनलाईन न मागवणे, सतत गेम खेळणे टाळावेत, लहान मुलांना मोबाईल वापरण्यास मनाई करावा, त्याऐवजी मुलाना मैदानी खेळ खेळण्यास प्रव्रत्त करावे, अत्यावश्यक कामेच मोबाईल द्वारे करावेत. 
     मोबाईल व्यसण टाळण्यासाठी आपणास वरीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे. आपण काळजी घेतली तरच आपण, आपला परिवार, आपला समाज, सर्व मनुष्य प्राणी मात्र आणि निसर्ग संतुलन राखण्यासाठी देखील फायदा होईल. तर मग सर्वानी हा लेख वाचल्यापासून शक्य तेवढा मोबाईल चा वापर कमी करावा व हा लेख आपल्या सर्व मित्राने वाचण्यासाठी फाऑरवर्ड करावा जेणेकरून सर्वाना मोबाईल वापराचे फायदे आणि तोटे समजतील, ही नम्र विनंती. 

ब्लॉग लेखक, 
ज्ञानेश्वर सुर्यकांत पांचाळ. 

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...