बुधवार, १५ मार्च, २०२३

पळून जाऊन प्रेमविवाह का करू नये

 या ब्लॉग चे शीर्षक “पळून जाऊन प्रेमविवाह का करू नये” असे दिले कारण हा विषय थोडा गंभीर असल्यामुळे. सध्या चे युग हे तेविसावे शतक आहे बरेच जणांना हे जुनाट विचार सरणी असल्यासारखे वाटेल. जुनी विचार सरणी आणि नवीन विचार सरणी असा विचार न करता, याकडे सकारात्मक दृष्टीने पहिले तर याचे चांगले परिणाम होतील. जे काही आपण आयुष्याचे निर्णय घेतो त्याचे दोन परिणाम होतात चांगले आणि वाईट. तर शीर्षकानुसार पळून जाऊन प्रेमविवाह का करू नये. आपल्या भारतीय समाजा मध्ये प्रेमविवाह करण्यास प्रतेक कुटुंबातील पालक वर्ग विरोध करतात. त्यांचे हे विचार करणे साहजिक आहे, कारण पालक मुलांना जन्म देतात, लहानाचे मोठे करतात, शिक्षण देतात, त्या पाल्याला सर्व सुख मिळावे याचे ते नेहमी प्रयत्न करत असतात, चांगल्या वाईट दिवसांमध्ये ते आपल्या पाल्यांना सांभाळून घेतात इत्यादी.


      भारतीय समाजामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे समाज हा जाती मध्ये विभागलेला आहे. मुंबई पुणे सार्ख्या शहरामध्ये जाती पाती पाहून विवाह करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण इतर लहान शहरामध्ये जाती पाहून विवाह होतात. त्या काळानुसार त्या त्या प्रथा योग्य होत्या परंतु आधुनिक काळानुसार नवीन बदल होत आहेत. मुल मोठी होतात, शिकण्यासाठी बाहेर शहरात जातात, तिथे शिक्षण घेतात, नवीन मित्र मैत्रिणी होतात, काही मित्र मैत्रिणी प्रेमात पडतात, विवाह करण्याचा निर्णय घेतात, नंतर त्यांना पालकांना हे प्रकार सांगावेसे वाटत नाही, कारण पालक परवानगी देणार नाही हे साहजिकच असते. नंतर हे प्रेमी युवक युवती पळून जाऊन विवाह करतात. काही काळानंतर पालकांना आपल्या पाल्यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याचे माहिती होते, आणि आई वडिलांना कुटुंबियांना याचा खूप मोठा धक्का बसतो, त्यातले त्यात पालक जर र्हादय रुग्ण असतील तर त्यांना र्हदय विकार होण्याचे प्रकार होतात. त्यातले त्यात काही पालक आपल्या पाल्या साठी खूप स्वप्न जमवलेली असतात, जसे कि माझा मुलगा किंवा मुलगी शहरात शिकायला गेला आहे, मोठी परीक्षा देऊन मोठा अधिकारी होईल नंतर आयुष्याचे सार्थक होईल वगैरे वगैरे. सर्वच तरूण असे निर्णय घेत नाहीत परंतु काही पाल्याना याची जाणीव नसते किंवा त्याचे परिणाम विषयी त्यांना काही जाणीव होत नाही.

       महत्वाचे म्हणजे तरूण मुले किंवा मुली यांना व्यवहाराची आणि अनुभवाची कमी असते. पळून जाऊन विवाह करण्या अगोदर तो मुलगा किंवा मुलगी पुढील जीवन स्वावलंबी जीवन जगू शकतात का, हा विचार होणे गरजेचे आहे, नंतर खरच कोणत्या हि परिस्थिती मध्ये ते एकमेकांना सांभाळून घेऊ शकतात का, नंतर पळून जाऊन विवाह करणे खरेच गरजेचे आहे का, पळून जाऊन विवाह केल्या नंतर आपल्या आई वडील आणि कुटुंबियांना कोणत्या प्रकारची परेशानी होईल, तर असे विचार होणे गरजेचे आहे. आई वडीलाना एकदा विचारून पाहणे आवश्यक आहे, त्यांना पळून जाऊन विवाह करण्या अगोदर विचारणे हि पाल्यांची जिम्मेदारी आहे परंतु बरेचशे मुल मुली तसे करण्यास घाबरतात.

     हा मुला मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे परंतु पालक हि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. आयुष्याचे त्यातल्या त्यात विवाहाचे निर्णय तरी आई वडिलापासून लपवू नये, त्यांना सोबत घेऊनच करायला हवेत. कारण सध्याचे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, समाज खूप मोठ्या गतीने बदलत आहे. त्यामुळे पाल्यांनी शिक्षण पूर्ण होऊन सक्षम होई पर्यंत तरी पळून जाऊन विवाह करू नये. कारण असे विवाह अगोदर खूप घडलेले आहेत, त्यापैकी बरेच म्हणजे जास्तीत जास्त यशस्वी झालेले नाहीत. पळून जाऊन विवाह करणाऱ्या पाल्या सोबत खूप सार्या दुर्घटना झालेल्या आहेत आणि होतात. आपण सर्व पेपर वाचता, बातम्या ऐकता त्यावर पळून जाऊन प्रेमविवाह करणार्यांचे दुर्घटना खूप सार्या बातम्या वाचयला मिळतात. हा लेख वाचून बरेच जन म्हणतील कि आई वडिलांनी लग्न लाऊन दिलेले तरी कुठे सुखी असतात, त्यांच्यात पण खूप सारे भांडण, फारकत वगैरे वगैरे होत असतात, ते सर्व बरोबर आहे परंतु त्यांच्या चांगल्या वाईट परिस्थिती मध्ये त्यांचे पालक त्यांच्या सोबत असतात.

     त्यामुळे मला तरी वाटते, तरुण तरुणींनी आपले शिक्षण आणि आपले जीवन कसे सक्षम आणि स्थिर होईल जेणे करून आपले कुटुंब हि समाधानी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांचे हि आपल्या पाल्या विषयी स्वप्न असतात. पालकांना विश्वासात घेऊन, परिस्थितीचे भान ठेऊन विवाह सारखे निर्णय घेणे गरजेचे आहे.

क्रमश:

ब्लॉग लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.  

रविवार, १२ मार्च, २०२३

NET Exam (राष्ट्रीय पात्रता परीक्षा)

NET (National Eligibility Test) and JRF (Junior Research Fellowship) 
म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा, ही परीक्षा प्राध्यापक पद पात्र होण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा NTA मार्फत घेतली जाते. उमेदवार हा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेला कींवा पदव्युत्तर परीक्षा अपीयर म्हणजेच पदव्युत्तर पदवी च्या शेवटची परीक्षा देणार असावा. नेट जेआरएफ परीक्षेची जाहिरात वर्षातुन दोनदा येते. साधारणतः डिसेंबर आणि जुन मध्ये या परीक्षेची जाहिरात येते. परीक्षा फ़ॉर्म व परिक्षा शुल्क online भरावा लागतो.
        परीक्षा फ़ॉर्म भरताना आपल्या कडे स्क्यान केलेला फोटो व आपली सही असणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क क्याटेगरि प्रमाणे वेगवेगळी असते. जसे की खुला गट, इतर मागास वर्ग, अ. जाती जमाती ईत्यादी. परीक्षा फ़ॉर्म मध्ये उमेदवाराने सविस्तर माहिती भरणे आवश्यक आहे, जसे की शैक्षणिक, ईमेल व इतर. फ़ॉर्म भरल्या नंतर साधारण दोन महिन्यानंतर विद्यार्थ्याचे परीक्षा प्रवेश पत्र नेट च्या वेबसाइटवर येते. Online फ़ॉर्म भरते वेळी जो आय. डी. पासवर्ड टाकला होता तोच आय डी पासवर्ड परिक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वापरावा लागतो. 
         परिक्षा साधारण मार्च आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये असते. उमेदवाराने परीक्षेत जाताना प्रवेश पत्र, शासकिय ओळखपत्र, काळा किंवा निळ्या शाही चा पेन सोबत नेणे गरजेचे आहे. 
        जे आर एफ साठी वेगळी परीक्षा नसते, जे आर एफ ही फेलोशिप साठी मिळते. नेट मध्ये मेरीट नुसार एकुन पास झालेल्या उमेदवारांपैकी पहील्या पंधरा टक्के उमेदवारांना साधारणतः जे आर एफ साठी निवड होते. परीक्षेचा निकाल हा online जाहीर होतो, उमेदवाराने आपला निकाल नेट परिक्षेच्या वेबसाइटवर लॉगिन करून पहावा लागतो. 
        नेट परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवार हा प्राध्यापक पदासाठी पात्र होतो आणि पीएचडी प्रवेशासाठी  साठी देखील पात्र होतो. नेट उत्तीर्ण उमेदवारास पीएचडी प्रवेश घेण्यासाठी कुठली वेगळी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. 
        अधिक माहिती साठी https://ugcnet.nta.nic.in/ या वेबसाइट ला भेट द्या. येणार्या नेट परीक्षेसाठी आपणा सर्व नेट परीक्षा देणार्याना शुभेच्छा💐💐💐💐

ब्लॉग लेखक, 
ज्ञानेश्वर सुर्यकांत पांचाळ. 
      

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...