रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

भारतीय आरोग्यव्यवस्था

भारतीय आरोग्यव्यवस्था अतिशय कमकुवत असल्याचे खरी जाणीव आपणास मागील नऊ महिन्यात प्रकर्षाने जाणवले. कारण कोरोना चा प्रादुर्भाव, संचारबंदी आणि दवाखाने व डॉकटरची कमतरता हे सर्व अनुभव भारतीय लोकांनि पहिल्यांदा जवळून अनुभवले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रति 1000 व्यक्तिमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे, परंतु भारतात हेच प्रमाण तीन ते चार हजार व्यक्तिमागे एक डॉक्टर असे आहे. देशाच्या बजेट मधील किमान 5 टक्के खर्च आरोग्यावर होणे आवश्यक असताना केवळ एक टक्का खर्च हा आरोग्य व्यवस्थेवर होत असून ही मोठी शोकांतिका आहे. 

          बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मी रहिवाशी असलंयामुळे तेथील परिस्थिती जवळून पहिली आहे आणि लहान पणा पासून अनुभवतोय. माजलगाव हा तालुका असून जवळपास सत्त्तर खेडी या तालुक्यात येतात. माजलगावत एक सरकारी इस्पितळ आहे आणि तिथे केवळ तीन डॉक्टर व इतर सहाययक नर्स, कम्पाऊंडर असतात. परंतु यातील एखादा डॉक्टर सुट्टीवर असेल तर येथील आरोग्य व्यवस्ता कोलमडली जाते. कारण पेशन्ट रोजचे जवळपास अंदाजे सातशे ते हजार असतात, त्यामध्ये प्रसूती महिला, शुगर, हाडाचे बरेच पेशन्ट असतात. मग सरकारने याकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला काय अडचण आहे. कारण हा आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न असतो. खाजगी दवाखान्यात अव्वाच्या सव्वा फी असते, मध्यमवर्गीयांना ती परवडत नाही. यावर उपाय करणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. एखादा गंभीर आजाराचा पेशन्ट असेल तर त्याला हमखास बीड, अंबाजोगाई किंवा औरंगाबाद ला न्यावे लागते. मग तो पेशन्ट तिथपर्यंत जाई पर्यंत जगेल याची शाश्वती नसते. यावर खूप अगोदर उपाय होणे आवश्यक होते परंतु आजही हि परिस्थिती वीस वर्षापासून आहे तशीच आहे. याला जबाबदार स्थानिक पुढारी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार.
           अमर्त्य सेन यांनी टाटा च्या एका कार्यक्रमात म्हटले की भारतापेक्षा लहान असलेले देश श्रीलंका, बांगलादेश, भूतान हे आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहेत, भारताची परिस्थिती किती कमकुवत आहे हे यावरून 100% माहिती होते. 
            भारतीय राजकारण्यांनी प्रत्येक क्षेत्रात असे विचित्र राजकारण केल्यामुळे हि परिस्थिती भारतावर ओढवली आहे. सरकारी योजना जसे आयष्मांन भारत, आरोग्यदूत इत्यादी यांची काटेकोर अमल बजावणी होणे गरजेचे आहे. सरकारी आरोग्य सेवा देताना त्यामध्ये सवलती असणे देखील आवश्यक आहे. 
          दिल्ली मध्ये केजरीवाल सरकारने जी व्यवस्था केली त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्थेमध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या आहेत. दिल्ली मध्ये मोहल्ला क्लिनिक प्रत्येक भागामध्ये दिले आहेत, सरकारी दवाखाने उच्च दर्जाची बनवली असून तेथे तज्ञ डॉक्टर लोकांना हि काटेकोर नियम केले आहेत, असेच उपाय पूर्ण भारतात होणे आवश्यक आहे, तरच भारताची आरोग्य व्यवस्था सुधारेल.

संदर्भ

लेखक, 
ज्ञानेश्वर पांचाळ. 
          

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...