शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

माहिती तंत्रज्ञान

 सध्या आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत आणि वर्तमान युग हे माहिती तंत्रज्ञान युग म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दशकापासून आपण पाहतोय कि संगणका मूळे खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये बदल घडत आहेत. याला कारण म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये होणार तंत्रज्ञानाचा वापर.

       थोडक्यात वीस वर्षांपूर्वीचा काळ आठवा आपण तहसील मध्ये साधे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलो तर लांबच लांब लोकांची रांग लागत असे, प्रत्येक कागदपत्र एका फाईल ला जोडून कार्यालयात जमा करावी लागत असे, नन्तर त्याची पावती घेणे, नन्तर महिनो न महिने चकरा मारत राहणे, फाईल वेळेवर सापडत नसे, म्हणजे खूप सारे ढिसाळ आणि वेळखाऊ सर्व कारभार होते. 


       त्यांनतर हळूहळू संगणक बाजारात येणे चालू झाले सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट, नन्तर कलर संगणक, विंडोज 95 ऑपरेटिंग सिस्टिम पासून ते विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम पर्यंत एवढे बदल झाले की, एवढे बदल होतील याची कल्पना देखील कुणी केली नसेल. हे सर्व माहिती तंत्रज्ञानाच्या वापर वाढल्या मुळे दिसत आहे.

       माहिती तंत्रज्ञान म्हणजे प्रत्येकाला लागणारी सुविधा, माहिती, त्याचे रोजचे काही अडचणी किंवा प्रश्न, शासकीय किंवा अशासकीय सोयी सुविधा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळणे किंवा मिळवणे याला आपण माहिती तंत्रज्ञान असे म्हणतो.

       उदा. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीने मिळणे, सरकारी सुविधा ई-सुविधा द्वारे मिळणे, बँकेतील पैसे एटीएम द्वारे काढणे इत्यादी.

        आपण सध्या स्वतः टच प्याड चा मोबाईल वापरतोय, मुलांसाठी आय पॅड खेळण्यासाठी घेतोय, ऑनलाईन टिकेट बुकिंग, ऑनलाईन शॉपिंग, ग्यास बुकिंग मोबाईल द्वारे इत्यादी. आणि लोकडाऊन च्या काळात तर सर्वात महत्वाचा अनुभव म्हणजे ऑनलाईन शिक्षण. हे सर्व बदल माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे च होत आहेत.

       येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञाना मध्ये खूप सारे बदल होतील जसे की रोबोट द्वारे ऑनलाईन शस्त्रक्रिया, म्हणजे माणसाची जवळपास 80 ते 90 टक्के कामे हि माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होतील. डिजिटल इंडिया चा प्रचार प्रसार ज्याप्रमाणे चालू आहे, जसे की प्रत्येक क्षेत्रात जसे ऑनलाईन बँकिंग, इ निविदा, इ प्रशासन इत्यादी. मोबाईल द्वारे बिल पेमेंट सुविधा म्हणजे भारतामध्ये या सुविधा इतक्या वेगाने येतील असे कधी वाटले नव्हते पण त्या सुविधा आपल्या पर्यंत आल्यात.


         भारतामध्ये सर्वत्र इंटरनेट चे जाळे सर्वदूर पसरले असून प्रत्येक शहरात आणि खेडेगावात इंटरनेट साठी लागणारी केबल आणि मोबाईल इंटरनेट टॉवर बसवण्यात आलेली आहेत. आपनास आठवत असेल 10 वर्षांपूर्वी सारखी लाईट जात असे पण आता लाईट जात नाही आणि त्याचमुळे मोबाईल आणि इंटरनेट सुविधा व्यवस्थित वापरात येत आहे. 

        संगणक साक्षर जो कुणी नसेल तो अशिक्षित आणि अडाणी म्हणून गणला जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी संगणक साक्षर होणे काळाची गरज आहे. जे सध्या वयाची पंचावन किंवा साठी ओलांडली त्यांना एवढे अत्याआवश्यकता नाही परंतु येणारी पिढीतील प्रत्येक जण संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. 

          या सर्व माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत असताना माणसं माणसांना कमी ओळखायला लागलीत, माणुसकी हि वॉट्सप व फेसबुक मार्फत दिसत आहे, समोरून येणाऱ्या माणसाला नमस्कार किंवा रामराम घालणे बंद झाले असून वॉट्सप फेसबुक वर हाय, हॅलो चालू झाले आहे.

        वरील मुद्दा सांगण्याचा उद्देश एकच कि माणसाने माणसाची ओळख विसरू नये, किती हि तंत्रज्ञान पुढे गेले तरी आणि तेच मनुष्य जातीच्या हिताचे आहे. माहिती तंत्रज्ञान आवश्यक आहेच पण त्याचा अति वापर हा घातकच आहे. 

संदर्भIT

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...