श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाच्या मथळ्या वरून आपल्या डोळ्या समोर अंगात येणाऱ्या लोक आठवतात जास्त करून महिलांच्या अंगात येते परंतु काळानुसार खूप बदल होत आहेत. सध्या विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान युग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे त्याचप्रमाणे अंगात वगैरे येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. शहरी भागात तुरळीक ठिकाणी अंगात येते तसेच ग्रामीण भागात हि याचे प्रमाण दशकापूर्वीचा विचार केला तर खूप कमी झालेले आहे.
तरीही इतर अंधश्रद्धा आहेतच. जसे रस्त्यावर हात पाहून भविष्य सांगणारे लोक, घरावर मिरची किंवा नजर लागू नये म्हणू काळा कपडा लावलेली बाहुली लावणे, घरामध्ये वादविवाद होत असतील तर कुणीतरी जाणता व्यक्ती असतो त्याच्या कडे जाऊन त्याला घरातील वाद विवादावर तोडगा काढणे त्यासाठी हा जाणता माणूस वेगवेगळे उपाय नाहक सांगतो जसे काहीतरी शांती करा, हे उपवास करा, याची पूजा करा, त्यांना दान करा, कोंबडे बकऱ्याचा बळी द्या इत्यादी. हे सांगायचा उद्देश म्हणजे आजही लोक या जाणत्या लोकांनी सांगितलेले उपाय करतात त्यामध्ये मग काही सुशिक्षित घरातील लोक हि असतात. हे सर्व ठीक आहे परंतु आपण एकविसाव्या शतकाकडे जात असताना नरबळी सारखी बातमी वाचण्यात येते हि मोठी शोकांतिका आहे.
मी श्रद्धेच्या विरुद्ध नाही ज्याची त्याची श्रद्धा आणि भावना असते परंतु श्रद्धा करता करता आपण कुठे तरी अंधश्रद्धेकडे वळायला लागतो हे घातक आहे. धकाधकीचे जीवन आहे तसे तुम्हाला अडचणी येणारच पण त्यावर उपाय म्हणून अशा जाणत्या व्यक्ती कडे जाणे योग्य नाही. त्यातून उपाय तर होत नाही परंतु माणूस भरकटून जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन असायला हवा, वास्तविकतेला धरून निरीक्षण करावे, त्यावर नक्कीच उपाय असतो. बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत कुठे कोंम्बड किंवा बकरे कापले जाते हे अतीच होते.
लोकांच्या या अंधविश्वासाचा गैरफायदा हे भोंदू बाबा लोक खूप मोठया प्रमाणात घेतात यांचा हा शिल्लक व्यवसाय झाला आहे. बऱ्याचशा तरुण वर्ग आता याकडे फिरकत नाही ही चांगली गोष्ट आहे. परंतु महिला वर्ग या बाबतीत अजूनही म्हणावा तेवढा सजग नाही. त्यांच्यासाठी प्रबोधन होणे आवश्यक आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा देखील वाढणे अत्यन्त आवश्यक आहे. कारण म्हण आहेच की "स्त्री शिकली घराची प्रगती झाली" त्यामुळे महिला जागृत होणे अत्यन्त आवश्यक आहे.
आपण पाहतो महिला वर्ग त्यांच्या घरातील कामात खूप व्यस्त असतात, त्यांना कुठे असे प्रबोधनात्मक कार्यक्रमाला जायला मिळत नाही. सुशिक्षित आणि सुधारित घरातील महिला चें व्यवस्थित आहे परंतु साधारण परिस्थिती आणि शिक्षण कमी असणंऱ्या घरातील महिला ना खूप मर्यादा असतात त्या ठिकाणी प्रबोधन होण्यासाठी वेगवेगळे उपाय होणे आवश्यक आहे. हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे सुशिक्षित लोकांनी देखिल या लोकांना वास्तविक गोष्टी लक्षात किंवा त्यांचे प्रबोधन करून त्यांना वैज्ञानिक विचाराकडे आणायला हवे.
आता वॉट्सप आहे, सोसियल मेडिया आहे याचा वापर आपण अंधश्रद्धा कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील काही नतद्रष्ट लोक अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करत आहेत. उदा. चमत्कार झाला फलान्या ठिकाणी आणि हा संदेश 10 जणांना पाठवा आणि नाही पाठवला तर तुमच्या सोबत दुर्दैवी घटना घडेल. असे म्हणजे हे लोक प्रत्येक आधुनिकते सोबत अंधश्रद्धा लावून आपले दुकान कसे चालू राहील हे चांगले डोके लावतात. परंतु ते समाजासाठी घातक आहे.
अंधश्रद्धेला सध्याच्या तरुण पिढीने बळी पडू नये व्यज्ञानिक दृष्टिकोन वाढवा, वाचन करा आणि जिथे जिथे हे अंधश्रद्धेचे वारे वाहत आहेत तिथे तिथे सर्व तरुणांनी त्याला वाढू देऊ नये. एवढीच सर्वाना विनंती.
💐💐💐💐💐
लेखक,
ज्ञानेश्वर पांचाळ.