मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार

हा ब्लॉग चे नाव बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार टाकण्या मागचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील असलेली व्यवस्था. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जील्हा म्हणून ओळखला जातो, कारण या जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात लोक ऊस तोडणी करण्यासाठी जातात. वर्षा नु वर्ष हे चक्र चालू आहे. जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे, माहिती आणि तंत्रज्ञान युग आहे, प्रत्येक क्षेत्रात मोबाईल आणि संगणकाचा वापर वाढत आहे. परंतु बीड या जिल्ह्यात उच्चशिक्षित बेरोजगारांसाठी म्हणाव्या तशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. 


         इंजिनीरिंग, मास्टर डिग्री असनाऱ्या युवकांना पुणे मुंबई अशा मेट्रो सिटी ला गेल्याशिवाय पर्याय नाहीत, यामध्ये बदल व्हायला हवा. या युवकांना स्थानिक ठिकाणी आपल्या जिल्ह्यात त्यांना हवा तसा रोजगार मिळायला हवा., त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. हे गरजेचे आहे कारण सर्व जण कुटुंब घेऊन मेट्रो सिटी मध्ये जॉब करू शकत नाहीत, बऱ्याच युवकांना कुटुंब सोडून राहने अशक्य असते. मेट्रो सिटी मध्ये जॉब हे कायम नसतात, राहण्याचा खर्च, खाण्याचा खूप सारा खर्च असतो, शिवाय हाल खूप होतात. याच जॉब ची संधी या युवकांना आपल्या गावात किंवा 50 किलोमीटर च्या जवळपास मिळाली तर तो उकच्चशिक्षित युवक ती नोकरी आनंदाने करेल, भले हि पगार पुणे किवा मुंबई पेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी असेल आणि शहरात होणारी गर्दी हि कमी होईल, पर्यावरण हि शुद्ध राहील. 

          बीड या जिल्ह्यातील युवकांचे जास्त प्रमाण डी एड किंवा बि एड करण्या कडे जास्त असते, कारण नोकरी हि जिल्ह्यात मिळण्याचे प्रमाण जास्त असते म्हनून. सर्वच जण शिक्षक नाही होऊ शकत त्यामुळे इतर कौशल्य आधारित रोजगार जिल्ह्यात निर्माण होणे अत्यन्त आवश्यक आहे.

         हा ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी त्यांच्या उच्च शिक्षणा नुसार जिल्ह्यातच मिळायला हवे,  असे व्यवस्थापन शासनाने करावे ही महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती. बीड या जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद , पुणे, मुंबई ला जाणार्याचे प्रमाण हि खूप मोठया प्रमाणात आहे. स्थानिक नेत्यांनी आणि शासनाने यावर एक समिती नेमून या जिल्ह्यातील बेरोजगारांचा प्रश्न सोडवावा.

क्रमशः


Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...