शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

Yotube and Reels effects on our society (युटयूब आणि रील्स यांचे समाजा मध्ये होणारे चांगले वाईट परिणाम )

मित्रानो या लेखाच्या शीर्षक वाचल्यानंतर आपणास लागलीच समजले असेल कि हा युटयूब संबंधित लेख आहे. सध्या चे युग हे इंटरनेट युग आहे म्हणण्यास काही हरकत नाही, कारण प्रतेक व्यक्ती हा कोणत्या न कोणत्या कामासाठी इंटरनेट चा वापर करत आहे, भले हि तो सुशिक्षित असो वा अनपढ असो, पण तो इंटरनेट चा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वापर करत आहे. त्यातल्या त्यात २०२३ म्हणजे चालू वर्षी 5G तंत्रज्ञान मोबाईल बाजारात आले आणि हातोहात करोडो लोक पर्यंत पोहोचले देखील. 5G मुळे नेट ची गती वाढली आहे. इंटरनेट गाव खेड्या पर्यंत खूप मोठ्या वेगाने पोहोचले आहे. त्यामुळे इंटरनेट चा वापर लोक विविध माहिती मिळवण्यासाठी करत आहेत, त्यात लहानापासून ते मोठ्या पर्यंत सर्वच येतात. त्यात्य्ल्या त्यात युटयूब आणि रील्स चा वापर मोठ्या प्रमाणात विडीओ आणि छोटे विडीओ उपलोड करण्यासाठी होत आहे. हि चांगली गोष्ट आहे कि सर्वाना उपयोगी माहिती विडीओ मार्फत मिळते. प्रत्येक जन आपल्या परीने विडीओ बनवतात आणि युटयूब वर अपलोड करतात. परंतु मित्रानो विडीओ अपलोड करताना त्याचे समजातील लहान मोठे यांच्यावर काय परिणाम होतील याचा विचार करून टाकायला हवेत. येथे मी हा आपणास उपदेश म्हणून नाही तर समाजातील एक व्यक्ती म्हणून त्या विडीओ बद्दल माझे विचार व्यक्त करत आहे. 

    युटयूब आणि रील्स वर असंख्य चलचित्र विचीत्र पण खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. युटयूब आणि रील्स वर चलचित्र टाकल्या नंतर ते पाहणाऱ्यांची संख्या रोज एक हजाराच्या वर गेली आणि सबस्क्राईबर एक हजार च्या संख्या पार केली कि युटयूब आणि रील्स वर चलचित्र टाकणाऱ्याची कमाई चालू होते. कमाई होते हि पण चांगली बाब आहे. परंतु आपले चलचित्र जास्तीत जास्त लोकांनी पाहावे म्हणून या मध्ये जी जीवघेणी स्पर्धा चालू झाली आहे त्याचे दुष्परिणाम समाजावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होत आहेत. काही परिणाम खालील प्रमाणे. 
   आपल्या युटयूबर चलचित्र ला लाईक भेटले नाही तर तो दिवसभर चिंताग्रस्त होतो. 
   सबस्क्राईबर नाही वाढले तर आणखी तो डिप्रेशन मध्ये जातो. 
  काही जन तर आपले चलचित्र खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध व्हावे म्हणून अश्लील चलचित्र चित्रित करून युटयूबवर टाकत आहेत. 
 खूप सारे लोक दिवसातला मिळेल तो रिकामा वेळ रील्स आणि युटयूबवर व्यथित करत आहे. 
 आज काल लहान मुलांच्या हातात हि मोबाइल आहेत, लहान मुलांनी जर असे अश्लील विडीओ चुकून पहिले तर त्यांच्या बाल मनावर परिणाम होऊ शकतो.

    म्हणून मला वाटते कि आपण युटयूबवर चलचित्र अपलोड करा, परंतु त्या मार्फत समाज हित जपणारे चलचित्र टाकावेत न कि कुठले हि अश्लील चलचित्र, समाजविघातक, ज्यामुळे समाजातील सर्व वातावरण कलुषित होईल. चलचित्र टाकताना त्या चलचित्राचा बाल मनावर काही परिणाम होतो का याची चाचपणी करावी, जेष्ठ नागरिकावर काही परिणाम होतो का याची चाचपणी करावी, आपण टाकलेल्या चलचित्रावर येणाऱ्या प्रतिक्रिया वर लक्ष असू द्यावे, नकारात्मक प्रतिक्रिया येत असतील आणि त्या खूप जास्त तर समजावे कि आपण युटयूब वर टाकलेले चलचित्र समाज हिताचे नाही. तर असे नकरात्मक प्रतिक्रिया येणारे चलचित्र युटयूब वरून काढून टाकावेत. 
    युटयूब वर शक्यतो शैक्षणिक, सामाजिक, कृषिविषयक, आरोग्य विषयक, विज्ञान तंत्रज्ञान विषयक, ऐतिहासिक, राजकीय, क्रांतीविश्यक, संस्कारमय चलचित्र असायला हवेत. असंख्य प्रकार आहेत जे समाज विघातक नाहीत, त्याप्रमाणे चलचित्र बनवून आपण युटयूब वर चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता. त्यामुळे मला असे वाटते कि सर्वांनी युटयूब वर चलचित्र टाकन्या अगोदर त्याचे समाजावर काय चांगले वाईट परिणाम होतात ते पण तपासावे, त्यानंतर च चलचित्र युटयूब वर टाकावेत वा (अपलोड) करावेत. 

लेखक, ज्ञानेश्वर सुर्यकांत पांचाळ, 
पी.एच.डी संशोधक, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, महाराष्ट्र.

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...