शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

काही पाल्य का धीट नसतात

शाळेतील मुले शाळेत वाद कुणा सोबत झाला तर आपल्या पालकांना सांगतात, पालक लहान आहे तो पर्यंत तुमचे वाद शाळेत स्वतः येउन समंधितास समज देतात, परंतु तेच मुल मोठे होतात त्याना प्रत्येक वेळेस पालकांना स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकांना बोलावण्याची सवय लागलेली असते, ते मुल मोठेपणी वेगवेगळ्या प्रश्न सोडविण्यासाठी धारिष्ट्य दाखवु शकत नाही, कारण प्रत्येक वेळेस त्या पाल्याला आपल्या सोबत आपल्या पालक, बहिण कींवा भाउ, मोठी व्यक्ती सोबत घेऊन स्वतः चे प्रश्न सोडवायची सवय लागलेली असते, तर असे कुणा सोबत होत असेल तर त्यानी असे समजावे की अजून आपण शालेय जीवन जगत आहोत.

तर आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण स्वतः सोडवायचे असतात, आणि त्या पालकांनी ही आपल्या पाल्याला ठराविक वयानंतर त्याचे प्रश्न त्यालाच सोडवायला लावायचे असतात, तेव्हाच ते स्वतः चे प्रश्न स्वतः सोडवु शकेल...... तरच ते पाल्य धीट होतील..... आणि आपल्या जीवनातील विविध समस्या देखील व्यवस्थीत पणे सोडवतील. धन्यवाद 🙏

एक अनुभव,
लेखक: ज्ञानेश्वर पांचाळ.

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...