मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

शिकलेले तेवढे हुकलेले' असे म्हणू नये

शिक्षणाबद्दल विषय निघाला तर, काही लोक शिकलेल्या लोकांना हीणवण्यासाठी, 'शिकल्याले तेवढे हुकलेले' अशी उपाधी देतात, माझे त्याना एवढेच सांगणे आहे की जीवनात चुका होतच असतात, त्या प्रत्येकाकडून होत असतात, म्हणून एखाद्या शिकलेल्या माणसाला हिणवने साफ चुकीचे आहे.
       आज शिकलेल्या लोकांमुळे जगात भारत देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. आपल्या हातातील मोबाईल, रस्ते बांधणारे इंजिनीयर, आपल्या घरातील विज हाताळणारे लाईनमण, शाळेत शिकवणारे शिक्षक, डॉक्टर, ईंजीनीयर, पोलीस, वकील, कलेक्टर, तहसीलदार, मोटार गाडी तयार करणारे, शास्त्रज्ञ असो, सर्व शिक्षणामुळेच. 
      उदाहरणे देईल तेवढे कमीच आहेत. शिक्षणामुळे जो सभ्य समाज तयार होतो त्या एवढा मजबूत समाज आणि सक्षम समाज कुठेच होउ शकत नाही. यावरून मी जे अशिक्षित आहे त्याना कमी लेखु इच्छित नाही, क्रपया तसा गैरसमज करून घेऊ नये. 
     या लेखातून एवढेच सांगणे आहे की शिक्षण घेणारे हे कुठे ही, समाजात स्वता सोबत कुटुंबाचे, वा समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम असतात. त्यामुळे शिकलेले तेवढे हुकलेले' असे म्हणनार्यानी चुकुन ही सुशिक्षित लोकांना असे म्हणु नये. 
      कारण लहान पणा पासुन आपण आपल्या मुलांना मोठ्या आवडीने शाळेत पाठवतो, मुलाना चांगले गुण पडले की पेढे वाटतो, मुल अधिकारी झाले की त्यांचा सत्कार आणि भरभरून कौतुक करतो. 
      जगातील महान व्यक्तीमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उद्योजक रतन टाटा, बील गेटस, एक ना अनेक थोर व्यक्तीमत्व हे शिक्षणामुळे नावारूपास आले. त्यामुळे हुकलेले' म्हणून त्यांचा अपमान करून समाजामध्ये शिक्षणाविषयी नकारात्मक भावना पसरवु नये ही नम्र विनंती. 

लेखक, 
ज्ञानेश्वर पांचाळ.

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...