सोमवार, ३० जानेवारी, २०२३

UGC Care Journal List related Information (युजीसी केअर नियतकालिक समंधित माहिती)


युजीसी केअर लिस्ट (यादी) हि युजीसी ने बनवलेली विविध नियतकालिकाची यादी आहे. ज्यामध्ये विविध नियतकालीकाचा उल्लेख दिलेला आहे. युजीसी ने हि नियतकालिकाची यादी बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संशोधन मध्ये होणारे गैर प्रकार थांबवणे होय. युजीसी ने पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी या युजीसी नियतकालिकेच्या यादीतील नियतकालिक (जर्नल) आपले संशोधन पेपर प्रसारित करण्यासाठी निवडण्याचे अनिवार्य केलेले आहे. युजीसी केअर नियतकालिक यादी पाहण्यासाठी संशोधकांना सर्व प्रथम युजीसी केअर च्या वेबसाईट वर स्वताचे युजीसी केअर खाते तयार करावे लागेल. युजीसी केअर वर खाते तयार करण्यासाठी वापरकर्त्याकडे स्वताचा इमेल पत्ता असणे आवश्यक आहे, तरच हे खाते तयार करता येईल. ज्या विद्यार्थ्यांकडे इमेल पत्ता तयार आहे त्यांनी खालील प्रमाणे आपले युजीसी केअर खाते तयार करावे. 
        पीएचडी च्या विद्यार्थ्यांनी युजीसी केअर नियतकालिक यादी (लिस्ट) पाहण्यासाठी "युजीसी केअर" हे शब्द गुगल शोध यंत्र बॉक्स मध्ये टाइप करून enter बटन दाबावे, नंतर गुगल शोध यंत्र रकान्या खाली "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युजीसी केअर" हि वेबसाईट लिंक दिसेल, त्या वेबसाईट लिंक वर क्लिक केल्या नंतर आपणास युजीसी केअर लनियतकालिक ची वेबसाईट समोर संगणक स्क्रीन वर दिसेल. किंवा https://ugccare.unipune.ac.in/apps1/home/index हि दिलेली वेबसाईट ब्राउजर मध्ये टाइप करून एंटर बटन दाबावे, नंतर आपणास लॉगीन आणि साईनअप बटन दिसेल, ज्यांचे खाते तयार नसेल त्यांनी खाते तयार करण्यासाठी साईनअप बटन दाबावे. त्यानंतर वेबसाईट वर आपणास आपली वयक्तिक माहिती समोर साईनअप फॉर्म मध्ये भरायची आहे त्यामध्ये इमेल पण समाविष्ट करायचा आहे आणि शेवटी खाली सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे, यानंतर आपल्या इमेल वर इमेल येईल त्यावर खाते तयार झाल्याचे आपणास खात्री करायची आहे. आपणास मिळालेल्या इमेल वर आपनास कन्फर्म लिंक येईल त्यावर आपणास क्लिक करून खाते तयार केल्याचे confirm (खात्री) करायाची आहे. नंतर युजीसी केअर पुणे च्या वेबसाईट वर परत जाऊन लॉगीन करायचे आहे.
         लॉगीन झाल्यानंतर आपणास युजीसी केअर नियतकालिक यादी पाहण्यासाठी तीन वेगवेगळ्या नियतकालिक यादी समन्धित वेबसाईट लिंक दिलेल्या आहेत जसे कि युजीसी केअर लिस्ट,युजीसी केअर लिस्ट १, युजीसी केअर लिस्ट २ इत्यादी. यावर आपणास जी यादी पहायची आहे त्या वेबसाईट लिंक वर क्लिक केल्या नंतर आपणास समन्धित नियतकालिक यादी दिसेल. नियत कलिक यादी चे तीन प्रकार आहेत एक युजीसी केअर लिस्ट ज्या मध्ये हुमानीटीज, सोसीअल सायन्स, विज्ञान, संगणक शास्त्र इत्यादी विषय समन्धित सामान्य नियतकालिक ची यादी दिसेल. त्यानंतर "वेब ऑफ सायन्स" समन्धित यादी क्रमांक दोन असेल, ज्या मध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त नियतकालिक असतील, त्या मध्ये आपणास विविध विज्ञान आणि तंत्रज्ञान संधीत हजारो नियतकालिक पाहायला मिळतील. युजीसी केअर लिस्ट ३ हि स्कोपस नियतकालिक यादी होय. ज्यामध्ये सर्व प्रकारचे आंतराष्ट्रीय स्तरावरचे नियतकालिक समाविष्ट केलेले आहेत. तर आपणास या नियतकालीकच्या यादी मधून आपल्या संशोधन विषय समन्धित नियतकालिक शोधून त्यावर आपला संशोधन केलेला पेपर प्रसारित करावयाचा आहे. अधिक माहिती साठी https://ugccare.unipune.ac.in/Apps1/Home/Index या दिलेल्या वेबसाईट ला भेट द्यावी. 

लेखक, 
ज्ञानेश्वर सुर्यकांत पांचाळ, 
पी.एच.डी. संशोधक विद्यार्थी, 
संगणकशास्त्र आणि माहितीशास्त्र विभाग, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद, महाराष्ट्र.

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...