शनिवार, ८ जून, २०२४

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

 मागील लेखात आपण पीएचडी ला प्रवेश कसा करावा याबद्दल माहिती पाहिली. या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार आहोत. तर पार्ट टाईम पीएचडी म्हणजे आपण आपली नोकरी करत करत पीएचडी करू शकतो. ज्यामध्ये ज्यावेळेस आपण पीएचडी ला प्रवेश घेतो त्यावेळेस आपणास पीएचडी प्रवेश फॉर्म वर पार्ट टाईम पीएचडी करायची का फुलटाईम याचा उल्लेख करावा लागतो किंवा प्रवेश फॉर्म वर दोन पर्याय दिलेले असतात त्यापैकी एका पर्यायावर आपणास टिक करायचे असते


फुल टाईम म्हणजे उमेदवाराला विद्यापीठ परिसरात राहून पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी द्यावा लागतो. सरासरी पूर्ण वेळ पीएचडी करणारे उमेदवार हे पदव्युत्तर पदवी पास झाल्या झाल्या पीएचडी ला प्रवेश घेतात. नोकरी करणारे सहसा विवाह झालेले असतात किंवा त्यांना कायमस्वरूपी नोकरी लागलेली असते त्यामुळे अशे उमेदवार पूर्ण वेळ पीएचडी करू शकत नाही. त्यासाठी विद्यापीठाने दोन्ही पर्याय पीएचडी करू इछीनार्यांसाठी ठेवलेले आहेत.  तर उमेदवार आपल्या सोयीनुसार पीएचडी ला प्रवेश घेऊ शकतात.

पीएचडी ला प्रवेश कसा करायचा असतो याबद्दल मागील ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तो ब्लॉग आपण नक्की वाचावा. पीएचडी पूर्ण करण्यासाठी साधारण कमीत कमी तीन वर्ष आणि जास्तीतजास्त पाच वर्ष लागतात. तरी ज्यांना कुणाला पीएचडी करायची आहे त्यांनी पाच वर्ष पीएचडी साठी द्यावे लागतात असे गृहीत धरून च पीएचडी ला प्रवेश घ्यावा

पार्ट टाईम पीएचडी चे शुल्क साधारणता फुल टाईम पीएचडी पेक्षा जास्त असते. पीएचडी करत असताना आपण जे संशोधन कार्य करत आहोत त्याचा रिपोर्ट प्रती सहा महिन्याला पीएचडी विभागाला द्यावा लागतो, याला प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतात. प्रोग्रेस रिपोर्ट वर प्रत्येक वेळेस संशोधकाला आपल्या गाईड ची सही घ्यावी लागते. तर अशा पद्धतीने पीएचडी चे संशोधन साधारणता तीन ते पाच वर्ष चालते. संशोधकाचे संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भात पूर्ण रिपोर्ट पीएचडी विभागात जमा करावा लागतो.  प्रोग्रेस रिपोर्ट पीएचडी विभागात जमा करण्या अगोदर संशोधकाला गाईड ची साहि घ्यावीच लागते, त्यानंतरच प्रोग्रेस रिपोर्ट स्वीकारला जातो, त्याशिवाय संशोधकाचा कसला हि रिपोर्ट पीएचडी विभागात स्वीकारला जात नाही.

पीएचडी संशोधकांना विद्यापीठातर्फे किंवा युजीसी मार्फत विविध प्रकारच्या फेलोशिप दिल्या जातात, त्या फेलोशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या फेलोशिप ला online apply करावे लागते. फेलोशिप बद्दल आपण येणार्या पुढील ब्लॉग मध्ये सर्व माहिती पाहू. तर अशा पद्धतीने संशोधक विद्यार्थी पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी करू शकतात. आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  लेखक: ज्ञानेश्वर पांचाळ.

 

 

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...