फॉलोअर

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

सामाजिक जाणीव, जिम्मेदारी आणि कर्तव्य

 सामाजिक जाणीव, जिम्मेदारी आणि कर्तव्य

समाज म्हणजे आपल्या सभोवती असणाऱ्या विविध प्रकारच्या लोकांचा समूह होय. भारतीय समाज हा विविध जातीत विभागलेला आहे, तरीही भारतीय लोक गुण्या गोविंदाने, आनंदाने जीवन जगतात. याला कारण आहे भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती हि खूप आदर्शवादि आहे. आपल्या भोवती विविध जातीचे वेगवेगळे समूह आहेत, प्रत्येकाचे रीतिरिवाज भिन्न आहेत, समाजात वावरताना, किंवा काही सामाजिक कार्यानिमित्त विविध लोकांना एकत्र येणे गरजेचे असते, तरच एखादे मोठे कार्य पूर्ण होते. यासाठीच प्रत्येक व्यक्तीला सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे, हा लेख त्यासाठी गरजेचा आहे.  आपण अनुभवतो कि बरेचशे तरुण तरुणी आताच्या मोबाईल युगात एवढे व्यस्त झाले आहेत कि त्यांना समाज आणि कर्तव्य याचे भानच नाही. त्यासाठी अधूनमधून अशा लेखांची गरज भासते, जे कि तरुणांना त्यांचे सध्या जे चाललंय त्यामध्ये काय चुकते आणि काय बरोबर आहे याची जाणीव करून देण्यासाठी.

    समाजाचे विविध अंग आहेत जसे जातीवरून, व्यवसायावरून, शिक्षणाप्रमाणे, अडाणीपण, व्यसनी, निर्व्यसनी इत्यादी. हा लेख लिहिण्याचा उद्देश म्हणजे सध्याची तरुण पिढी कुठे ना कुठे मोबाईल च्या वेडापायी म्हणा किंवा आधुनिकतेमध्ये होणारी वाढ म्हणा, यामध्ये कुठे तरी भरकटत आहे. समाजामध्ये वावरताना कोणत्या कोणत्या कर्तव्याची आवश्यकता आहे, जिम्मेदारी ने कोणते काम कसे पूर्ण करावे याची जाणीव म्हणा, मोठ्यांचा आदर, इत्यादी गोष्टींची तरुणांना होणे आवश्यक आहे. कारण हेच तरुण उद्याचे भारताचे नागरिक आहेत, हेच जर सक्षम झाले तर भारतीय संस्कृती आजून भक्कम पद्धतीने टिकेल.  


     सामाजिक जाणीव, जिम्मेदारी आणि कर्तव्य हे तीन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत जे व्यक्तीच्या सामाजिक जीवनाचा भाग बनतात. हे तत्व समाजात एकोपा, समृद्धी आणि दायित्वाची भावना वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. याचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे:

सामाजिक जाणीव:

सामाजिक जाणीव म्हणजे आपल्या समाजाच्या विविध समस्या, आवश्यकता, आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर लोकांच्या भावना आणि स्थितीची समज. हे व्यक्तीला इतरांच्या स्थितीचे महत्त्व ओळखण्यास मदत करते आणि समाजातील विविध वर्गांमधील भेदभाव आणि असमानता कमी करण्याच्या दिशेने काम करण्यास प्रवृत्त करते.

        • उदाहरण: समाजातील गरिबी, बेरोजगारी, आरोग्यविषयक समस्या इत्यादीबद्दल जाणीव असणे आणि त्यावर काम करणे.


 जिम्मेदारी:

जिम्मेदारी म्हणजे व्यक्तीला त्याच्या कार्यांचे आणि निर्णयांचे परिणाम स्वीकारण्याची तयारी. सामाजिक जबाबदारी म्हणजे त्या समाजातील इतर लोकांशी सहकार्य करत, त्यांच्या हक्कांची आणि गरजांची काळजी घेणे.

    • उदाहरण: एक शिक्षक, डॉक्टर किंवा अधिकारी या व्यावसायिकांना त्यांच्या कार्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारावी लागते. समाजातील इतरांसाठी मदतीचा हात पुढे करणे, संसाधनांचा योग्य वापर करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

कर्तव्य:

कर्तव्य म्हणजे एका व्यक्तीने समाजातील किंवा कुटुंबातील इतर लोकांच्या प्रति असलेल्या नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर दायित्वांची पूर्तता. कर्तव्य हे त्याच्या अधिकारांशी निगडित असते, आणि ते प्रत्येकाच्या कृत्यांनी समाजाच्या भल्यासाठी घडते.

    • उदाहरण: आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणे, पर्यावरणाची देखभाल करणे, आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणे हे सर्व कर्तव्य आहेत.


सामाजिक जाणीव, जिम्मेदारी आणि कर्तव्य यांचा समन्वय:

या तिन्ही घटकांचा समन्वय समाजाच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. एक व्यक्ती, समाजातील प्रत्येक सदस्याने या तत्त्वांनुसार वागल्यास, समाजात समतेचा, न्यायाचा आणि सहकार्याचा वातावरण निर्माण होईल.

     •   सामाजिक जाणीव आपल्याला एक मोठ्या दृष्टीकोनातून विचार करण्यास शिकवते.

     •   जिम्मेदारी आपल्याला आपल्या कृत्यांच्या परिणामांची जाणीव करून देते.

     •   कर्तव्य आपल्याला नैतिक आणि कायदेशीर ढंगाने कार्य करण्याची प्रेरणा देते.

हे तीन तत्त्व एकमेकांशी संबंधित आहेत आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

    या तीन तत्वांची तरुणांनी जाणीव ठेवली तर अशे तरुण कधी हि अयशस्वी होत नाहीत, अशे तरुण  समाजामध्ये ताठ मानेने जगतात. 

    बरेचशे तरुण भरकटतात जसे कि व्यसनाच्या आहारी जाणे, सारखे मोबाईल वर निरूपयोगी रिल्स पाहणे, घरातील थोरामोठ्यांचा आदर न करणे, आपल्या कर्तव्याची जाणीव नसणे, नंतर जसजशे वय वाढते तसतसे या तरुणांना काम करावे वाटत नाही, अशे तरुण मग समाजामध्ये विविध अनैतिक, बेकायदेशीर मार्गाला लागतात.

    त्यासाठी तरुणांनी लहानपणा पासूनच भारतीय संस्कृती, भारतीय सामाजिक रचना, सामाजिक मूल्य, चांगले वाईट याची जाणीव आणि संस्कार देणे अत्यावश्यक आहे . त्यासाठी भारतामध्ये जी सामाजिक जडणघडण झाली आणि होतेय ती अतिशय मौल्यवान आहे. भारतीय जडणघडण येणाऱ्या तरुण पिढीमध्ये रुजवणे हे आपना सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. भारत देशाच्या विकासासोबत भारतीय सामाजिक मूल्य देखील तेवढेच महत्वाचे आहे जेवढे कि भारत देशाची प्रगती.

 

लेखक,

डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ,

रा. माजलगाव, जी. बीड.

Featured post

मुलीना मोफत शिक्षण ? याचे काय झाले 'अ‍ॅडमिशनवेळीच भरायला पैसे नाहीत, नंतर मिळालेल्या लाभाचं काय करू?'

  "अ‍ॅडमिशन फी इतकी होती की, घरचे पुढे शिक्षण घ्यायलाच नको म्हणत होते. वडील म्हणाले, काय करायचंय पुढं शिक्षण घेऊन?" असं तेजस्विनी ...